नाविक कामगारांसाठी वाराणसी येथे नुसी चे कार्यालय सुरु

 नाविक कामगारांसाठी वाराणसी येथे नुसी चे
कार्यालय सुरु
लोकमानस प्रतिनिधी 
उत्तर प्रदेशातील नाविक कामगारांसाठी नॅशनल युनियन ऑफ सीफेअरर्स ऑफ इंडिया (नुसी)  ने वाराणसी येथे  २२ व्या  शाखा कार्यालयाचे भव्य ऊदघाटन केले.  ८ जुलै रोजी नॅशनल युनियन ऑफ सीफेअरर्स ऑफ इंडिया जनरल सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगावकर  यांच्या हस्ते  उद्घाटन करण्यात आले.

   या कार्यक्रमाला इंडियन कोस्टल कॉन्फरन्स शिपिंग असोसिएशन (ICCSA) चे सचिव कॅप्टन राकेश सिंग,  जनार्दन बहिरत, एलिगंट मरीन सर्व्हिसेस प्रा.  लि., कॅप्टन करण मदन, अँग्लो इस्टर्न शिप मॅनेजमेंट प्रा.  लि., संघटक सचिव सुरेश सोलंकी  आणि न्यूसीचे 1500 हून अधिक नाविक कामगार ऊपस्थित होते.
   नुसीचे जनरल सेक्रेटरी व खजिनदार  मिलिंद कांदळगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, देशभरातील आमच्या नाविक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या काळजी घेण्यासाठी नुसी वचनबद्ध आहे.  अधिकाधिक नुसी सदस्यांना त्यांच्या भारतीय आणि परदेशी ध्वज करार आणि कल्याणकारी उपक्रमांचे लाभ मिळावेत यासाठी नुसी आपल्या शाखांचा विस्तार करत आहे.
 फ्लीट मॅनेजमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे आयोजित रोजगार आणि भरती मोहीम  राबवली. नाविकांना करिअरच्या संभाव्य संधी शोधण्याची आणि उद्योग व्यावसायिकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी या कार्यक्रमात प्राप्त झाली.  या कार्यक्रमाला नाविक आणि त्यांच्या कुटुंबियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या जनसमुदायाने नाविकांच्या  अधिकारांचे आणि भवितव्याचे रक्षण करण्यासाठी  नुसीचे कौतुक केले.
  कांदळगावकर यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की, नुसीने 22 व्या शाखा कार्यालयाचे उद्घाटन करून  उत्तर भारतातील  नाविकांना दिलेले वचन पूर्ण केले आहे. नुसी नाविकांच्या रोजगारासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी कठोर परिश्रम करत राहील,  अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली. 

नुसी वाराणसी शाखेचे कार्यालय S-5/149,  A-2.  KH-2, Aktha बेला रोड, J. D. नगर कॉलनी फेज - 2, पहारिया, जानकी वाटिका समोर, वाराणसी, उत्तर प्रदेश - 221 007. येथे असून या शाखेचे
 प्रतिनिधी महेंद्र नाथ  असून त्यांचा मोबाईल क्रमांक: +91 88799 64113 असा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही