पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर मुंबई - प्रतिनिधी  बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या  झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे  जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देश

शिवसेनाप्रमुखांशी रक्ताचे नाते सांगणारेच समान नागरी कायद्याविरोधात, त्यांचा खरा चेहरा समोर येत आहे, उध्दव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या भूमिकेला साजेशी भूमिका घेण्याची गरज शिवसेना खासदार राहुल शेवाळेंची फटकेबाजी

शिवसेनाप्रमुखांशी रक्ताचे नाते सांगणारेच समान नागरी कायद्याविरोधात, त्यांचा खरा चेहरा समोर येत आहे,   उध्दव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या भूमिकेला साजेशी भूमिका घेण्याची गरज ,  शिवसेना खासदार राहुल शेवाळेंची फटकेबाजी मुंबई - प्रतिनिधी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याचे सुतोवाच केले आणि बाळासाहेब ठाकरे यांचे आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलले आहे. मात्र बाळासाहेबांशी रक्ताचे नाते सांगणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी या कायद्याला विरोध करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा राज्यातील जनतेसमोर येत आहे. खरे पाहत उध्दव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखांच्या भुमिकेला साजेशी भूमिका घेऊन त्यांच्या विचारांचे समर्थन करण्याची गरज होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी कटीबध्द आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मु्ख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आज एक वर्ष झाले. आजचा हा दिवस बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नपूर्ती

स्वातंत्र्यदिन व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा:- अतुल लोंढे

  स्वातंत्र्यदिन व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा:- अतुल लोंढे   राष्ट्रपित्याचा अपमान करणारी ‘गोडसेची औलाद’ सदारवर्तेवर कारवाई कधी करणार   ?   मुंबई-  मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी भारताला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही असे निर्लज्ज विधान करुन तमाम भारतीयांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे यांचे विधान हे लाखो स्वांतत्र्य सैनिकांचाही अपमान करणारे आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्व अर्पण केले. बेताल विधान करून देशाचे स्वातंत्र्य व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा तो कसा दाखल करायचा ते काँग्रेस बघून घेईल ,  असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे. संभाजी भिडेंच्या विधानाचा जाहीर निषेध करुन अतुल लोंढे यांनी भाजपावरही तोफ डागली ,  ते पुढे म्हणाले की ,  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे अभ्यासक आहेत ,  त्यांनी संविधान निट वाचावे म्हणजे त्यांना कळेल की १५ ऑगस्टला भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे केवळ रा

ईडी च्या माजी उप संचालकाला भ्रष्ट्राचार व बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटक

ईडी च्या माजी उप संचालकाला भ्रष्ट्राचार व बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटक  मुंबई - प्रतिनिधी  ज्येष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंतला भ्रष्ट्राचार व बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली. सावंत सध्या  कस्टममध्ये अतिरिक्त संचालक पदी कार्यरत आहे. यापूर्वी ईडीच्या  मुंबई कार्यालयात (झोन २)  तो कार्यरत होता. काल त्याच्या मुंबईतील निवासस्थानी छापा टाकण्यात आला होता. ५०० कोटींच्या गैरव्यवहारामध्ये गुंतलेल्या आरोपीने सावंत विरोधात केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने सावंत विरोधात चौकशी करुन गुन्हा नोंदवला आहे त्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  

मराठी माणूस मुंबईबाहेर जाण्यास उध्दव ठाकरे व त्यांची धोरणे कारणीभूत डॉ. श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल

 कोरोना बॉडीबॅग ठाण्यात ३५० रुपयांना मिळत असताना मुंबईत ६ हजार ७०० रुपयांना, उध्दव ठाकरेंच्या १५ वर्षाच्या कालावधीत मुंबई महापालिका आशियात सर्वात भ्रष्ट महापालिका, मराठी माणूस मुंबईबाहेर जाण्यास उध्दव ठाकरे व त्यांची धोरणे कारणीभूत- डॉ. श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल   मुंबई प्रतिनिधी - कोविड काळात सर्वसामान्य नागरिक जीव वाचवण्यासाठी आटापीटा करत असताना मुंबई महापालिकेत मात्र त्यांना लुटण्याचे काम होत होते. कोविड मधील मतदेहासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग ठाण्यात अवघ्या ३५० रुपयांना मिळत असताना त्याच बॅगेसाठी मुंबई महापालिका तब्बल ६ हजार ७०० रुपये का मोजत होती, असा प्रश्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असे बिरुद मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेची ओळख आशिया खंडातील सर्वात भ्रष्ट महापालिका अशी उध्दव ठाकरेंच्या १५ वर्षांच्या कालावधीत झाल्याचा आरोप त्यांनी केला. कोविंड काळात एकीकडे माणसे मरत होती व हे मात्र त्यांना लुटायचे काम करत होते, १५ वर्ष उध्दव ठाकरेंच्या ताव्यात महापालिका असतानाही मुंबईकरांच्या, मराठी माणसांच्या आयुष्यात फारसे बदल घडलेले दिसत

बीआरएस भाजपची ‘बी’ टीम, महाराष्ट्रात परिणाम होणार नाही; तेलंगणा पॅटर्न फसवा, लवकरच पोलखोल करू:- नाना पटोले

 बीआरएस भाजपची ‘बी’ टीम, महाराष्ट्रात परिणाम होणार नाही; तेलंगणा पॅटर्न फसवा, लवकरच पोलखोल करू:- नाना पटोले पंढरीची वारी आस्थेचा, श्रद्धेचा विषय; केसीआरनी राजकीय फायदा उठवू नये. देशातील ९ वर्षापासूनच्या अघोषीत आणीबाणीवर भाजपाने आधी बोलावे. शिंदे-फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणाणुळे मुंबई पाण्यात, कोट्यवधी रुपये गेले कुठे ? मुंबई तेलंगणातील भारत राष्ट्र समिती ही भाजपची बी टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला माहित आहे. तेलंगाणात बीआरएस पक्षाला मोठे खिंडार पडले असून त्यांचे अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा आहे. तेलंगणात केसीआर यांच्या पक्षाने काय केले याची सर्व माहिती काँग्रेसकडे आहे लवकर या फसव्या तेलंगणा पॅटर्नची पोलखोल करु, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, तेलंगणातील भारत राष्ट्र समिती महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे पण

कोविड काळाचा गैरवापर करुन ठाकरे परिवाराने पैसे कमावले, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करा - किरण पावसकर यांची मागणी

इमेज
महापालिकेतील कोविड घोटाळ्याचे धागेदोरे आदित्य ठाकरेंपर्यंत पोचणार, कोविड काळाचा गैरवापर करुन ठाकरे परिवाराने पैसे कमावले, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करा - शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांची मागणी प्रतिनिधी -मुंबई महापालिका कोविड घोटाळ्याची चौकशीला खरे पाहता विलंब झाला आहे. पहिल्या तीन महिन्यात कारवाई व्हायला हवी होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत संयम बाळगला आहे. सध्या जी कारवाई होत आहे ती गेल्यावर्षी दाखल झालेल्या तक्रारीवर होत आहे. त्यामुळे १ जुलैचा मोर्चा व या कारवाईचा काही संबंध नाही. कोविड घोटाळ्यातील सूरज चव्हाण व इतरांच्या चौकशीचे धागेदोरे निश्चितपणे आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोचणार आहेत. चव्हाण हा आदित्यची सावली बनून होता. त्यामुळे ईडीने अधिक जलद कारवाई करावी, अन्यथा माल कुठे तरी नेऊन ठेवतील, असा हल्ला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव, प्रवक्ते माजी आमदार किरण पावसकर यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे परिवार व उबाठा गटावर चढवला. सामान्यांना त्रास देण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला त्यांना माफ करुन चालणार नाही, असे ते म्हणाले. आजच्या ईडीच्या धाडीत आदित्यच

ईडीकडून मुंबईत छापेमारी, महापालिका कोविड घोटाळ्याची चौकशी संबंधित कारवाई

 ईडीकडून मुंबईत छापेमारी,  महापालिका कोविड घोटाळ्याची चौकशी संबंधित कारवाई  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळ्याबाबत कॅगने ताशेरे ओढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलिस आयु्क्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. त्या चौकशीपाठोपाठ ईडीने आज सकाळपासून कोविड घोटाळ्याबाबत मुंबईत छापे टाकले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजीत पाटकर, तत्कालिन अतिरिक्त आयुक्त संजीव जायस्वाल यांच्याशी संबंधित ठिकाणी छापेमारी सुरु आहे.  कोविड काळात कंत्राट मिळालेल्या लाईफलाईन कंपनीच्या प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबत ही छापेमारी सुरु असल्याचे सांगण्यात आले.  आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय व ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी देखील छापा टाकण्यात आला आहे. 

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयासाठी पदनिर्मितीसह त्यासाठीच्या खर्चासही मान्यता- वैद्यकीय शिक्षण मंत्री

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयासाठी पदनिर्मितीसह त्यासाठीच्या खर्चास मान्यता-  गिरीष महाजन लोकमानस प्रतिनिधी  मुंबई  :  रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी क्षमतेसह संलग्नीत ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मागील वर्षी मान्यता देण्यात आली होती. आता रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीस मान्यता देण्यात आली असून याकरीता रु. १०५.७८ कोटी खर्चासही मान्यता देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास ,  वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी माहिती दिली.             मंत्री गिरीष महाजन म्हणाले की , युती शासनाचा मागील ०९ वर्षात १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आले आहेत. रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तसेच सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संलग्नित ५०० रुग्णखाटांच्या रुग्णालयाच्या रुपात कोकणवासीयांना  शासनाने  दुहेरी आरोग्यदायी भेट दिली असल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी हजारो नवीन डॉक्टर्स निर्माण होणार मंत्री गिरीष महाजन म्हणाले ,  स्वातंत्र्यानंतर मागील जवळपास ६० वर्षात केवळ ११ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक, गृह विभागाला सुनियोजनाचे निर्देश

इमेज
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ,  उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक,  गृह विभागाला सुनियोजनाचे निर्देश  लोकमानस प्रतिनिधी,               मुंबई :- आगामी बकरी ईद सणानिमित्त नियोजनाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ,  उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली.              सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री दीपक केसरकर ,  ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन कृषी मंत्री अब्दुल सत्तार ,  आमदार अबू आझमी ,  आमदार रईस शेख ,  मुख्य सचिव मनोज सौनिक ,  गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक ,  पोलीस महासंचालक रजनीश सेठ ,  मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर ,  मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय.एस.चहल ,  जमाते उलेमाचे राज्याचे अध्यक्ष नदीम सिद्दीकी ,  विविध जिल्ह्यातून आलेले मुस्लिम धर्मगुरू आणि समाज बांधव संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.  बकरी ईदसाठी हेल्पलाईन सुरु केली जाईल. बाजार समित्यांच्या बाहेर बकऱ्यांची विक्री करण्यास परवानगी दिली जाईल. पशुवैद्यकीय तपासणी शुल्क पुर्वीप

धर्मांतराबाबत चुकीची माहिती देणाऱ्याडीसीपीकडून जाहीर माफीची मागणी, सय्यद अली अश्रफ यांची मागणी

धर्मांतराबाबत चुकीची माहिती देणाऱ्या डीसीपीकडून जाहीर माफीची मागणी,   सय्यद अली अश्रफ यांची मागणी लोकमानस प्रतिनिधी  ठाणे- धर्मांतराबाबत चुकीची माहिती देऊन मुंब्रा ची बदनामी केल्याबद्दल उत्तर प्रदेश मधील गाजियाबाद येथील निपुण अगरवाल या पोलिस उपायुक्ताने राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर माफी मागावी,  अशी मागणी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी सदस्य व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस सय्यद अली अश्रफ यांनी केली आहे.  पोलिस उपायुक्तांना याबाबत कायदेशीर नोटिस पाठवण्यात आली आहे.  मुंब्रा मध्ये 400 हिंदूंचे मुस्लिम धर्मात धर्मांतर करण्यात आल्याची अत्यंत खोटी  माहिती सदर पोलिस उपायुक्ताने दिली होती.   सदर पोलिस उपायुक्ताने खोटी माहिती दिल्याबद्दल माफी मागावी,  वृत्तवाहिन्यांवर चुकीची माहिती देऊन जाणिवपूर्वक बदनामी करणाऱ्या निपुण अदरवाल या उपायुक्ताने व्यक्तिश: वृत्तवाहिनीवर माफी मागावी,  अशी कायदेशीर नोटिस पाठवण्यात आल्याची माहिती सय्यद अली अश्रफ यांनी दिली.

मुंबई मराठी पत्रकार संघाचा यंदाचा शोधपत्रकारिता पुरस्कार शर्मिला कलगुटकर यांना जाहीर

मुंबई मराठी पत्रकार संघाचा यंदाचा शोधपत्रकारिता पुरस्कार शर्मिला कलगुटकर यांना जाहीर ,  श्रीकांत नाईक, अनिकेत जोशी, नंदकुमार पाटील आणि सचिन वैद्य यांनाही पुरस्कार  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाचा यंदाचा पद्मश्री यमुनाताई खाडिलकर स्मृती शोधपत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार शर्मिला कलगुटकर यांना जाहीर झाला असून, ज्येष्ठ मुद्रित शोधक श्रीकांत नाईक, ज्येष्ठ संपादक अनिकेत जोशी, पत्रकार नंदकुमार पाटील आणि छायाचित्रकार सचिन वैद्य हेही यंदाच्या अन्य पत्रकारिता पुरस्कारांचे मानकरी आहेत. बुधवारी २१ जून रोजी पत्रकार संघाच्या वर्धापन दिन सोहळ्यात पत्रकार भवन येथे हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. या सोहळ्यासाठी महनीय प्रवक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि शैलीदार लेखक शिरीष कणेकर उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ मुद्रित शोधक श्रीकांत नाईक यांची कविवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कारसाठी निवड करण्यात आली. सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केल्याबद्दल दिला जाणारा समतानंद अनंत हरि गद्रे पुरस्कार नंदकुमार पाटील यांना प्रदान केला जाईल.  तोला

शर्मिला कलगुटकर यांना यशस्विनी सन्मान पुरस्कार, पुण्यात २२ जूनला पुरस्कार वितरण

इमेज
  शर्मिला कलगुटकर यांना यशस्विनी सन्मान पुरस्कार, पुण्यात २२ जूनला पुरस्कार वितरण लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्यावतीने  'यशस्विनी सन्मान पुरस्कार' दिला जातो. यावर्षीचा 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान पुरस्कार' शर्मिला प्रभाकर कलगुटकर यांना जाहीर झाला आहे.  या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी आणि ज्येष्ठ लेखक, कवी जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम गुरुवारी  २२ जून रोजी  पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी १० वाजता होईल. 

बंदर व गोदी कामगारांच्या पाच वर्षाच्या बोनस समझोत्याला मान्यता

इमेज
  बंदर व गोदी कामगारांच्या पाच वर्षाच्या बोनस समझोत्याला मान्यता लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  भारतातील प्रमुख बंदरातील कामगारांचा बोनस व पगारवाढी बाबत मुंबई येथे १५ जून  रोजी  द्विपक्षीय वेतन समितीची मिटिंग झाली असून, या मिटिंगमध्ये गोदी कामगार महासंघाचे नेते व सर्व बंदरांचे चेअरमन यांच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर मुंबई पोर्ट व  इंडियन पोर्ट असोसिएशनचे चेअरमन राजीव जलोटा यांनी पी. एल.आर. ( बोनस ) प्रस्तावाला  संमती दिली.  त्यामुळे आता पी. एल. आर. (बोनस ) बाबत तीन वर्षां ऐवजी  २०२१ ते २०२६ असा पाच वर्षाचा  समझोता  मान्य झाला आहे. हा समझोता  केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर अमलात येईल. द्विपक्षीय  वेतन समितीच्या मिटिंगमध्ये फेडरेशनच्या सर्वच  कामगार नेत्यांनी व्यवस्थापनासमोर कोणत्याही अटीशिवाय पगारवाढीबाबत चर्चा केली जाईल, अशी ठाम भूमिका मांडली. या चर्चेनंतर आता पुढील मिटिंग १३ जुलै २०२३ रोजी  सकाळी १० वाजता विशाखापट्टणम येथे होणार आहे. या मिटिंगमध्ये मागणीपत्रावर चर्चेला सुरुवात होईल. सदर मिटींगला बंदर व गोदी कामगार महासंघाचे नेते सुधाकर अपराज, विद्याधर राणे, असीम सूत्रधार,

रेतीबंदर येथे सापडलेल्या अनोळखी महिलेच्या हत्येचे गूढ उकलण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आरोपीस पश्चिम बंगाल व त्याचे साथीदारास मुंबई येथून अटक

इमेज
रेतीबंदर येथे सापडलेल्या अनोळखी महिलेच्या हत्येचे गूढ उकलण्यात मुंब्रा पोलिसांना यश,   आरोपीस पश्चिम बंगाल व त्याचे साथीदारास मुंबई येथून अटक लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  वर्सोवा येथे महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रेतीबंदर, मुंब्रा येथे फेकुन देणाऱ्या मुख्य आरोपीस पश्चिम बंगाल व त्याचे साथीदारास मुंबई येथून अटक करून खूनाचा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यात मुंब्रा पोलीसांना यश मिळाले आहे.    २७ मे रोजी एका महिलेचा मृतदेह ओढणीने गळा आवळून बेडशिटमध्ये गुंडाळुन, प्लास्टीकच्या गोणीमध्ये भरून सेलो टेप लावून पॅकींग करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने विसर्जन घाट, रेतीबंदर मुंबा ठाणे येथे फेकुन दिलेला होता. त्याबाबत मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रा५७५ / २०२३ भा.द.वि.क. ३०२,२०१ अन्वये दाखल करण्यात आला. सदर मृतदेह हा अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील महिलेचा होता. मृतदेह कुजलेल्या व अळया पडलेल्या स्थितीत तसेच मयताचे अंगावरील कपडे व्यतिरीक्त काहीएक माहिती नसल्याने मृताची ओळख पटवुन गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान मुंब्रा पोलीसांसमोर होते. हा गंभीर गुन्हा उघडकीस आण

उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात २५ टक्के वाढ - शंभूराज देसाई

उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात २५ टक्के वाढ - शंभूराज देसाई  मुंबई, दि. १३ : शासनाला महसूल मिळवून देणाऱ्या विभागामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. या विभागाच्या महसुलात गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्याला विकासाच्या वाटेवर कायम ठेवण्यासाठी महसुलाचे संवर्धन करण्याबरोबरच अवैध मद्य निर्मिती व वाहतूक आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने थांबवणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.देसाई यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मागील एक वर्षात घेतलेल्या निर्णयाबाबत पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आयुक्त विजय सूर्यवंशी उपस्थित होते. मंत्री देसाई म्हणाले, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यार्कयुक्त आणि अमली पदार्थांवर उत्पादन शुल्क आकारले जाते. तसेच मद्यार्कयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवणे आणि त्यासंदर्भातल्या गुन्ह्यांचे अन्वेषण करण्याचीही जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाकडे आहे. महसूलवाढीसंदर्भात तसेच बनावट मद्य निर्मिती आणि बेकायदेशीर मद्य वाहतूक व विक्री रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याकडे लक्ष दे

होर्डिंग पडून जीवीतहानी झाल्यास होर्डिंग्ज मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार : आयुक्त

  होर्डिंग पडून जीवीतहानी झाल्यास होर्डिंग्ज मालकावर  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार : आयुक्त    लोकमानस प्रतिनिधी    ठाणे  : वादळी वाऱ्यामुळे पावसाळ्यात होर्डिंग्ज, झाडे उन्मळून पडणे तसेच झाडाच्या फांद्या पडून जीवीत वा वित्त हानी होवून नुकसान होणार नाही या दृष्टीने शहरातील सर्व होर्डिग्ज व होर्डिग्ज टॉवरचे स्ट्रक्चर ऑडिट करावे. तसेच शहरातील अनधिकृत मेटल स्ट्रक्चर निष्कसित करावीत, शहरातील होर्डिंग्ज पडून जर दुर्घटना घडली तर संबंधित होर्डिंग्ज कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व शहरातील अनधिकृत होर्डिंग तात्काळ हटविणे आणि रस्त्यांच्या कडेला असलेल्या व इतर ठिकाणच्या धोकादायक झाडांच्या फांद्यांच्या छाटणीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित विभागाला दिले आहे.             शहरातील होर्डिंगचे कालबद्ध पध्दतीने स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे यासाठी कालमर्यादा निश्चित करावी व अस्तित्वातील सर्व होर्डिंग टॉवरचे स्ट्रक्चरल ऑडिट संबंधितांकडून पंधरा दिवसात करुन घ्यावेत.  स्ट्रक्चर ऑडिटनंतर जे होर्डिंग सुरक्षित नसल्याचे आढळल्यास ते  होर्डिंग तात्काळ क

शेतकरीविरोधी कायदे पुस्तिकेचे 18 जूनला लातूर येथे प्रकाशन

इमेज
शेतकरीविरोधी कायदे पुस्तिकेचे 18 जूनला लातूर येथे प्रकाशन प्रतिनिधी  लातूर- शेतकरी पारतंत्र्य दिनाच्या निमित्ताने शेतकरी संघटनेद्वारा लातूर येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात अमर हबीब लिखित 'शेतकरीविरोधी कायदे' या मराठी पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे.  पत्रकार भवन येथे दुपारी १ वाजता होणाऱ्या या मेळाव्याला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, 19 मार्च पासून जिल्ह्यात परिक्रमा केलेले अनंत देशपांडे, किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब, डॉ राजीव बसरगेकर, अमृत महाजन हे मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरीविरोधी सीलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण व परिशिष्ट ९ च्या संबंधी सर्व शंका कुशंकांचे या पुस्तिकेत निरसन केले आहे. सीलिंग उठले तर पुन्हा जमीनदारी येईल का? भांडवलदार येतील का? स्वामिनाथन आयोगाची ती शिफारस शेतकऱयांच्या हिताची आहे का? शेतकरी आत्महत्याना कोण जबाबदार आहे? अशा 37 प्रश्नांची उत्तरे या पुस्तिकेत वाचता येतील. अमर हबीब यांनी ही पुस्तिका लिहिली आहे. ते सुरुवाती पासून शेतकारी आंदोलनात सक्रिय राहिले आहेत. त्यांना पत्रकारितेचा दीर्घ अनुभव आहे. त्यांच्या लेखणीतून साक

मराठी मालिकांतील उगवती तारका -- "प्रणिता आचरेकर"

इमेज
मराठी मालिकांतील  उगवती तारका --   "प्रणिता आचरेकर"   अगदी अल्प काळात अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अष्टपैलू कलाकार !!  आपल्या अभिनयाच्या विविध छटांमधून विविध रंग उधळत ती आज पुढे चालली आहे. तिच्या गुणांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. प्रणिता हे नाव ‘प्राण’ या संस्कृत शब्दावरून आले असून त्याचा अर्थ श्वास असा होतो. या नावाचे संदर्भानुसार अर्थ असू शकतात. याचा अर्थ ‘जीवनाने धन्य’ किंवा 'दीर्घायुषी' असाही होऊ शकतो.  याव्यतिरिक्त, ‘प्रेमाने भरलेला’ किंवा 'काळजी घेणारी उबदार व्यक्ती' असाही असू शकतो, थोडक्यात, प्रणिता हे मराठीत अनेक सकारात्मक अर्थ असलेले एक सुंदर नाव आहे. प्रणिताचा जन्म खेतवाडी, गिरगांवातला. तिच्या  शालेय शिक्षणाची सुरुवात गिरगांवातील सेंट टेरेसा शाळेमधून झाली परंतु बालपणीच जागेच्या अडचणीमुळे गिरगांवातून कळवा येथे राहण्यास जावं लागलं तिथे कळवा न्यु इंग्लिश स्कुल मधून शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयीन शिक्षण  एस.एम. शेट्टी महाविद्यालय,पवई येथून पूर्ण केलं. कळव्याला गेल्यानंतर सुद्धा तिने गिरगांवची पाळेमुळे घट्ट पकडुन ठेवली. प्रत्येक

मोंडची सुकन्या रिध्दिमा तारी हिचे 98.20% मिळवून एसएससी परीक्षेत सुयश

मोंडची सुकन्या रिध्दिमा तारी हिचे 98.20% मिळवून एसएससी परीक्षेत सुयश  लोकमानस प्रतिनिधी  ठाणे -  मोंड गावची सुकन्या रिध्दिमा देवराज तारी हिने दहावीच्या परीक्षेत 98.20 % गुण मिळवून घवघवीत यश मिळवले. ठाण्यातून परीक्षा दिलेल्या रिध्दिमाला संस्कृत मध्ये 99, गणितामध्ये 98, सोशल सायन्समध्ये 98, सायन्स व टेक्नॉलॉजी मध्ये 97, इंग्रजी मध्ये 92 व मराठीमध्ये 91 गुण मिळाले आहेत.   

मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती

मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती   लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी माजी मंत्री प्रा.  वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या जागी गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.  मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे.   अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस खासदार के. सी.  वेणुगोपाल यांनी ही नियुक्ती जाहीर केली.   गुजरात प्रदेश अध्यक्षपदी शक्तिसिंह गोहिल यांची,  पुदुच्चेरीच्या प्रदेशअध्यक्षपदी वैथिलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे

1 जुलैला मुंब्रा बंद डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

गाझियाबाद धर्मांतर प्रकरण,  1 जुलैला मुंब्रा बंद  डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा इशारा  लोकमानस प्रतिनिधी- ठाणे-  गाझियाबाद येथील एका पोलीस अधिकाऱयाने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतर करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही. मात्र, विकसीत होत असलेल्या मुंब्य्राला बदनाम करण्यासाठी अशा खोटÎा बातम्या पसरविल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी सत्य जाहीर करावे. अन्यथा, येत्या 1 जुलैला मुंब्रा बंद करण्यात येईल, असा  इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला.   उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिह्याच्या पोलीस अधीक्षकांनी मुंब्रा येथे सुमारे 400 मुलांचे धर्मांतर करण्यात आले असल्याचे जाहीर केले होते. कोणताही पुरावा नसताना अशा पद्धतीने भाष्य केल्याबद्दल डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.   ते म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या धार्मिक विद्वेषातून शासन पुरस्कृत दंगली होत आहेत. काल गाझीयाबाद येथील एका आयपीएस अधिकाऱयाने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतर झाले असल्याचे जाह

साडेचार कोटी रुपयांच्या अपहाराप्रकरणी सहाय्यक महाव्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

 साडेचार कोटी रुपयांच्या अपहाराप्रकरणी  सहाय्यक महाव्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  मशीन उत्पादक कंपनीत ४ कोटी ४१ लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या सहाय्यक महाव्यवस्थापकाविरोधात कफ परेड पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कंपनीत काम करणाऱ्या माजी सहाय्यक महाव्यवस्थापकाने कंपनीच्या खात्यातून एप्रिल २०१९ ते जुलै २०२१ या कालावधीत हा अपहार केल्याचे समोर आले आहे.  अशोक जाधव या आरोपीने कंपनीचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्या जागी आलेल्या नवीन अधिकाऱ्याला कंपनीच्या खात्यामध्ये अनियमितता आढळल्याने त्याने हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला. त्यानंतर कंपनीचे ऑडिट केल्यानंतर हा घोटाळा समोर आला.  जाधवने कंपनीच्या चेकवर संचालकांच्या बोगस स्वाक्षऱ्या केल्या व हा पैसा स्वतः तयार केलेल्या बनावट कंपनीमध्ये पाठवला. बॉंम्बे फ्ल्युइड सिस्टिम कॉम्पॉनन्टस प्रा. लि. कंपनीमध्ये हा घोटाळा करण्यात आला. या प्रकरणी कायदेशीर सल्ला देण्यासाठी एमझेडएम लिगल ही फर्म कार्यरत असून अॅड वसीम पांगारकर हे प्रकरण हाताळत आहेत.  आरोपीने कंपनीच्या खात्यातून यापेक्षा अधिक पैसा काढला असल्याची भीती कंपन

ठाणे महानगरपालिकेची मालमत्ता करापोटी अवघ्या 66 दिवसात 200 कोटींची विक्रमी वसुली

  ठाणे महानगरपालिकेची मालमत्ता करापोटी अवघ्या 66 दिवसात 200 कोटींची विक्रमी वसुली  लोकमानस प्रतिनिधी  ठाणे   :   मालमत्ता   कराच्या पहिल्या तिमाहीत  ठाणे महापालिकेने आर्थिक वर्षाच्या 66 दिवसात 200 कोटी रुपयांची    विक्रमी  मालमत्ता   कर   वसुली केली आहे. ठाणेकरांनी   मालमत्ता   कर   भरणा   कर ण्यास दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद प्रशंसनीय असल्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नमूद केले आहे.   ठाणे   महापालिकेने   चालू   (2023- 24) आर्थिक वर्षाची देयके 01   एप्रिल 2023 रोजी तयार करुन  याबाबत  नागरिकांना एस.एम.एस द्वारे अवगत केले होते.  या एस.एम.एस द्वारे मालमत्ता कराची देयके डाऊनलोड करणे, प्रिंट करणे तसेच ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्याकरिता अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. याला नागरिकांनी उत्स्फूर्त  प्रतिसाद दिला.             मालमत्ता कर नागरिकांना भरणे सोईचे व्हावे यासाठी सर्व प्रभागसमिती कार्यालयात कर संकलन केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून कार्यालयीन वेळेत तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सदर केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत. मालमत्ता कराची देयके प्रभाग समित

रवींद्र कुलकर्णी मुंबई विद्यापीठाच्या तर डॉ सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी

रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ; तर डॉ सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  डॉ रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे; तर डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ रवींद्र कुलकर्णी व डॉ सुरेश गोसावी यांच्या नियुक्तीची घोषणा केली.  राज्यपालांनी डॉ संजय घनश्याम भावे यांची डॉ  बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे.    डॉ रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत तर डॉ सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ संजय भावे हे डॉ  बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.

मुंबई विमानतळावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा

मुंबई विमानतळावर ३५० वा शिवराज्याभिषेक  सोहळा मोठ्या दिमाखात साजरा मुंबई - प्रतिनिधी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या  शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने मुंबई विमानतळावर भारतीय कामगार सेनेतर्फे दिमाखदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  वेदमंत्रांच्या घोषात शिवप्रतिमेवर अभिषेक करून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष होऊन त्या घटनेचे महत्त्व आजही तितकेच आहे. तमाम मराठी जनांसाठी ही महत्त्वाची घटना आहे. सकाळी आठ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला माजी मंत्री अॅड. अनिल परब, माजी केंद्रीय मंत्री व भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत, आमदार सुनिल प्रभू, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजीत साळवी, सरचिटणीस सचिन अहिर तसेच भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी, मुंबई विमानतळावरील कामगार व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   या सोहळ्यात सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम, पोवाडे, दांडपट्टा चालवण्याचे प्रात्यक्षिक, आदी विविध शिवकालीन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याला उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला. य

दक्षिण आफ्रिकेतील कॉमरेडस मॅरेथॉन स्पर्धेसाठी डॉ. असीर इनामदार रवाना

इमेज
 दक्षिण आफ्रिकेतील कॉमरेडस मॅरेथॉन स्पर्धेसाठी डॉ. असीर इनामदार रवाना प्रतिनिधी - ठाणे दक्षिण आफ्रिकेत ११ जून ला सुरु होणाऱ्या कॉमरेडस मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुंब्रा येथील डॉ. असीर इनामदार हे मंगळवारी रवाना झाले. कॉमरेडस मॅरेथॉन मधील ९० किमी अंतराच्या अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये डॉ. इनामदार सहभागी होणार आहेत. त्यानिमित्त त्यांना व गुजरन यांना  मुंब्रा कौसा मध्ये मुंब्रा रनर्स या संघटनेतर्फे तीन किमी अंतराची गुड लक रन आयोजित करुन सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.    डॉ.असीर इनामदार हे  ५८ वर्षीय वैद्यकीय व्यावसायिक असून वयाच्या ५३ व्या वर्षापासून त्यांनी धावण्यास प्रारंभ केला आहे. कॉमरेडस मॅरेथॉनला सुमारे १०० वर्षांची परंपरा आहे. या स्पर्धेत डोंगराळ भागात स्पर्धा चढ उतारावर धावावे लागते. कमाल १२ तासात ९० किमी धावणे गरजेचे आहे. डॉ. इनामदार यांनी आतापर्यंत ११ वेळा ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सतीश गुजरन यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. गेल्या चार पाच महिन्यांपासून ते डोंगराळ ठिकाणी धावण्याचा सराव करत आहेत. लोणावळा, लवासा, येऊर, अशा विविध ठिकाणी उंच जागी धावण्याचा सराव केला आ