शहापूरजवळ क्रेन कोसळून 16 कामगारांचा मृत्यू
शहापूरजवळ क्रेन कोसळून 16 कामगारांचा मृत्यू लोकमानस प्रतिनिधी ठाणे- शहापूर जवळील सरलांबे येथे समृध्दी महामार्गाचे काम सुरु असताना क्रेन कोसळून 16 कामगारांचा मृत्यू झाला. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. समृध्दी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम येथे सुरु होते. सुरक्षिततेच्या पुरेशा उपाययोजना नसल्याने या दुर्घटनेत एवढे बळी गेले. सुमारे 100 फूट अंतरावरुन ही महाकाय क्रेन कोसळली त्याखाली दबून कामगारांचा मृत्यू झाला.