प्रेषित मोहम्मद यांचा सोशल मीडियावर अवमान; गुन्हा दाखल


नफिसा गिरकर:  सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हॉट्सअँप स्टेटस ठेवून प्रेषित मोहम्मद यांचा अवमान केल्याप्रकरणी ब्रिजेश दुबे विरोधात मंगळवारी मुंब्रा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.


मुंब्रा येथे राहणारा ब्रिजेश दुबे याने त्याच्या व्हॉट्सअँप स्टेटसवर एक व्हिडिओ ठेवला होता. त्या व्हिडिओमध्ये प्रेषित मोहम्मद  व इस्लाम धर्माविरूद्ध अपमानास्पद व आक्षेपार्ह उद्गार काढण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अब्दुल अझीम शेख यांनी मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीची पोलिसांनी तत्काळ दखल घेत ब्रिजेश दुबे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता 2023 अंतर्गत कलम 299, 356(2),  आणि 353(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित व्हिडिओ व सोशल मीडिया पोस्टची चौकशी करण्यात येत आहे. आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हा गुन्हा दाखल करण्याच्या व कारवाई करण्याच्या मागणीसाठी सय्यद अली अश्रफ, तौहिद शेख, जफर नोमानी आणि रफिक शेख यांनी पाठपुरावा केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दारुल फलाह येथील गार्डन १० वर्षांनंतर पुन्हा खुले

मोंड-चिंचवाडी शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन, सत्यनारायणाची महापूजा संपन्न

मानसी घाडीची अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी