आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून मुंब्रा कौसा येथील तेरा शाळांना प्रोजेक्टर व संगणकांचे वितरण

नफिसा गिरकर: भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष तथा कोकण पदवीधर मतदार संघाचे विधान परिषदेचे सदस्य आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून मुंब्रा कौसा परिसरातील तेरा शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळांना प्रोजेक्टर आणि संगणक प्रदान करण्यात आले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण घेता  येईल. 

यासाठी भाजपच्या कौसा मंडळ अध्यक्षा नाझिया तांबोळी यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे  हा निधी उपलब्ध झाला असल्याचे सांगण्यात आले. वितरण कार्यक्रमादरम्यान शाळा प्रशासनांतर्फे आ.डावखरे व  तांबोळी यांचे आभार मानण्यात आले. 


विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर आणि संगणकांच्या साहाय्याने विविध विषय अधिक प्रभावीपणे समजून घेता येतील, डिजिटल माध्यमातून शिक्षण अधिक सोपे आणि आकर्षक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी डावखरे यांनी शैक्षणिक सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम शिक्षण मिळावे, यासाठी भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.


या उपक्रमामुळे मुंब्रा परिसरातील शैक्षणिक संस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस  चालना मिळणार आहे.डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून  शाळांमध्ये शैक्षणिक प्रगती व  कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने  ‘डिजिटल साहित्य वाटप करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ संकल्पना आणि  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि निरंजन डावखरे  यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीला पूरक असा हा उपक्रम आहे, असे  तांबोळी म्हणाल्या.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दारुल फलाह येथील गार्डन १० वर्षांनंतर पुन्हा खुले

मोंड-चिंचवाडी शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन, सत्यनारायणाची महापूजा संपन्न

मानसी घाडीची अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी