ठाणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी जगदाळे तर विरोधी पक्षनेतेपदी शानू पठाण


नफिसा गिरकर : 
ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष पवार पक्षाचे शानू पठाण यांची तर सभागृह नेतेपदी शिवसेनेच्या हणमंत जगदाळे यांची निवड करण्यात आली. 
विरोधी पक्षनेते शानू पठाण


शानू पठाण यापूर्वी विरोधी पक्षनेते पदी कार्यरत होते तसेच हनुमंत जगदाळे देखील यापूर्वी सभागृह नेतेपदी होते.

ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये या निवडीची घोषणा करण्यात आली. जानेवारी मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत 131 सदस्य महापालिकेत 75 जागा मिळून शिवसेनेने स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. तर भारतीय जनता पार्टी 28, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार 12, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार 9, एम आय एम 5 व शिवसेना उबाठा यांना एका जागेवर विजय मिळाला होता. 

सभागृह नेते - हणमंत जगदाळे 

शुक्रवारी ठाणे महानगरपालिकेची पहिली महासभा पार पडली. त्यामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून कामकाज तहकूब करण्यात आले होते. ती सभा सोमवारी घेण्यात आली. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब