रेतीबंदर येथे सापडलेल्या अनोळखी महिलेच्या हत्येचे गूढ उकलण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आरोपीस पश्चिम बंगाल व त्याचे साथीदारास मुंबई येथून अटक


रेतीबंदर येथे सापडलेल्या अनोळखी महिलेच्या हत्येचे गूढ उकलण्यात मुंब्रा पोलिसांना यश,  
आरोपीस पश्चिम बंगाल व त्याचे साथीदारास मुंबई येथून अटक
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - 
वर्सोवा येथे महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रेतीबंदर, मुंब्रा येथे फेकुन देणाऱ्या मुख्य आरोपीस पश्चिम बंगाल व त्याचे साथीदारास मुंबई येथून अटक करून खूनाचा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यात मुंब्रा पोलीसांना यश मिळाले आहे.  

 २७ मे रोजी एका महिलेचा मृतदेह ओढणीने गळा आवळून बेडशिटमध्ये गुंडाळुन, प्लास्टीकच्या गोणीमध्ये भरून सेलो टेप लावून पॅकींग करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने विसर्जन घाट, रेतीबंदर मुंबा ठाणे येथे फेकुन दिलेला होता. त्याबाबत मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रा५७५ / २०२३ भा.द.वि.क. ३०२,२०१ अन्वये दाखल करण्यात आला. सदर मृतदेह हा अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील महिलेचा होता. मृतदेह कुजलेल्या व अळया पडलेल्या स्थितीत तसेच मयताचे अंगावरील कपडे व्यतिरीक्त काहीएक माहिती नसल्याने मृताची ओळख पटवुन गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान मुंब्रा पोलीसांसमोर होते.

हा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्या
वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे   पोलीस उपायुक्त गणेश गावडेयांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. संतोष उगलमुगले, स.पो.नि. कृपाली बोरसे व पोउपनि नितीन भोसले व २० पोलीस अंमलदार यांची तीन विशेष पथके नेमुन आरोपीचा शोध घेवून अटक करणेबाबत मार्गदर्शन केले.

एका पथकामधील अधिकारी व अंमलदार यांनी प्रथम ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, मुंबई शहर, मिरा-भायंदर आयुक्तालयातील २५ ते ३० वर्षे वयोगटातील मिसींग महिलांची माहिती घेवुन त्याची पडताळणी करण्यात आली. मात्र त्यातुन गुन्हयाचे अनुषंगाने कोणतीही उपयुक्त माहिती मिळुन आली नाही.

मयत महिलेचा मृतदेह 27 मे रोजी मिळुन आला होता. मृतदेहाचे स्थितीवरून तीचा मृत्यु अंदाजे मागील ३ ते ४ दिवसापुर्वी झालेला असावा त्या अनुषंगाने दुसऱ्या पथकातील सपोनि उगलमुगले व अंमलदार यांनी घटनास्थळाची पाहणी करून, त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे दिनांक २० मे ते २७ मे या दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून ते फुटेज सतत ५ दिवस बारकाईने निरीक्षण करत असतांना २४ मे रोजी रात्रौ १०च्या सुमारास घटनास्थळावर एका तीन चाकी टेम्पोच्या संशयास्पद हालचाली दिसुन आल्या परंतु सदर टेम्पोचा क्रमांक अस्पष्ट दिसत असल्याने संशयीत टेम्पो ज्या दिशेने गेला त्या मार्गावरील सुमारे २० ते २२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. नंतर संशयीत टेम्पोचा रजिस्ट्रेशन क्रमांक MH02-FL-2903 असा असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरुन टेम्पोची ओळख पटवण्यात आली.  सदरचा टेम्पो नबाब नुरु शेख, रा. रूम नंबर सी / १२, गुलमोहर को. ऑप हौ. सोसायटी, प्लॉट नंबर ५६, म्हाडा, एम. टी. एन. एल. एक्सचेंज पाठीमागे, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३, मोबाईल क्रमांक ८२९१५१९१८५ याचे नावावर असल्याची माहिती मिळाली.  पत्त्यावर जावुन तपास केला असता, तेथे राहणारे भाडेकरू यांनी टेम्पो मालकाबाबत माहिती देवुन घटनास्थळावरील मयत महिलेचा फोटो दाखवण्यात आला. त्या फोटोतील महिला त्याच रूम मध्ये राहणान्या नबाब नुरु शेख याची पत्नी असल्याची माहिती मिळाली.   तसेच फोटोतील मृतदेह गुंडाळण्यासाठी वापरलेले बेडशीट, ओढणी इ. ओळखुन सदरचे बेडशीट व उशी ही तीची असुन दि. २४ मे रोजी नवाब घेवुन गेला असुन त्याने ते खराब झाल्याने फेकुन दिल्याबाबत माहिती दिली. तसेच मयत महिला ही 24 मे पासून व नवाब हा दि. २५ मे पासुन घरी आले नसल्याचे सांगीतले.

नवाब शेख हा त्याचे मुळ गांव मुर्शीदाबाद, पश्चिम बंगाल येथे पळुन गेल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ सपोनि उगलमुगले व पथक हे संशयीताचा शोध घेणेकरीता पश्चिम बंगाल येथे रवाना झाले.

पोनि निकम, मसपोनि बोरसे, पोउपनि भोसले व अंमलदार यांनी वर्सोवा, अंधेरी मुंबई येथे जावुन घटनास्थळाचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्याचे निरीक्षण केले असता नवाब शेख यांचेसह एक इसमाच्या संशयास्पद हालचाली आढळुन आल्याने त्याचा शोध घेवून ५ जून रोजी त्यास वर्सोवा अंधेरी मुंबई येथून ताब्यात घेतले. त्याचे नाव सलमान उर्फ रज्जन कुल्लु खान वय २० वर्षे आहे. गुन्हयाचे अनुषंगाने त्याचेकडे केलेल्या कौशल्यपुर्ण तपासामध्ये मयत महिलेचे नांव मुन्नी असुन ती नबाब शेख याची पत्नी असल्याचे सांगुन दिनांक २४ मे रोजी दुपारी रूममध्ये नवाब याने मुन्नीचा गळा आवळला व सलमान याने पाय दाबुन धरून खुन केल्याचे सांगीतल्याने त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्हयात  5 जून रोजी अटक करण्यात आली.

मुख्य आरोपी नवाब यास ताब्यात घेण्याकरीता पश्चिम बंगाल येथील पोलीस पथक हे त्याचा शोध घेत होते. नवाब याने अतिशय नियोजनबद्ध रितीने खून करून पकडले जावु नये म्हणुन त्याचेकडील मोबाईल बंद करून तो वेगवेगळया ठिकाणी लपुन राहत होता. मुर्शीदाबाद व बर्धमान या दोन जिल्हयात सतत ८ दिवस अविरतपणे कौशल्यपूर्ण तपास करून तांत्रीक
तपास व गोपनिय बातमीदारांचे आधारे आरोपीत नबाब शेख यांस बेलदंगा जिल्हा मुर्शीदाबाद राज्य - पश्चिम बंगाल येथुन दिनांक ७ जून रोजी शिताफीने ताब्यात घेतले. त्याचे नांव नवाब नुरू शेख, वय-२७ वर्षे आहे. त्याचेकडे केलेल्या तपासामध्ये त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने  बहीरामपुर, मुर्शीदाबाद, पश्चिम बंगाल येथुन ट्रान्झीट रिमांड घेवुन मुंब्रा पोलीस ठाणे येथे आणुन अटक करण्यात आली असुन दोन्ही आरोपींना १७ जून  पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

मुख्य आरोपी नवाब याचेकडे सखोल तपास केल्यावर मयत महिला ही त्याची पत्नी असुन तीचे नांव उम्मेजान बीबी उर्फ मुन्नी नवाब शेख, वय-२६ वर्षे, असे असुन सन २०१२ मध्ये तीचेशी विवाह केला होता. परंतु ती मुंबईमध्ये त्याचेसोबत सतत राहत नसल्याने तो तीच्या चारीत्र्याचा संशय घेत असल्याने त्यांचेमध्ये वाद होत होते. चारीत्र्या च्या संशयावरून त्याने तीचा दिनांक २४ मे रोजी दुपारी २ वा. सुमारास त्याचा साथीदार सलमान याचे मदतीने तीचा गळा आवळुन, खून करून तीचे प्रेत बेडशिटमध्ये गुंडाळुन, प्लास्टीकच्या गोणीमध्ये भरून सेलोटेप चिटकवुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे टेम्पोमधून वर्सोवा अंधेरी मुंबई येथुन विसर्जन घाट, रेतीबंदर मुंब्रा ठाणे येथे दिनांक २४ मे रोजी रात्रौ १० च्या सुमारास फेकुन दिले.

नमुद गंभीर गुन्हा उघडकीस आणण्याची उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त,  डॉ. महेश पाटील,  पोलिस उपायुक्त गणेश गावडे,
सहाय्यक पोलीस आयुक्त विलास शिंदे   यांचे मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पोलीस निरीक्षक संजय पवार, पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम, सपोनि संतोष उगलमुगले, सपोनि कृपाली बोरसे, सपोनि अजय कुंभार, पो.उप निरी. नितीन भोसले, पो.उप निरी. प्रसाद चव्हाण, पो.उप निरी. मेहबुब मकानदार सपोउपनिरी दिपक जाधव व अंमलदार सतिश खाबडे, अजिज तडवी, तुषार महाले, संतोष पवार, तेजस परब, अर्जुन जुवाटकर, बाबुराव खरात, संतोष गायकवाड, निळकंठ लोंढे, मयुर लोखंडे, कृष्णा आव्हाड, प्रमोद जमदाडे, नवनाथ चव्हाण, भुषण खैरणार, सोपान काकड, आण्णासो एडके व समाधान माळी यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे), बाबासाहेब निकम हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही