मुंबई मराठी पत्रकार संघाचा यंदाचा शोधपत्रकारिता पुरस्कार शर्मिला कलगुटकर यांना जाहीर



मुंबई मराठी पत्रकार संघाचा यंदाचा शोधपत्रकारिता पुरस्कार शर्मिला कलगुटकर यांना जाहीर

श्रीकांत नाईक, अनिकेत जोशी, नंदकुमार पाटील आणि सचिन वैद्य यांनाही पुरस्कार
 लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाचा यंदाचा पद्मश्री यमुनाताई खाडिलकर स्मृती शोधपत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार शर्मिला कलगुटकर यांना जाहीर झाला असून, ज्येष्ठ मुद्रित शोधक श्रीकांत नाईक, ज्येष्ठ संपादक अनिकेत जोशी, पत्रकार नंदकुमार पाटील आणि छायाचित्रकार सचिन वैद्य हेही यंदाच्या अन्य पत्रकारिता पुरस्कारांचे मानकरी आहेत. बुधवारी २१ जून रोजी पत्रकार संघाच्या वर्धापन दिन सोहळ्यात पत्रकार भवन येथे हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

या सोहळ्यासाठी महनीय प्रवक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि शैलीदार लेखक शिरीष कणेकर उपस्थित राहणार आहेत.

ज्येष्ठ मुद्रित शोधक श्रीकांत नाईक यांची कविवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कारसाठी निवड करण्यात आली.

सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केल्याबद्दल दिला जाणारा समतानंद अनंत हरि गद्रे पुरस्कार नंदकुमार पाटील यांना प्रदान केला जाईल. 

तोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्रकार पुरस्कार ज्येष्ठ छायाचित्रकार सचिन कमलाकर वैद्य यांना जाहीर झाला आहे.
 
'युगारंभ'कार सर्वोदयी कार्यकर्ते मधूसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्कारसाठी ज्येष्ठ संपादक अनिकेत जोशी यांची निवड करण्यात आली आहे.

  पत्रकार संघाकडे आलेले अर्ज आणि शिफारसी विचारात घेऊन पुरस्कार समितीने शनिवारी या पुरस्कारांचे मानकरी जाहीर केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही