राहुल गांधीना दिलासा नाहीच, गुजरात उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

राहुल गांधीना दिलासा नाहीच, गुजरात उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

लोकमानस प्रतिनिधी 

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबत ही याचिका करण्यात आली होती. मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत त्यांच्यावर गु्न्हा नोंदवण्यात आला होता व त्यामध्ये त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सत्र न्यायालयात देखील यात दाद मागितली होती मात्र सत्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती त्याविरोधात गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र तिथेदेखील त्यांना दिलासा मिळाला नाही त्यामुळे आता त्यांना सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. 

या निर्णयामुळे राहुल गांधी यांचे निवडणूक लढवण्याचे मार्ग सध्यातरी बंद झाले आहेत. न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा दिल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले होते. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राहुल गांधी यांच्यासमोरील आव्हानांत अधिक वाढ झाल्याचे चित्र तयार झाले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही