एक कोटी 41 लाख रुपये किंमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करुन फिर्यादींना परत करण्यात ठाणे पोलिसांना यश, परिमंडळ ४ - उल्हासनगरच्या ८ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामगिरी

एक कोटी 41 लाख रुपये किंमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करुन फिर्यादींना परत करण्यात ठाणे पोलिसांना यश,  
परिमंडळ ४ - उल्हासनगरच्या ८ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामगिरी 
लोकमानस प्रतिनिधी 
ठाणे- 
ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ-४, उल्हासनगर अंतर्गत सर्व पोलिस स्टेशन परिसरात सन २०२२ व सन २०२३ या वर्षात दागिने, रोख रक्कम, विविध कंपनीचे मोबाईल फोन, वाहने चोरीस गेले होते. या प्रकरणी सोनसाखळी चोरी व इतर चोरीच्या गुन्हयामधील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व इतर चोरीच्या तपासात तांत्रिक मदतीने अतिशय कौशल्यपुर्ण तपास करुन गुन्हयातील आरोपींना जेरबंद करुन त्यांचेकडुन गुन्हयातील एकुण १ कोटी ४१ लाख ९७ हजार ३४४  रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन तो फिर्यादींना परत करण्यात आला.  

या उघडकीस आणलेल्या विविध गुन्ह्यातील एकुण १ कोटी ४१ लाख ९७ हजार ३४४ रुपये किमतीचा जप्त मुद्देमाल आमदार किसन कथोरे,  गणपत गायकवाड, बालाजी किणीकर, कुमार आयलानी,  ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच पोलिस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते नागरीकांना सन्मानपुर्वक मुद्देमाल हस्तांतरीत करण्यात आला आहे. 

सदर कामगिरी ठाणे शहर पोलिस आयुक्त जय जीत सिंह,  पोलिस सह आयुक्त दत्तात्रय कराळे,  पुर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, परिमंडळ-४, उल्हासनगर पोलिस उप आयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

गुन्हयात अटक आरोपी यांचेकडुन एकुण सुमारे ४४ लाख ५८ हजार ६२५  रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम ६ लाख १६ हजार ६२०  रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.  हा मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपुर्वक परत करण्यात आला आहे.

मोटारवाहन चोरीचे गुन्हयात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायाने ठिकठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करुन, संशयीत वाहनांची तपासणी करुन, जुने मोटारसायकल खरेदी विक्री करणारे मोटार गॅरेज तपासुन तसेच टोलनाक्यावरील सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी करुन तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांचा वापर करुन अतिशय कौशल्यपूर्ण कामगिरी करुन एकुण सुमारे ४० लाख ३७ हजार रुपये किमतीची एकुण ५४ वाहने तसेच सुमारे ८ लाख ८२हजार ५० रुपये किमतीचा इतर मुद्देमाल असा जप्त करुन संबंधीत फिर्यादी यांना सन्मानपुर्वक परत करण्यात आलेला आहे.

चोरीस गेलेले / हरविलेले मोबाईल फोनबाबतची सविस्तर माहिती क्रेंद शासनाने तयार केलेल्या CEIR या अॅपमध्ये भरुन त्यानुसार चोरीस गेलेले / हरविलेले मोबाईल फोन वापरकर्त्यांचे पत्त्यावर समक्ष जावुन तसेच तांत्रिक पध्दतीने बारकाईने
विश्लेषण करुन त्याआधारे विविध मोबाईल कंपन्याचे मोबाईल सुमारे ४२ लाख तीन हजार ४९ रुपये किमतीचे एकुण ३२३ मोबाईल फोन
हस्तगत करण्यात आलेले होते तो मुद्देमाल संबंधीत फिर्यादी यांना सन्मानपुर्वक परत करण्यात आलेला आहे.

सदर उल्लेखनीय कामगिरीचे अनुषंगाने
पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी  उल्हासनगरचे सहायक पोलिस आयुक्त अमोल कोळी, सहायक पोलीस आयुक्त, अंबरनाथ विभाग सुरेश वराडे व परिमंडळ-४ उल्हासनगर मधील सर्व पोलिस ठाण्यातील वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सर्व पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार व गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने विविध तांत्रिक माहितीचे बारकाईने कौशल्यपूर्ण विश्लेषण करुन गुप्त बातमीदारांची मदत घेवुन उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.

पोलिसांनी केलेल्या चांगल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रशंसा करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही