प्रसिध्द बिल्डर फरीद नुरी यांचा आयकॉन 2023 पुरस्काराने सन्मान

प्रसिध्द बिल्डर फरीद नुरी यांचा आयकॉन 2023 पुरस्काराने सन्मान
मुंबई - प्रतिनिधी 
प्रसिध्द बिल्डर फरीद नुरी यांचा नुकताच आयकॉन 2023 पुरस्काराने सन्मान 
मुंब्रातील नूरी कंस्ट्रक्शन और नूरी फाउंडेशन चे अध्यक्ष, फरीद जरीवाला (नूरी) यांना मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या मिड-डे दैनिकातर्फे आयोजित मिड-डे  इंफ्रास्ट्रक्चर  कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते 'आयकॉन - 2023' पुरस्कार देण्यात आला. 
फरीद नुरी हे प्रथितयश बिल्डर असून सामाजिक कार्यात देखील ते अग्रेसर असतात.  
फरीद नुरी यांनी आपल्या कष्ट, प्रामाणिकपणा व उच्च विचारसरणीवर मार्गक्रमण करत मुंब्रा येथून प्रारंभ करत आज ठाणे व मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रात  आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांचे अनेक प्रकल्प मुंब्रा,  वांद्रे,  वरळी यासह विविध भागात सुरु आहेत. 
या पुरस्काराने सन्मानित झाल्याने फरीद नुरी यांचे समाजातून मोठे कौतुक केले जात आहे. 

 सामाजिक,  शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात नुरी यांचे मोठे योगदान आहे. 
अतिशय कष्टातून प्रचंड मेहनत व संघर्ष करत नुरी यांनी गृह निर्माण क्षेत्रात आपली वेगळी ओळख तयार केली आहे. 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब