शर्मिला कलगुटकर यांना यशस्विनी सन्मान पुरस्कार, पुण्यात २२ जूनला पुरस्कार वितरण

 


शर्मिला कलगुटकर यांना यशस्विनी सन्मान पुरस्कार, पुण्यात २२ जूनला पुरस्कार वितरण

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्यावतीने  'यशस्विनी सन्मान पुरस्कार' दिला जातो. यावर्षीचा 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान पुरस्कार' शर्मिला प्रभाकर कलगुटकर यांना जाहीर झाला आहे. 



या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी आणि ज्येष्ठ लेखक, कवी जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम गुरुवारी  २२ जून रोजी  पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी १० वाजता होईल. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब