दक्षिण आफ्रिकेतील कॉमरेडस मॅरेथॉन स्पर्धेसाठी डॉ. असीर इनामदार रवाना

 दक्षिण आफ्रिकेतील कॉमरेडस मॅरेथॉन स्पर्धेसाठी डॉ. असीर इनामदार रवाना

प्रतिनिधी - ठाणे
दक्षिण आफ्रिकेत ११ जून ला सुरु होणाऱ्या कॉमरेडस मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुंब्रा येथील डॉ. असीर इनामदार हे मंगळवारी रवाना झाले.
कॉमरेडस मॅरेथॉन मधील ९० किमी अंतराच्या अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये डॉ. इनामदार सहभागी होणार आहेत. त्यानिमित्त त्यांना व गुजरन यांना  मुंब्रा कौसा मध्ये मुंब्रा रनर्स या संघटनेतर्फे तीन किमी अंतराची गुड लक रन आयोजित करुन सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.


  
डॉ.असीर इनामदार हे  ५८ वर्षीय वैद्यकीय व्यावसायिक असून वयाच्या ५३ व्या वर्षापासून त्यांनी धावण्यास प्रारंभ केला आहे.
कॉमरेडस मॅरेथॉनला सुमारे १०० वर्षांची परंपरा आहे. या स्पर्धेत डोंगराळ भागात स्पर्धा चढ उतारावर धावावे लागते. कमाल १२ तासात ९० किमी धावणे गरजेचे आहे. डॉ. इनामदार यांनी
आतापर्यंत ११ वेळा ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सतीश गुजरन यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. गेल्या चार पाच महिन्यांपासून ते डोंगराळ ठिकाणी धावण्याचा सराव करत आहेत. लोणावळा, लवासा, येऊर, अशा विविध ठिकाणी उंच जागी धावण्याचा सराव केला आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी धावण्यास प्रारंभ केला.

इनामदार गेल्या ३२ वर्षांपासून मुंब्रा येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. २०१८ पासून त्यांनी  प्रथम मॉरनिंग वॉक सुरु केले .नंतर धावणे सुरू केले .रोजच धावण्याचा सराव करत स्थानिकांना ही पळण्यास उद्युक्त केले .तरूण धावकासोबत मिळून "मुंब्रा रनर्स"ची स्थापना केली.हळूहळू मुंबई व जवळील स्पर्धांमध्ये भाग घेतला.
२०१९ मधे जगप्रसिध्द टाटा मुंबई मॅराथॉन मधे भाग घेऊन ५० वर्षे वरील वयोगटात दुसरा क्रमांक पटकावला.२०२१ ला इंदापूर (पुणे) व २०२२ ला औरंगाबाद येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स मधे १० किमी.व ५कि.मी घ्या शर्यतीत सिल्वर तर १५०० मीटर्स मधे सुवर्ण पदके मिळवली. २०२३ ला संपन्न झालेल्या टाटा मुंबई मॅराथॉन मधे ४२.२ किमी अंतर ४.१७ तासात यशस्वीरित्या पूर्ण करून जगप्रसिध्द "काॅमरेडस" मॅराथॉन करीता पात्र ठरले. दक्षिण आफ्रिकेत गेल्या १०० वर्षापासून होत असलेली ही ९० कि.मी.ची मॅराथॉन स्पर्धा आहे .संपूर्ण पीटरमाझबर्ग ते डरबान  रस्त्यावर चढ उतारच असलेल्या एकूण सुमारे ११०० मीटर ऊंची पर्यंत धावकाना पळावे लागते. मुंब्रा येथून सहभागी होणारे ते एकमेव स्पर्धक आहेत. देशातून प्रथमच ४०३ स्पर्धक भाग घेत आहेत . 
डॉ.असदुल्ला खान यांच्या हस्ते भारताचे प्रतिनिधीत्व करणा-या या दोघांना 'तिरंगा' ध्वज देण्यात आला.या छोटेखानी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीता ने करण्यात आली .यावेळी मुंब्रा रनर्स चे संस्थापक इर्शाद आगा,आतिफ सय्यद,डॉ.सुहेल शेख सोबदत डॉ.सरफराज,डॉ.शफी,शाहीद खान ,जावेद चौधरी,राशिद खान ,नसीम शेख,कोच वसीम सिद्दीकी ,समीर नाईक,मोअझ्झम शेख,प्रो.एजाज अन्सारी ,अमीन अन्सारी,रियाझ शेख उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही