पावसाळ्यात काळजी घेण्याचे टोरंट पॉवरचे आवाहन

पावसाळ्यात काळजी घेण्याचे टोरंट पॉवरचे आवाहन
लोकमानस प्रतिनिधी - पावसाळ्यात सततचा पाऊस, जोराचा वारा तसेच पाणी साचल्याच्या घटनांमुळे वीज पुरवठा करणारया केबल्स खराब होऊन शॉर्टसर्किट होण्याची शक्यता असते. 
पावसामुळे किंवा जोरदार हवेने झाड किंवा त्याची फांदी वीज वाहक वाहिन्यांवर पडली तर, त्या केबल तुटू शकतात किंवा शॉट सर्किट होते. अश्या तुटलेल्या वीज केबलना तसेच वीजेच्या पोलना हात लावू नये, तसेच पावसाळ्यात पाणी भरलेल्या ठिकाणी वीजेच्या पोलना स्पर्श करू नये, असे आवाहन टोरंट पॉवरने केले आहे.

अनेकदा मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते. अश्या वेळी खबरदारीचा उपाय म्हणून रोहीत्रांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडीत करण्यात येतो. तसेच अनेकदा वीजेच्या खांबावरील वीज वाहक वाहिन्यांवर एखाद्या झाडाची फांदी पडून तेथेही वीज पुरवठा खंडीत होतो. ज्या ठिकाणी भूमिगत वीज वाहिन्या आहेत त्याठिकाणी जर केबल डॅमेज झालेली असेल तर, पावसाचे पाणी जाऊन तेथे शॉर्टसर्किट होण्याची शक्यता असते, अश्या वेळी त्या परिसराचा वीज पुरवठा खंडीत करून ती केबल दुरूस्त केली जाते. अश्या अनेक प्रकारांमुळे पावसाळ्यात ग्राहकांचा वीज पुरवठा काहीएक वेळा खंडीत होऊ शकतो,

आपणास कोठेही वीजेचा शॉकची तक्रार असल्यास किंवा वीजेच्या केबल, पोल तुटला वगैरे आढळल्यास टोरंट पावरच्या ग्राहक कक्षाशी किंवा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

ग्राहकानी वीजे बाबत काही तक्रार असल्यास कंपनीच्या हेल्पलाईन १८००२६७७०९९ (शीळ-मुंब्रा-कळवा) / १८००२६७२२५५ (भिवंडी)  यावर संपर्क साधावा असे आवाहन कंपनीने केले आहे. ही सेवा २४ तास उपलब्ध असते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही