पॅलेस्टाईन साठी मुंब्रा मध्ये सामूहिक प्रार्थना

पॅलेस्टाईन साठी मुंब्रा मध्ये सामूहिक प्रार्थना
मुंब्रा : पॅलेस्टाईनवर इस्त्राईलकडून सुरु असलेल्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व मृत्यू पावलेल्या नागरिकांसाठी मुंब्रा कौसा मध्ये सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते.
सलीम खान, मौलाना अली हैदर, मौलाना अनिस अश्रफी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव
मौलाना मोहम्मद उम्रैन मेहफूज रहमानी यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. अब्दुल रऊफ लाला कार्यक्रमाचे समन्वयक होते. मौलाना रहमानी यांनी यावेळी सलग 20 मिनिटे प्रार्थना केली. या कार्यक्रमाचे आयोजन युनायटेड मिल्ली फोरम तर्फे करण्यात आले होते.
 उपस्ठित मौलानांनी यावेळी इस्राईली,अमेरिकी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन नागरिकांना केले. आम्ही केवळ पॅलेस्टाईनच्या सोबत नाही तर जगातील प्रत्येक अन्याय अत्याचाराच्या विरोधात असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
यावेळी पॅलेस्टाईनच्या तसेच भारताच्या समर्थनार्थ व ईस्त्राईलच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. पॅलेस्टाईन व भारताचा तिरंगा फडकावून यावेळी उपस्थितांनी आपण या लढाईत पॅलेस्टाईनच्या सोबत असल्याचे जाहीर केले. मुंब्रा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आयोजकांतर्फे या प्रार्थनेसाठी येणाऱ्यांच्या वाहनांचे नियमन करण्यात येत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब