इर्शाळवाडीवर दरड कोसळली, १६ जणांचा मृत्यू, १०० बेपत्ता, ९३ जणांना वाचवण्यात यश

 इर्शाळवाडीवर दरड कोसळली, १६ जणांचा मृत्यू, १०० बेपत्ता, ९३ जणांना वाचवण्यात यश 

प्रतिनिधी - 

जोरदार सुरु असलेल्या पावसाचा फटका बसून रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री उशिरा दरड कोसळली. या वाडीत ४८ कुटुंबे राहत होती. त्यातील सुमारे ३० घरांवर दरड कोसळली. दरड कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अनेक कुटुंबे अडकली. या दुर्घटनेची माहिती मिळताच मध्यरात्री प्रशासनाने मदतकार्यासला प्रारंभ केला. पहाटे एनडीआरएफच्या पथकाने मदतकार्य सुरु केले. आतापर्यंत या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत ९३ जणांना वाचविण्यात यश आले असून १०० जण बेपत्ता असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

दुर्गम भागात ही दुर्घटना घडली असल्याने व मुसळधार पाऊस सातत्याने सुरु असल्याने मदत व बचाव कार्यात अडथळे येत आहेत. या वाडीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष घटनास्थळी जाण्यासाठी दीड ते दोन तासांची पायपीट करणे गरजेचे आहे. थेट रस्ता नसल्याने घटनास्थळी जेसीबी नेणे प्रशासनाला अशक्य झाले आहे. 

इरशाळ आदिवासी वाडीत ४८ कुटुंबांतील २८८ जण वास्तव्याला होते. त्यापैकी ९३ जण सुखरूप असल्याची समोर आले आहे. १६ जणांचा मृत्यू झाला असून १०० जण बेपत्ता असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. ‘एनडीआरएफ’ची ४ पथके, ‘डिडीआरएफ’चे ८० जवान, स्थानिक आपत्ती प्रतिसाद दलाची ५ पथके यांच्या मदतीने गुरुवारी बचावकार्य सुरू होते. अंधार झाल्याने संध्याकाळी बचावकार्य थांबविण्यात आले असून, शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधकार्यास सुरूवात करण्यात येणार आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उदय सामंत,आदिती तटकरे, दादा भुसे, गिरीश महाजन या मंत्र्यांनी तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही