किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओच्या चौकशीची केली मागणी


किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओच्या चौकशीची केली मागणी, 
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सभापतींकडे सादर केला पेनड्राइव्ह
मुंबई -  माजी खासदार असलेले किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ असलेला पेनड्राइव्ह विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधानपरिषद सभागृहात सभापतींकडे सादर केला. तसेच याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी सभागृहात लावून धरली.
     डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या महाराष्ट्रातील संस्कृतीला काही राजकारणी छेद देण्याचा प्रयत्न करत आहेत. महामंडळांवर विविध पदांचा प्रलोभने दाखवून,
ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांची भीती दाखवून काही महिला अधिकाऱ्यांना धमकी देऊन त्यांची पिळवणूक व शोषण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर केला आहे.
  सदर पेनड्राइव्हमध्ये मराठी स्त्रियांविषयी अश्लील भाषेत संभाषण आहे, या विषयी तपास करावा. मराठी महिलांविषयी अशा शब्दांत संभाषण करणारे किरीट सोमय्या हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रद्रोही आहेत, अशी टीका दानवे यांनी केली आहे. 
  तसेच या पेनड्राइव्हचे अवलोकलन करून कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी सभागृहात लावून धरली. 
त्यावर उत्तर देताना गृहमंत्री यांनी या गंभीर प्रकरणाची सखोल वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब