पॅलेस्टाईन समर्थनार्थ विना परवानगी निदर्शने, मुंब्रा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

पॅलेस्टाईन समर्थनार्थ विना परवानगी निदर्शने, मुंब्रा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल
लोकमानस प्रतिनिधी
मुंब्रा - मुंब्रा मधील दारुल फलाह मशीदीजवळ विना परवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ व ईस्त्राईलच्या विरोधात घोषणा देऊन निदर्शने करणाऱ्यांविरोधात मुंब्रा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात  याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संघटनेचे अध्यक्ष दाऊद शेख,सरचिटणीस सर्फराज शेख यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु असून त्यांना नोटिस देण्यात येईल व इतर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुंब्रा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिली.

निदर्शकांनी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने तसेच विना परवानगी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करुन चित्रिकरण केल्याने भा.दं.वि. १८८, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी स.पो.नि.अजय गंगावणे पुढील तपास करत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पोलिस निरीक्षक बी.एस. निकम, पो.नि. दवणे, स.पो.नि.अजय गंगावणे, स.पो.नि. व्ही.एस. माने, पोलिस उपनिरीक्षक दिक्षा ढाकरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलिस शिपाई कृष्णा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही