सभापती गोऱ्हे यांनी केलं आ. सत्यजीत तांबेंचं कौतुक- शिक्षण विभागाशी संबंधित प्रश्नांबाबत जागरूक असल्याचा शेरा- आ. तांबे यांनी सादर केली सर्व मुद्द्यांची टिपण्णी

 सभापती गोऱ्हे यांनी केलं आ. सत्यजीत तांबेंचं कौतुक
- शिक्षण विभागाशी संबंधित प्रश्नांबाबत जागरूक असल्याचा शेरा
- आ. तांबे यांनी सादर केली सर्व मुद्द्यांची टिपण्णी
लोकमानस  प्रतिनिधी
मुंबई - 
आपण सातत्याने चांगलं काम करत राहिलो, तर त्या कामाची दखल घेतली गेल्याशिवाय राहत नाही, याची प्रचिती आ. सत्यजीत तांबे यांना विधान परिषदेत आली. शिक्षण विभागासंबंधी चाललेल्या चर्चेदरम्यान सभापती नीलम गोऱ्हे यांनी आ. तांबे यांचा नामोल्लेख करत कौतुक केलं. शिक्षण विभागासंबंधीच्या सर्व मुद्द्यांबाबत एक टिपण्णी तयार करून द्यावी, असं आवाहन आपण सर्व सदस्यांना केलं होतं. पण फक्त आ. सत्यजीत तांबे यांनी अशी अत्यंत अभ्यासपूर्ण टिपण्णी सादर केली आहे, असं त्या म्हणाल्या. 
नाशिक पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यापासून आ. सत्यजीत तांबे यांनी सभागृहात दमदार कामगिरी केली आहे. या पावसाळी अधिवेशनातही त्यांनी शिक्षण व इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांची आधारकार्ड पडताळणी, शिक्षक भरती, शाळांना अनुदान, सीईटी परीक्षेदरम्यानच्या तांत्रिक अडचणी अशा अनेक समस्यांसंदर्भात या अधिवेशनात आ. तांबे यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद भाषणांचं कौतुक सर्वच पक्षांमधील आमदार करतात. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही आ. तांबे यांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरं अगदी तपशीलवार दिली. त्यांनी केलेल्या अनेक मागण्याही मार्गी लावल्या. 

या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत गुरुवारी शिक्षण विभागासंबंधीच्या प्रश्नांवर चर्चा सुरू होती. शिक्षण विभागाने हे प्रश्न निकाली काढण्यासाठी एक बैठक बोलवावी, अशी मागणी सदस्यांकडून केली जात होती. त्यावर सभापती नीलम गोऱ्हे यांनी सर्वच सदस्यांना उद्देशून एक वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या की, ज्या सदस्यांना शिक्षण विभागासंबंधीचे मुद्दे मांडायचे आहेत, त्यांनी सर्व मुद्द्यांची टिपण्णी काढून द्यावी, असे आपण आधीच सुचवले होते. त्यामुळे शिक्षण विभागाला त्यांचा परामर्श घेऊन बैठक आयोजित करणं सोपं जाईल. आतापर्यंत फक्त आ. सत्यजीत तांबे यांनी अगदी व्यवस्थित मुद्देसूद टिपण्णी बुधवारी संध्याकाळीच सादर केली. मला त्यांचं अत्यंत कौतुक वाटतं. इतर आमदारांनीही त्यांचा कित्ता गिरवत अशी टिपण्णी लवकर सादर करावी, अशी सूचनाही आ. गोऱ्हे यांनी केली.

आमदार सत्यजित तांबे यांनी पावसाळी अधिवेशनात शिक्षण विभागासंबंधी उपस्थित केलेले मुद्दे
- राज्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमधील वाढीव शिक्षक पदांना मान्यता द्यावी
- नाशिकमधील बीएड सीईटीच्या परीक्षेतील आयोजकांच्या हलगर्जीपणाबाबत
- राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचं आधार कार्ड अवैध असल्याचं आढळल्याचा मुद्दा
- कायम शब्द वगळलेल्या शाळा-महाविद्यालयांना प्रचलित धोरणानुसार अनुदान मिळावं
- राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच अनुदानित आयुर्वेदिक महाविद्यालयांमधील अध्यापकांची रिक्त पदे भरावी


जास्त काम करण्याचं बळ मिळालं
सभापती नीलमताई गोऱ्हे यांचा विधिमंडळ कामकाजाचा अनुभव दांडगा आहे. एका दशकापेक्षा जास्त काळ त्यांनी सभागृहाचं प्रतिनिधित्त्वं केलंय. त्यांनी माझ्यासारख्या नवोदित आमदाराचं कौतुक करणं, ही माझ्यासाठी खूप सुखावह बाब आहे. लोकांच्या मनातले प्रश्न मी नेटाने सभागृहात मांडत असतो. त्यामुळे सभापती महोदयांनी केलेलं माझं कौतुक हे मला असे प्रश्न मांडायला आणखी बळ देणारं आहे. यापुढेही मी माझं काम अशाच नेटाने सुरू ठेवेन. - आ. सत्यजीत तांबे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही