शमीम खान यांच्या तर्फे 800 पेक्षा जास्त गरजूंना रमजाननिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


 नफिसा गिरकर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शमीम  खान यांच्या माध्यमातून मुंब्रा कौसा मधील गरजू नागरिकांना रमजाननिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले सुमारे 800 पेक्षा जास्त लोकांना यावेळी हे वाटप करण्यात आले. 
 यावेळी समीर खान, शोएब खान, जावेद शेख,  जुबेर अन्सारी, नूर चौधरी, रफी मुल्ला, शायना अन्सारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
रमजान ईद उत्साहात साजरी व्हावी यासाठी  ईदच्या पूर्वसंध्येला सुमारे दहा ते बारा  हजार जणांना दूध, शेवया सुका मेवा, साखर अशा शिरखुर्मासाठी आवश्यक वस्तू गेल्या काही वर्षांपासून वाटत असून यंदाही ही परंपरा कायम ठेवून वाटप करण्यात येईल, असे शमीम खान म्हणाले

मुंब्रा कौसा परिसरातील ज्या गरजूंना दूध व शेवया हवे असतील त्यांनी पक्षाच्या तन्वर नगर येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन  खान यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब