माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला

 माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला 

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई -  माजी मंत्री नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणांमुळे जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. नवाब मलिक यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

फेब्रुवारी २०२२ ला मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी ने अटक केली होती. मलिक यांचे गॅंगस्टर दाऊद इब्राहिम व त्याच्या साथीदारांसोबत संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. 

नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून ते खासगी रुग्णालयात दाखल आहेत. न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्यासमोर याबाबत सुनावणी झाली होती त्यानंतर याबाबतचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. आज न्यायालयाने हा निकाल जाहीर केला. 

विशेष न्यायालयाने मलिक यांचा जामीन अर्ज नोव्हेंबर २०२२ मध्ये फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय कारणास्तव उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मलिक यांच्यातर्फे ज्येष्ठ वकिल अॅड अमित देसाई यांनी युक्तीवाद केला होता तर ईडी तर्फे अतिरिक्त सॉलीसिटर जनरल अनिल सिंह यांनी बाजू मांडली होती. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही