राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय शिबिराचा 300 पेक्षा जास्त रुग्णांना लाभ



नफिसा गिरकर : मुंब्रा -  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय शिबिराचा लाभ 300 पेक्षा जास्त रुग्णांनी घेतला. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंब्रा कौसा मध्यवर्ती कार्यालयात मोफत होमिओपॅथिक औषधे व थेरपी कॅम्पचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले होते.


यामध्ये परिसरातील रुग्णांनी भेट देऊन या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी रुग्णांना एका आठवड्याची औषधे विनामूल्य देण्यात आल्याची माहिती तौहिद शेख यांनी दिली.डॉक्टर लियाकत परमार व त्यांच्या पथकाने यावेळी रुग्णांची तपासणी केली. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला ,राजन किने ,इब्राहिम राऊत,माजी नगरसेवक जफर नोमानी ,रिदा रशीद, रफीक शेख,मैनुल खान व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब