धर्मांतराबाबत चुकीची माहिती देणाऱ्याडीसीपीकडून जाहीर माफीची मागणी, सय्यद अली अश्रफ यांची मागणी

धर्मांतराबाबत चुकीची माहिती देणाऱ्या
डीसीपीकडून जाहीर माफीची मागणी,  
सय्यद अली अश्रफ यांची मागणी
लोकमानस प्रतिनिधी 
ठाणे- धर्मांतराबाबत चुकीची माहिती देऊन मुंब्रा ची बदनामी केल्याबद्दल उत्तर प्रदेश मधील गाजियाबाद येथील निपुण अगरवाल या पोलिस उपायुक्ताने राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर माफी मागावी,  अशी मागणी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी सदस्य व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस सय्यद अली अश्रफ यांनी केली आहे.  पोलिस उपायुक्तांना याबाबत कायदेशीर नोटिस पाठवण्यात आली आहे. 
मुंब्रा मध्ये 400 हिंदूंचे मुस्लिम धर्मात धर्मांतर करण्यात आल्याची अत्यंत खोटी  माहिती सदर पोलिस उपायुक्ताने दिली होती.  
सदर पोलिस उपायुक्ताने खोटी माहिती दिल्याबद्दल माफी मागावी,  वृत्तवाहिन्यांवर चुकीची माहिती देऊन जाणिवपूर्वक बदनामी करणाऱ्या निपुण अदरवाल या उपायुक्ताने व्यक्तिश: वृत्तवाहिनीवर माफी मागावी,  अशी कायदेशीर नोटिस पाठवण्यात आल्याची माहिती सय्यद अली अश्रफ यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही