प्रभाग क्रमांक 30 मधील नागरिक पाणीटंचाईने त्रस्त,राजकीय दबावामुळे त्रास होत असल्याचा नगरसेवकांचा आरोप
नफिसा गिरकर : मुंब्रा कौसा मधील प्रभाग क्रमांक 30 मधील नागरिक गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त आहेत. रमजान महिना सुरू असताना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. या प्रभागातून एम आय एम चे चारही नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष व प्रशासनाकडून जाणीवपूर्वक पाणीटंचाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. या परिसरात अमिनाबाद,एमटीएनएल कंपाऊंड,शरीफा रोडचा मागील काही भाग अशा ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणी येणे, दोन-तीन दिवसातून एकदा पाणी येणे अशा तक्रारी स्थानिक नागरिकांकडून केल्या जात आहेत . राजकीय कुरघोडीतून ही समस्या उद्भवल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना टँकरने पाणी वापरण्याची वेळ फेब्रुवारी महिन्यातच आली आहे. येथील स्थानिक नगरसेवक नफीस अन्सारी यांनी पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ कर्मचारी व प्रशासन दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करून असे काम करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. एका दिवसात तब्बल 12 टँकरने पाणीपुरवठा केला आला असून नागरिकांचे हाल होऊ नयेत याची काळजी घेण्यात आल्याचे ते म्हणाले. वॉल...