पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मेजर जनरल योगेंद्र सिंह यांनी स्वीकारला एनसीसीच्या अतिरिक्त महासंचालकपदाचा कार्यभार

इमेज
मेजर जनरल योगेंद्र सिंह यांनी स्वीकारला एनसीसीच्या अतिरिक्त महासंचालकपदाचा कार्यभार लोकमानस प्रतिनिधी  मुंबई : मेजर जनरल योगेंद्र सिंग यांनी महाराष्ट्र एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक या पदाचा कार्यभार मेजर जनरल वाय पी खंडुरी यांच्याकडून स्वीकारला. खंडुरी सैन्याच्या साडेतीन दशकांहून अधिक कारकिर्दीनंतर सेवानिवृत्त झाले. मेजर जनरल योगेंद्र सिंग यांची भारतीय सैन्यात  1988 मध्ये युपीएससी द्वारे निवड झाली आणि प्रतिष्ठित इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडूनमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना ब्रिगेड ऑफ गार्ड्सच्या 5 व्या बटालियनमध्ये नियुक्त करण्यात आले. साडेतीन दशकांहून अधिक काळ गाजवलेल्या कारकिर्दीत त्यांनी महत्त्वाच्या कमांड आणि स्टाफच्या नेमणुका केल्या आहेत. त्यांनी नियंत्रण रेषेवर, उच्च उंचीच्या भागात तसेच जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील बंडखोरी कारवायांमध्येही काम केले आहे. पश्चिम आघाडीवरील ओपी विजय (कारगिल) आणि ओपी पराक्रम या दोन्ही ठिकाणी त्यांनी भाग घेतला. त्यांच्या नियुक्तींमध्ये त्यांच्या युनिटची कमांड, पंजाबमधील स्वतंत्र मेकॅनाइज्ड इन्फंट्री ब्रिगेडची कमांड आणि पश्चिम सेक्टरवरील

कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु, निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु,  निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -   मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला.  अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन कोटी नोंदी तपासण्यात आल्या असून १३ हजार ४९८ जुन्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. या कुणबी नोंदी तपासण्याचे काम दररोज सुरु असून अशा नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यास देखील आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या नोंदी तपासताना मोडी आणि उर्दू भाषेतील दस्तावेज आढळून आला.  या कागदपत्रांचे भाषांतर करून जतन करण्यासाठी ते डिजिटाईज करून पब्लिक डोमेनवर आणून त्या आधारे कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यास देखील आज मान्यता देण्यात आली. न्या

पॅलेस्टाईन साठी मुंब्रा मध्ये सामूहिक प्रार्थना

इमेज
पॅलेस्टाईन साठी मुंब्रा मध्ये सामूहिक प्रार्थना मुंब्रा : पॅलेस्टाईनवर इस्त्राईलकडून सुरु असलेल्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व मृत्यू पावलेल्या नागरिकांसाठी मुंब्रा कौसा मध्ये सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. सलीम खान, मौलाना अली हैदर, मौलाना अनिस अश्रफी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना मोहम्मद उम्रैन मेहफूज रहमानी यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. अब्दुल रऊफ लाला कार्यक्रमाचे समन्वयक होते. मौलाना रहमानी यांनी यावेळी सलग 20 मिनिटे प्रार्थना केली. या कार्यक्रमाचे आयोजन युनायटेड मिल्ली फोरम तर्फे करण्यात आले होते.  उपस्ठित मौलानांनी यावेळी इस्राईली,अमेरिकी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन नागरिकांना केले. आम्ही केवळ पॅलेस्टाईनच्या सोबत नाही तर जगातील प्रत्येक अन्याय अत्याचाराच्या विरोधात असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी पॅलेस्टाईनच्या तसेच भारताच्या समर्थनार्थ व ईस्त्राईलच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. पॅलेस्टाईन व भारताचा तिरंगा फडकावून यावेळी उपस्थितांनी आपण या लढाईत पॅलेस्टाईनच्या सोबत असल्याचे जाहीर केले. मुंब्र

मोंड-चिंचवाडी शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन, सत्यनारायणाची महापूजा संपन्न

इमेज
मोंड-चिंचवाडी शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन    सत्यनारायणाची महापूजा संपन्न लोकमानस प्रतिनिधी मोंड चिंचवाडी मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.   त्या निमित्त सरस्वतीपूजन व 'श्री सत्यनारायणाची महापूजा '  शनिवारी  सकाळी आयोजित करण्यात होती. समितीचे उपाध्यक्ष  हिराकांत  जोशी यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली.       शालेय विद्यार्थ्यांनी पाटी पूजन करून सरस्वती पूजन केले व त्यानंतर आरती करण्यात आली. ग्रामस्थ व पाहुणे मंडळींना दुपारी महाप्रसाद देण्यात आला मोंड चिंचवाडी मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना ०१/०८/१९४९ साली झाली. यंदा शाळेचे ७५ वे  वर्ष चालू आहे. ०१/०८/२०२३ ते ०१/०८/२०२४ पर्यंत अमृत महोत्सवी वर्ष साजरा केला जात आहे.       बापर्डे केंद्रशाळेच्या माने मॅडम, मोंड शाळेच्या कालिंदी माणगावकर  माजी शिक्षक विजय बापट, यूनियन बँकचे देवेन्द्र गुरव, राजाराम राणे (माजी सभापती),बाळा कोयंडे, मोंड ग्रामपंचायत सदस्य प्रसाद कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.          शाळ

मुंब्रा येथील रोजगार मेळाव्याला तरुणांचा चांगला प्रतिसाद, डझनहून अधिक कंपन्यांचे स्टॉल्स , 90 जणांना नियुक्ती

इमेज
मुंब्रा येथील रोजगार मेळाव्याला तरुणांचा चांगला प्रतिसाद,  डझनहून अधिक कंपन्यांचे स्टॉल्स , 90 जणांना नियुक्ती मुंब्रा :  डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व माजी नगरसेवक राजन किणे यांच्या संयुक्त विद्यमाने मुंब्रा आनंद कोळीवाडा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  या रोजगार मेळाव्यात शेकडो इच्छूक तरुण-तरुणींनी सहभाग घेतला त्यापैकी 90 जणांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.    मेळाव्याचे आयोजक राजन किणे म्हणाले की, मुंब्रा कौसा येथील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी  मुंब्रा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तरुणांच्या विकासाचा मार्ग सुगम झाला पाहिजे यासाठी शहरात रोजगार मेळाव्याचे आयोजन करून युवक-युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जात आहे.  बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी फाऊंडेशन सातत्याने प्रयत्न करत असते.  बेरोजगार तरुणांनी याचा लाभ घ्यावा,  असे आवाहन त्यांनी केले.   यावेळी नर्सिंग, आयटी, आयटी ऑल ट्रेड्स, गारमेंट, बॅक ऑफिस, मॅनेजमेंट, बँकिंग, सेल्स अँड मार्केटिंग क्षेत्रातील सुमारे 70 नामांकित कं

पॅलेस्टाईन समर्थनार्थ विना परवानगी निदर्शने, मुंब्रा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

पॅलेस्टाईन समर्थनार्थ विना परवानगी निदर्शने, मुंब्रा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल लोकमानस प्रतिनिधी मुंब्रा - मुंब्रा मधील दारुल फलाह मशीदीजवळ विना परवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ व ईस्त्राईलच्या विरोधात घोषणा देऊन निदर्शने करणाऱ्यांविरोधात मुंब्रा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात  याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संघटनेचे अध्यक्ष दाऊद शेख,सरचिटणीस सर्फराज शेख यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु असून त्यांना नोटिस देण्यात येईल व इतर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुंब्रा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिली. निदर्शकांनी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने तसेच विना परवानगी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करुन चित्रिकरण केल्याने भा.दं.वि. १८८, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी स.पो.नि.अजय गंगावणे पुढील तपास करत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पोलिस निरीक्षक बी.एस. निक

शिक्षण ,आरक्षण व संरक्षणासाठी शनिवारी मुंबईत मुस्लिम हक्क परिषदेचे आयोजन

शिक्षण ,आरक्षण व संरक्षणासाठी शनिवारी मुंबईत मुस्लिम हक्क परिषदेचे आयोजन लोकमानस प्रतिनिधी  मुंबई:-  मुस्लिमांना शिक्षण, आरक्षण व संरक्षणाबरोबरच सत्ता संपत्ती व प्रतीष्ठेमध्ये समान हक्क मिळाला पाहिजे यासाठी इस्लाम जिमखाना, मुंबई येथे शनिवार दि. २८ ऑक्टोबर, २०२३ रोजी  ‘मुस्लिम हक्क परिषदेचे’ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती  मौलाना आझाद विचार मंचाचे अध्यक्ष माजी खासदार  हुसेन दलवाई यांनी दिली . या परिषदेचे उद्घाटन जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री  फारुख अब्दुल्ला करतील व विशेष अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष  नाना पटोले, माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद  उपस्थित राहून मार्दर्शन करतील. या परिषदेस खासदार अरविंद सावंत, मुंबई कॉंग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, माजी खासदार मो. अदिब, आ. अमिन पटेल, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान,  माजी आमदार  युसुफ अब्राहनी,  मौलाना नदीम सिद्दिकी आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.    राज्यात मराठा व ओबीसी समा

ड्रग्ज माफियासोबतचा नजीब मुल्ला यांचा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसकडून सादर, मनिषा कायंदे आणि चुकीचे वृत्त दाखवणाऱ्या वाहिनीवर 100 कोटीचा दावा

इमेज
  ड्रग्ज माफियासोबतचा  नजीब मुल्ला यांचा  फोटो राष्ट्रवादी काँग्रेसकडून सादर,   मनिषा कायंदे आणि चुकीचे वृत्त दाखवणाऱ्या वाहिनीवर 100 कोटीचा दावा  लोकमानस प्रतिनिधी - ठाणे -    रस्त्यात काढलेल्या फोटोवर आमचे आणि अंमली पदार्थ विक्रेत्यांचे संबध आहेत, असा आरोप शिंदे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी केला आहे. तर, काहीकाळ राष्ट्रवादीमध्ये वास्तव्यास आलेले आनंद परांजपे यांनी शानू पठाण यांचे आर्थिक व्यवहार तपासावे, अशी मागणी केली आहे. आनंद परांजपे हे ‘महाज्ञानी’ आहेत. पण, ते ज्या ठिकाणी बसलेत तिथले नेते नजीब मुल्लाही ड्रग्ज माफिया सलमान फाळके याच्यासोबत फोटो काढत आहेत. त्यांचेही आर्थिक व्यवहार तपासण्याची गरज आहे.    आमचे जर ड्रग्ज माफियांशी संबंध असतील तर आम्ही फासावर चढण्यास तयार आहोत, असे सांगत मनिषा कायंदे यांच्या माहितीशी शहानिशा न करता चुकीचे वृत्त प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिनीला व कायंदे यांना 100 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस बजावली असून मुंब्रा पोलीस ठाण्यात भादंवि 500 अन्वये तक्रारही दाखल केली आहे, अशी माहिती ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि महापालिकेचे माज

कल्याण पूर्वेत ६६ लाखांची वीजचोरी करणाऱ्या २४८ जणांविरुद्ध कारवाई, टिटवाळ्यातही आढळले ८४ वीजचोर

कल्याण पूर्वेत ६६ लाखांची वीजचोरी करणाऱ्या २४८ जणांविरुद्ध कारवाई,  टिटवाळ्यातही आढळले ८४ वीजचोर कल्याण:  महावितरणच्या कल्याण पूर्व विभागात दोन दिवसांच्या व्यापक वीजचोरी शोध मोहिमेत ६६ लाख  रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. याप्रकरणी २४८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून टिटवाळा उपविभागातही ३८ लाख ७९ हजार रुपयांच्या वीजचोरी प्रकरणी एकाच दिवसात ८४ जणांविरुद्ध कारवाई झाली आहे. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर आणि कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील आणि कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वीजचोरी शोध मोहिम सुरू आहे. कल्याण पूर्व विभागातील अडिवली, ढोकली, मानपाडा, दावडी, हेदुटणे, घेसर, कोळेगाव, सोनारपाडा, काटेमानिवली, कटाई भागात ६ आणि १० ऑक्टोबरला व्यापक शोध मोहिम राबवण्यात आली. यात २४८ ग्राहकांकडे वातानुकूलन यंत्रणेसाठी थेट वीजवापर, मीटरमध्ये फेरफार, मीटरकडे येणाऱ्या केबलला टॅप करून वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. या ग्राहकांनी ६६ लाख रुपये किंमतीची ३ लाख ३ हजार ८०० युनिट विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून वीजचोरीचे देयक आणि तडजोडी

मुस्लिम समाजाला मागासलेल्या आधारावर आरक्षण बहाल करावे- नसीम खानराज्यात जातीनिहाय जनगणना त्वरित सुरु करण्याची मागणी

इमेज
मुस्लिम समाजाला मागासलेल्या आधारावर आरक्षण बहाल करावे- नसीम खान राज्यात जातीनिहाय जनगणना त्वरित सुरु करण्याची मागणी   लोकमानस  प्रतिनिधी:- मुंबई -2014 मध्ये काँग्रेस सत्तेत असताना मुस्लिम समाजातील मागासलेल्या 50 जातींना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली होती त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा सदर आरक्षण सुरू ठेवण्याचा निर्णयाला मंजुरी दिली होती. परंतु भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी सदर आरक्षण थांबविले. वारंवार मागणी करून सुद्धा मुस्लिम समाजाला आरक्षण बहाल होत नाही. तरी त्वरित मुस्लिम समाजाला मागासलेल्या आधारावर आरक्षण  बहाल करावे अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री मो. आरिफ (नसीम) खान यांनी मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या मुस्लिम संघटनाच्या प्रतिनिधीच्या बैठकीमध्ये बोलताना केली. या बैठकीला मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अभय ठपसे, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नसीम सिद्दिकी  माजी आमदार युसुफ अब्राहनी, निजामुद्दीन राईन व राज्यातील विविध जिल्ह्यातील म

विलेपार्ले विभागातील वाढत्या प्रदूषणाबाबत मनसेने घेतली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सचिवांची भेट

इमेज
विलेपार्ले विभागातील वाढत्या प्रदूषणाबाबत मनसेने घेतली  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सचिवांची भेट लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -   विलेपार्ले विधानसभा क्षेत्रात होणारे वाढते बांधकाम व वायू प्रदूषण याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव  सुधाकर तांबोळी यांनी शिष्टमंडळासहित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.अविनाश ढाकणे यांची भेट घेतली.  प्रदूषण ही मोठी समस्या आहे आणि हे प्रदूषण दिवसागणिक आपल्या जीवनाला नष्ट करीत आहे. प्रदूषण हे नैसर्गिक वातावरणाला दुषित करत आहे, या महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेने यावेळी सदस्य सचिवांसोबत चर्चा केली.    विलेपार्ले विधानसभा क्षेत्रातील वाढते वायुप्रदूषण, वाढती बांधकामे, शहरातील वाढती वाहने, ट्रॅफिक जॅम व त्यामुळे  वायुप्रदूषण झपाट्याने वाढले आहे,याचा परिणाम विभागातील जनतेच्या आरोग्यावर दिसू लागला आहे,सर्दी,खोकला व श्वसनाचे आजार वाढले आहेत याकरिता सुधाकर तांबोळी यांनी पर्यावरणाचा समतोल कसा राखता येईल यावर सविस्तर चर्चा व प्रदूषण रोखण्यासाठी त्वरित उ

हिंदु मुस्लिम एकत्र आल्याशिवाय देश पुढे जाणार नाही - जितेंद्र आव्हाड; मुंब्र्यात सर सय्यद दिवस साजरा

इमेज
 हिंदु मुस्लिम एकत्र आल्याशिवाय देश पुढे जाणार नाही,  रक्त सांडले तरी आरक्षण रद्द होऊ देणार नाही - जितेंद्र आव्हाड  मुंब्र्यात सर सय्यद दिवस साजरा मुंब्रा - प्रतिनिधी  देशाच्या हितासाठी हिंदू मुस्लिम समाज एकत्र येणे आवश्यक आहे, त्याशिवाय देश पुढे जाणार नाही,  सामाजिक व सांस्कृतिक माध्यमातून एकत्र आल्याशिवाय एकोप्याची भावना निर्माण होणार नाही, त्यासाठी दोन्ही समाजानी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.  सर सय्यद अहमद खान यांच्या जयंतीनिमित्त मुंब्रामध्ये सर सय्यद दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.  पाच हजार वर्षे आम्ही सामाजिक अन्याय सहन केला त्यामुळे रक्त सांडले तरी आरक्षण रद्द होऊ देणार नाही,  असा इशारा त्यांनी दिला.    यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अरफा खानम शेरवानी, माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान, तन्वीर आलम, अँड डॉ.  फारुख खान, तन्वीर आलम उपस्थित होते. सर सय्यद अवेरनेस फोरम, संघर्ष व डॉ असदुल्ला खान यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संघर्षच्या अध्यक्षा रुता आव्हाड यावेळी उपस्थित होत्या.  जितेंद्र आ

दिवा भाजपचे माजी अध्यक्ष रोहिदास मुंडेंचा उबाठा शिवसेनेत प्रवेश

इमेज
दिवा भाजपचे माजी अध्यक्ष रोहिदास मुंडेंचा उबाठा शिवसेनेत प्रवेश,   मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश लोकमानस प्रतिनिधी  दिवा:- दिवा भाजपचे माजी अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी  उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.  यावेळी शिवसेना नेते संजय राऊत,अरविंद सावंत,लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत,जिल्हाप्रमुख सदानंद थरवल यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. रोहिदास मुंडे त्यांच्यासह सौ.राजश्री मुंडे,कल्पिता मुंडे,विकास इंगळे,नागेश पवार,प्रशांत आंबोणकर,मूर्ती मुंडे,शनिदास पाटील,संजय जाधव,बैद्यनाथ पाडी,अक्षय वनगुळे,सागर पवार,सुधीर घाडीगांवकर, उत्तम सिंग,सचिन विश्वकर्मा, यांच्यासह दिव्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. रोहिदास मुंडे हे दिव्याच्या प्रश्नावर कायमच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राहिले आहेत. भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी दिव्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना चांगलेच अडचणीत आणण्याचे काम केले होते.आता मुंडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने दिव्यात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा संघर

श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२२ जाहीर

श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२२ जाहीर लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  मराठी ग्रंथ संग्रहालय,ठाणे ही संस्था  गेली ५ वर्षे  श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार‘चे आयोजन करीत आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीमध्ये २०२२ च्या स्पर्धेचे पुरस्कार घोषित करण्यात आले.   पुरस्कार पुढील प्रमाणे  अभिजित वामन पंडित पुरस्कृत चरित्र-आत्मचरित्र – ‘काजवा ‘, लेखक –पोपट श्रीराम, स्नेहलता दिगंबर कुलकर्णी पुरस्कृत  कादंबरी – ‘वेदनेचा क्रूस’, लेखक- लक्ष्मीकांत देशमुख , मेधा दामोदर सोमण पुरस्कृत कथा – ‘अर्ध्या माणसाची अर्धी गोष्ट ‘लेखक -सागर कुलकर्णी , मनीष वाघ व कविता वालावलकर पुरस्कृत कविता -  ‘शतकोत्तरी ओरखडा ‘ लेखक - राजीव लक्ष्मण जोशी, डॉ. हरिकांत शामराव भानुशाली स्मरणार्थ अनुवाद-  ‘कथायात्रा (निवडक हिंदी कथा )’ लेखक – चंद्रकांत भोंजाळ, वीणा पाटील (वीणा वर्ल्ड ) पुरस्कृत प्रवास – ‘ झोरीचा आणि सर्बिया ‘लेखक – राज वसंत शिंगे, राजेश मढवी पुरस्कृत इतिहास- ‘द बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’, लेखक - सुहास बहुलकर, दामोदर कृष्णाजी सोमण पुरस्कृत विज्ञान – तंत्रज्ञान ‘ पाण्य

मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय

आरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय पारदर्शक, मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकमानस प्रतिनिधी  मुंबई, दि. १८: परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या यावर्षापासून ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी करण्यात आली. या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्णत: पारदर्शकपणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.  दरम्यान, आज मुख्यमंत्री  शिंदे यांच्या हस्ते १६६ मोटार वाहन निरीक्षक आणि ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्या बदलीची अंतिम यादी काढण्यात आली. १६६ मोटार वाहन निरिक्षकांपैकी ९१ टक्के जणांना तर ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांपैकी ९७ टक्के जणांना त्यांच्या पसंती क्रमानुसार बदली देण्यात आली आहे. परिवहन विभागातील बदल्या माध्यमांमध्ये, विधीमंडळाच्या अधिवेशनांमध्ये चर्चेत असायच्या त्यावर उ

दिवा-मुंब्रा शहर पत्रकार संघाचे पदाधिकारी जाहीर

दिवा-मुंब्रा शहर पत्रकार संघाचे पदाधिकारी जाहीर,  अध्यक्षपदी सुहास खंडागळे, उपाध्यक्षपदी विरेंद्र शुक्ला,सेक्रेटरीपदी युसुफ पुरी तर ऍड खलील गिरकर यांची कायदेविषयक सल्लागार म्हणून निवड लोकमानस प्रतिनिधी मुंब्रा :- दिवा मुंब्रा शहरातील पत्रकारांच्या समस्या मांडण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ असावे या उद्देशाने स्थापन झालेल्या दिवा-मुंब्रा शहर पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या पत्रकार संघात एकूण 11 जणांची कार्यकारणी आहे.दिवा-मुंब्रा शहरातील पत्रकारांना त्यांच्या प्रश्नांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने दोन्ही शहरातील पत्रकारांनी एकत्र येत दिवा-मुंब्रा शहर पत्रकार संघाची स्थापना केली आहे. या पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून सुहास खंडागळे, उपाध्यक्ष म्हणून शुक्ला तर सचिव म्हणून युसूफ पुरी यांची निवड करण्यात आली आहे.पत्रकार ऍड.खलील गिरकर यांची  कायदेविषयक सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली असून अन्य सदस्यांवर लवकरच जबाबदारी दिली जाणार असल्याचे पत्रकार संघाचे सेक्रेटरी युसुफ पुरी यांनी सांगितले आहे. पत्रकार संघाच्या मुख्य कार्यकारणी मध्ये उदयभान पांडे,प्रणित

सेक्युलॅरिझमच्या नावावर मुस्लिम समाजासोबत आजपर्यंत राजकीय फसवणूक - खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप

इमेज
इंडिया आघाडीला विजयी व्हायचे असेल तर एमआयएम व इतर पक्षांना कमी लेखून चालणार नाही, सेक्युलॅरिझमच्या नावावर मुस्लिम समाजासोबत आजपर्यंत राजकीय फसवणूक - खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप मुंब्रा - प्रतिनिधी इंडिया आघाडीला येत्या लोकसभा निवडणुकीत विजयी व्हायचे असेल तर एमआयएम व इतर पक्षांना कमी लेखून चालणार नाही, आम्हाला आमचा राजकीय हिस्सा मिळणे गरजेचे आहे, असे मत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी मुंब्रा मध्ये आयोजित मेळाव्यात व्यक्त केले. आजपर्यंत सेक्युलॅरिझमच्या नावावर मुस्लिम समाजासोबत राजकीय फसवणूक झाली आहे, यापुढे अशी फसवणूक सहन केली जाणार नाही व आमची ताकद दाखवून दिली जाईल, असे खा. जलील म्हणाले. मुस्लिमांना तिकीट दिल्यास दुसऱ्या समाजाची मते मिळत नाहीत असा आक्षेप नेहमी घेऊन उमेदवारी देण्यास टाळाटाळ केली जाते.  त्यांची मते मिळत नाहीत तर आमची मते तरी तुम्हाला का द्यायची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कॉंग्रेस राष्ट्रवादी ला मते दिली तरी शिवसेना भाजपा विजयी होते, तुमचे मत वाया जात होते, एकदा आम्हाला संधी देण्याचे आवाहन केले व मुस्लिम समाज आमच्या पाठीशी उभा राहि

भाजपा आरक्षण देऊ शकत नाही, सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसच आरक्षणाचा प्रश्न सोडवेल :- नाना पटोले

  भाजपा आरक्षण देऊ शकत नाही ,  सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसच आरक्षणाचा प्रश्न सोडवेल   :- नाना पटोले माजी आयपीएस   अधिकारी मीरा बोरवणकरांनी उल्लेख केलेले ‘दादा’ कोण ?  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई ,  राज्यात सध्या मराठा ,  ओबीसी ,  धनगर समाजाकडून आरक्षणाची जोरदार मागणी केली जात असून त्यांची मागणी रास्तच आहे. भारतीय जनता पक्षाने २०१४ पासून या समाजांना आरक्षण देण्याचे पोकळ आश्वासन दिले आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही त्यांनी कोणत्याच समाजाला आरक्षण दिलेले नाही ,  त्यांनी या समाजाची फसवणूक केली आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर जातनिहाय जनगणना केली पाहिजे आणि काँग्रेस सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना होईल व आरक्षणचा प्रश्नही मार्गी लावेल ,  असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.      टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की ,  राज्यात मागील काही दिवसांपासून आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. आरक्षणावरून दोन समाजात वाद निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचे पाप भाजपा करत आहे. ओबीसींच्या आरक्षणाला हात लावणार नाही असे उपमुख्यमंत्र

खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना फाशी झाली असती, तर मणिपूर मध्ये महिलांची नग्न धिंड निघाली नसती - राजाराम खरात

खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना फाशी झाली असती, तर मणिपूर मध्ये महिलांची नग्न धिंड निघाली नसती - राजाराम खरात लोकमामस प्रतिनिधी  मुंबई -  खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना फाशी झाली असती, तर हाथरस,उंनाव व यदाकदाचित मणिपूर मध्ये सुद्धा महिलांची नग्न धिंड काढण्याची कुणाची हिम्मत झाली नसती, मात्र शासन, प्रशासन ,नेहमी प्रमाणेच आरोपींना पाठीशी घालण्याचे काम चोखपणे बजावत आहेच, आणि न्यायालयाकडून न्याय  मिळण्याची शक्यता नसते असा अनुभव आहे,  हे अतिशय चिंताजनक, व गंभीर आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.के.)चे पक्षाध्यक्ष राजाराम खरात यांनी केले,  बदलापूर येथील रमेश वाडी येथे खैरलांजी ते मणिपूर या विषयावर जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अशोक गजरमल होते, संभाजी राजेंना ज्या क्रूर पध्दतीने ठार मारले,ती मानसिकता असणाऱ्या जाती , धर्मांधतेने पछाडलेल्या क्रूर लोकांनी खैरलांजी मध्ये 29 सप्टेंबर 2006  रोजी चौघा मायलेकरांचे  अत्यंत अमानुषपणे हत्याकांड घडवले , अजूनही हा वर्ग माणूस म्हणून वावरताना दिसत नाही, अशी खंत ही राजाराम

देशात सध्या भाजपविरोधी वातावरण, भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू - शरद पवार

देशात सध्या भाजपविरोधी वातावरण, भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू - शरद पवार मुंबई अध्यक्षपदी राखी जाधव यांची बिनविरोध निवड लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  राज्यात आपले सरकार गेले पण  देशभरात जे लोक भाजपसोबत गेले आहेत. त्यांच्यासोबत जनता नाही गेली,  भाजपची सत्ता देशातील अनेक राज्यांमध्ये नाही आहे. देशात सध्या भाजप विरोधी वातावरण तयार झालेले आहे,  असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी  मुंबईमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.   पवार  पुढे म्हणाले, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राज्यात काम करत आहे. पक्षातून बाहेर गेलेल्या काही लोकांनी दिल्लीच्या कोर्टात आपल्याला नेले आहे.  पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. काही लोक पक्षावर दावा करत न्‍यायालयात गेले आहेत. त्‍यामुळे खऱ्या राष्ट्रवादीवर आता न्‍यायालयात संघर्ष करण्याची वेळ आली आहे. आता हे लोक निवडणूक आयोगात पक्ष, चिन्हावर दावा करत आहेत. पण खरी राष्ट्रवादी कोणाची हे जनतेला माहित आहे असे पवार म्हणाले.  पवार म्हणाले,   देशभरात भाजपसोबत जे लोक आहेत त्यांच्यासोबत इतर लोक जावू इच्छीत नाहीत. महारा

देशाची बदलती परिस्थिती व मुस्लिमांची भूमिका' - जमात ए इस्लामीच्या परिसंवादाला उदंड प्रतिसाद

इमेज
सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी पुढाकार घ्या,  आव्हानांवर मात करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करा - माजी खासदार  मौलाना ओबेदुल्लाह खान आझमी यांचे आवाहन,   जमात ए इस्लामीच्या परिसंवादाला उदंड प्रतिसाद लोकमानस प्रतिनिधी  मुंब्रा -  देशात सध्या विविध समाजात अविश्वासाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे,  सामाजिक सौहार्द संपुष्टात आणण्यासाठी काही शक्ती कार्यरत आहेत,मात्र आपल्याला या परिस्थितीत  देशातील सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल, त्यासाठी मुस्लिम समाजातील नागरिकांनी आव्हानांवर मात करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावे,  असे आवाहन माजी खासदार मौलाना ओबेदुल्लाह खान आझमी यांनी केले.  'आम्ही कुठे चाललो आहोत' या एसआयओच्या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत 'देशाची बदलती परिस्थिती व मुस्लिमांची भूमिका' यावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते.  या परिसंवादाला सामाजिक कार्यकर्ते, महिला सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  आझमी म्हणाले,  समाजाला वाईट प्रवृत्तीपासून वाचवण्याची जबाबदारी देखील आपली आहे इस्लामच्या खऱ्या शिकवणीप्रमाणे मुस्लिमांनी आचरण करण्य

मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार

मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार,  मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना मिळाले बळ लोकमानस प्रतिनिधी              मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने याबाबत केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे. राज्य शासनाने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी घेण्यास सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी होकार दिला आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.              काल राज्य सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील वकील ज्येष्ठ विधिज्ञ मनिंदर सिंह यांनी ही क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेऊन त्यावर सुनावणी करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली. त्यावर 'आम्ही ही याचिका दाखल करून त्यावर सुनावणी घ्यायला तयार आहोत' असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले.              म

एक कोटी 41 लाख रुपये किंमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करुन फिर्यादींना परत करण्यात ठाणे पोलिसांना यश, परिमंडळ ४ - उल्हासनगरच्या ८ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामगिरी

एक कोटी 41 लाख रुपये किंमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करुन फिर्यादींना परत करण्यात ठाणे पोलिसांना यश,   परिमंडळ ४ - उल्हासनगरच्या ८ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामगिरी  लोकमानस प्रतिनिधी  ठाणे-  ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ-४, उल्हासनगर अंतर्गत सर्व पोलिस स्टेशन परिसरात सन २०२२ व सन २०२३ या वर्षात दागिने, रोख रक्कम, विविध कंपनीचे मोबाईल फोन, वाहने चोरीस गेले होते. या प्रकरणी सोनसाखळी चोरी व इतर चोरीच्या गुन्हयामधील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व इतर चोरीच्या तपासात तांत्रिक मदतीने अतिशय कौशल्यपुर्ण तपास करुन गुन्हयातील आरोपींना जेरबंद करुन त्यांचेकडुन गुन्हयातील एकुण १ कोटी ४१ लाख ९७ हजार ३४४  रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन तो फिर्यादींना परत करण्यात आला.   या उघडकीस आणलेल्या विविध गुन्ह्यातील एकुण १ कोटी ४१ लाख ९७ हजार ३४४ रुपये किमतीचा जप्त मुद्देमाल आमदार किसन कथोरे,  गणपत गायकवाड, बालाजी किणीकर, कुमार आयलानी,  ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच पोलिस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते नागरीकांना सन्मानपुर्वक मुद्देमाल हस्तांतरीत करण्यात आ

राज ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, पथकर नाक्यांवरील सुविधांची आजपासून पाहणी,

राज ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट,    पथकर नाक्यांवरील सुविधांची  आजपासून पाहणी,  व्हिडिओ चित्रीकरण ,  पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नयेत यासाठी आवश्यक मनुष्यबळाची संख्या वाढवावी. स्वच्छतागृहासह रुग्णवाहिका ,  प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुंबई एन्ट्री पॉईंटच्या टोल नाक्यांवर व्हीडिओ चित्रीकरण करण्यात यावे ,  पथकर मार्गावरील पुलांचे ,  उड्डाणपुलांचे ,  भुयारी रस्त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे ,  असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दिले.             सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे ,  आमदार प्रमोद पाटील ,  माजी आमदार बाळा नांदगावकर ,  नितीन सरदेसाई ,  अमित ठाकरे ,  संदीप देशपांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.