पत्रकार कविराज चव्हाण यांची जे. जे. रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळावर नियुक्ती

पत्रकार कविराज चव्हाण यांची जे. जे.  रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळावर नियुक्ती
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार कविराज चव्हाण यांची सर जे. जे.  रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळावर तज्झ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
राज्य सरकारच्या शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळावर सरकारने नियुक्ती जाहीर केली आहे.  वैद्यकीय शिक्षण विभागाकडून याबाबतचा जीआर जारी करण्यात आला आहे.  जे. जे.  रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी मंत्री मंगलप्रभात लोढा,  सदस्यपदी आमदार पराग अळवणी, आमदार यामिनी जाधव,  संदीप म्हात्रे,  युसूफ रंगवाला,  अभिषेक शिंदे या इतर सदस्यांची नियुक्ती झाली आहे.  
कविराज चव्हाण यांनी या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केले व रुग्णांना उपचारांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी कार्यरत राहण्याची ग्वाही दिली.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब