ईडीकडून मुंबईत छापेमारी, महापालिका कोविड घोटाळ्याची चौकशी संबंधित कारवाई

 ईडीकडून मुंबईत छापेमारी, 

महापालिका कोविड घोटाळ्याची चौकशी संबंधित कारवाई 

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई -

मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळ्याबाबत कॅगने ताशेरे ओढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलिस आयु्क्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. त्या चौकशीपाठोपाठ ईडीने आज सकाळपासून कोविड घोटाळ्याबाबत मुंबईत छापे टाकले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजीत पाटकर, तत्कालिन अतिरिक्त आयुक्त संजीव जायस्वाल यांच्याशी संबंधित ठिकाणी छापेमारी सुरु आहे. 

कोविड काळात कंत्राट मिळालेल्या लाईफलाईन कंपनीच्या प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबत ही छापेमारी सुरु असल्याचे सांगण्यात आले. 

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय व ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी देखील छापा टाकण्यात आला आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब