विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती

 विधानसभेच्या 
विरोधी पक्षनेते पदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती
मुंबई -प्रतिनिधी 
राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत महायुतीच्या सरकारमध्ये थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.  पवार यांनी शुक्रवारीच राजीनामा दिल्याची माहिती दिली.  या घडामोडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते पदी मुंब्रा कळवा मतदारसंघाचे आमदार,  माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली.  पक्षाचे मुख्य प्रतोद पदी देखील आव्हाडांना संधी देण्यात आली आहे.  
आव्हाड यांच्या नियुक्तीमुळे राज्याचे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेता ही दोन्ही महत्त्वाची पदे ठाणे जिल्ह्याला मिळाली आहेत.  

आव्हाड यांनी या नियुक्तीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना आपण अखेरपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार असल्याची ग्वाही दिली. पवारांनी 25 वर्षे मंत्रीपदे दिल्यानंतर त्यांना या वयात असा धोका देणे चुकीचे असल्याचे आव्हाड म्हणाले. मुख्य प्रतोद म्हणून आपण काढलेल्या व्हीपचे पक्षाच्या सर्व आमदारांना पालन करावे लागेल,  अन्यथा त्याविरोधात कारवाई केली जाईल,  असा इशारा आव्हाड यांनी फुटीर आमदारांना दिला आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही