मणिपूर प्रकरणाचा मुंब्र्यात मौलानांनी केला निषेध, राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी

मणिपूर प्रकरणाचा मुंब्र्यात मौलानांनी केला निषेध, राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी 
प्रतिनिधी 
मणिपूर येथे घडलेली घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेमुळे सभ्य समाजाचे नियम पायदळी तुडवले गेले आहेत. या घटनेत सामिल असलेल्या दोषींविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी मुंब्रा मध्ये झालेल्या ऑल इंडिया सुन्नी जमैतुल उलेमाच्या बैठकीत करण्यात आली. मणिपूर घटनेच्या निषेधार्थ मुंब्रा कौसा परिसरातील मौलानांनी बैठक घेऊन या घटनेचा अत्यंत कठोर शब्दांत निंदा केली व निषेध केला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया सुन्नी जमैतुल उलेमाचे अध्यक्ष हजरत मौलाना मोईनुद्दीन अश्रफ होते.
मणिपूर गेल्या काही महिन्यांपासून  धुमसत आहे. महिलांसोबत झालेल्या घटनेने सर्व सीमा पार झाल्या आहेत, त्यामुळे या प्रकरणी केंद्र सरकारने मणिपूरमध्ये तत्काळ राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी मौलाना मोईनुद्दीन अश्रफ यांनी केली. मुंब्रा येथे झालेल्या या बैठकीत उपस्थित मौलानांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली व अशा घटना रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मौलाना अश्रफ यांच्या सोबत यावेळी मौलाना मेहफुज, मौ. सुफी, मौ.सईद नुरी, यांच्यासहित अनेक मौलाना उपस्थित होते. 
 
इर्शाळवाडी दरडग्रस्तांना जमैतुल उलेमातर्फे मदत पाठवणार
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना, आपदग्रस्तांना मदत करण्यासाठी ऑल इंडिया जमैतुल उलेमाचे पथक मौलाना मोईनुद्दीन अश्रफ यांच्यासोबत लवकरच जाईल  त्यांना मदत देईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही