साडेचार कोटी रुपयांच्या अपहाराप्रकरणी सहाय्यक महाव्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

 साडेचार कोटी रुपयांच्या अपहाराप्रकरणी  सहाय्यक महाव्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

 लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई - 

मशीन उत्पादक कंपनीत ४ कोटी ४१ लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या सहाय्यक महाव्यवस्थापकाविरोधात कफ परेड पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कंपनीत काम करणाऱ्या माजी सहाय्यक महाव्यवस्थापकाने कंपनीच्या खात्यातून एप्रिल २०१९ ते जुलै २०२१ या कालावधीत हा अपहार केल्याचे समोर आले आहे. 

अशोक जाधव या आरोपीने कंपनीचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्या जागी आलेल्या नवीन अधिकाऱ्याला कंपनीच्या खात्यामध्ये अनियमितता आढळल्याने त्याने हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला. त्यानंतर कंपनीचे ऑडिट केल्यानंतर हा घोटाळा समोर आला. 

जाधवने कंपनीच्या चेकवर संचालकांच्या बोगस स्वाक्षऱ्या केल्या व हा पैसा स्वतः तयार केलेल्या बनावट कंपनीमध्ये पाठवला. बॉंम्बे फ्ल्युइड सिस्टिम कॉम्पॉनन्टस प्रा. लि. कंपनीमध्ये हा घोटाळा करण्यात आला. या प्रकरणी कायदेशीर सल्ला देण्यासाठी एमझेडएम लिगल ही फर्म कार्यरत असून अॅड वसीम पांगारकर हे प्रकरण हाताळत आहेत. 

आरोपीने कंपनीच्या खात्यातून यापेक्षा अधिक पैसा काढला असल्याची भीती कंपनीला वाटत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही