आमदार ॲड. निरंजन डावखरे यांची भाजपच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती
नफिसा गिरकर : कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस (कोकण विभाग) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
आ. डावखरे यांनी भाजपच्या संघटनात्मक बळकटीसाठी प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा नगर परिषद, नगरपंचायत आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रभारी म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
त्यांच्या कार्यतत्परतेची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर नवीन महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
“भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, पक्षश्रेष्ठी तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माझ्यावर विश्वास ठेवून कोकण विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली, याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे, अशी प्रतिक्रिया डावखरे यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ॉ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम, दूरदर्शी आणि विकासाभिमुख नेतृत्वाखाली पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहील. कोकण विभागात संघटन अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांशी सुसंवाद वाढवणे आणि जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे, यासाठी मी कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.
आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या या निवडीमुळे कोकण विभागात भाजपला नवे बळ मिळेल, पक्षविस्तार आणि जनसंपर्क अधिक प्रभावीपणे राबवले जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा