मुंब्रा येथील रोजगार मेळाव्याला तरुणांचा चांगला प्रतिसाद, डझनहून अधिक कंपन्यांचे स्टॉल्स , 90 जणांना नियुक्ती

मुंब्रा येथील रोजगार मेळाव्याला तरुणांचा चांगला प्रतिसाद,  डझनहून अधिक कंपन्यांचे स्टॉल्स , 90 जणांना नियुक्ती
मुंब्रा :  डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व माजी नगरसेवक राजन किणे यांच्या संयुक्त विद्यमाने मुंब्रा आनंद कोळीवाडा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  या रोजगार मेळाव्यात शेकडो इच्छूक तरुण-तरुणींनी सहभाग घेतला त्यापैकी 90 जणांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.  
 मेळाव्याचे आयोजक राजन किणे म्हणाले की, मुंब्रा कौसा येथील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी  मुंब्रा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तरुणांच्या विकासाचा मार्ग सुगम झाला पाहिजे यासाठी शहरात रोजगार मेळाव्याचे आयोजन करून युवक-युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जात आहे.  बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी फाऊंडेशन सातत्याने प्रयत्न करत असते.  बेरोजगार तरुणांनी याचा लाभ घ्यावा,  असे आवाहन त्यांनी केले. 
 यावेळी नर्सिंग, आयटी, आयटी ऑल ट्रेड्स, गारमेंट, बॅक ऑफिस, मॅनेजमेंट, बँकिंग, सेल्स अँड मार्केटिंग क्षेत्रातील सुमारे 70 नामांकित कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.
 या मेळाव्यात मुंब्रा, भिवंडी, कल्याण व्यतिरिक्त घाटकोपर, अंबरनाथ, वासिंद, पनवेल, ठाणे आदी भागातील सुमारे 300 तरुणांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 90 जणांची निवड करण्यात आली असून, त्यांना तात्काळ नियुक्ती पत्र देण्यात आले. 
 
या रोजगार मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून  कल्याण ग्रामीण शिवसेनेचे अध्यक्ष गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक मोरेश्वर किणे, बळीराम टकले, आझाद चौगले, सुनील लणकर होते. 
 आलेल्या सर्व युवा युवतींचे त्यांनी स्वागत केले व सर्व कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे ट्रॉफी देऊन आभार व्यक्त केले.  हा भव्य रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जयकर सावंत, महेश किणे, राजू देवरुखकर, मुबीन सुर्वे, आसिफ शेख, जुजेर सोनी आदींनी  प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही