नववधू प्राजक्ताचा मृत्यूशी संघर्ष, आर्थिक मदतीचे आवाहन

 नववधू प्राजक्ताचा मृत्यूशी संघर्ष, 

आर्थिक मदतीचे आवाहन

लोकमानस प्रतिनिधी - मुंबई 

 पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर सोमवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नववधू प्राजक्ता खरात - दडस हिचा मृत्यूसोबत संघर्ष सुरू आहे.  अपघात घडल्यापासून प्राजक्ता बेशुद्ध अवस्थेत आहे. या  दुर्घटनेला साधारण ५० तास उलटून गेले आहेत. या अपघातात त्यांची सासू उज्वला दडस जागीच ठार झाल्या. तर पती, सासरे व अन्य एक नातलग गंभीर जखमी झाले. पण प्राजक्ताची परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. तिच्या मेंदूला मार लागला आहे. इतर अवयवांनाही इजा झालेली आहे. पण मेंदूची दुखापत चिंताजनक आहे.

    माण (माहेर) व फलटण (सासर) मार्गे ती  मुंबईतील विक्रोळी येथील सासरच्या घरी पहिले पाऊल टाकणार होती. नववधूच्या स्वागतासाठी आरतीचे ताट तयार करण्यात आले होते. पण त्या अगोदरच काळाने घाला घातला. फलटण येथे बुधवारी (ता. २८ जून) प्राजक्ताचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला होता. पण अवघ्या पाचव्याच दिवशी (ता. ३ जुलै) तिचा भीषण अपघात झाला. 

    कामोठे येथील MGM रूग्णालयात तिच्यावर दोन दिवस उपचार सुरू होते. रुगणालयाच्या डॉक्टरांनी तातडीची वैद्यकीय सेवा देवून प्राजक्ताची प्राणज्योत तेवत ठेवली. बुधवारी पहाटे ४ वाजता तिला मुलुंड येथील फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फोर्टिस रूग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. जयेश सरदाना यांनी बुधवारी सायंकाळी तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया केली आहे. पुढील ४८ तास क्रिटीकल असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

     प्राजक्ताचा उपचारांचा खर्च महागडा आहे. खरात व दडस कुुंटुंबिय व नातलगांनी मिळून खर्चाचा भार पेलायचे ठरविले आहे. पण फोर्टिसमध्ये  पहिल्याच दिवशी साधारण पावणे दोन लाख रूपये उपचार व शस्त्रक्रियेसाठी खर्च झाले आहेत. हा खर्च आणखी वाढत जाणार आहे.प्राजक्ताला या जीवघेण्या संघर्षातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.


बँकेचा तपशिल

Account Name: Sahebrao Malhari Kharat

Account no:50100386492962

IFSC CODE:HDFC0000967

Mobile No :9821299247

Deepali Kharat: Gpay no:7710804750

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही