मुंबई विमानतळावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा

मुंबई विमानतळावर ३५० वा शिवराज्याभिषेक  सोहळा मोठ्या दिमाखात साजरा
मुंबई - प्रतिनिधी 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या  शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने मुंबई विमानतळावर भारतीय कामगार सेनेतर्फे दिमाखदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  वेदमंत्रांच्या घोषात शिवप्रतिमेवर अभिषेक करून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष होऊन त्या घटनेचे महत्त्व आजही तितकेच आहे. तमाम मराठी जनांसाठी ही महत्त्वाची घटना आहे.

सकाळी आठ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला माजी मंत्री अॅड. अनिल परब, माजी केंद्रीय मंत्री व भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत, आमदार सुनिल प्रभू, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजीत साळवी, सरचिटणीस सचिन अहिर तसेच भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी, मुंबई विमानतळावरील कामगार व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 या सोहळ्यात सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम, पोवाडे, दांडपट्टा चालवण्याचे प्रात्यक्षिक, आदी विविध शिवकालीन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याला उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला. या उत्सवाला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त व्हावे, या उद्देशाने हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आल्याची माहिती  या कार्यक्रमाचे आयोजक व भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब