श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२२ जाहीर

श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२२ जाहीर
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - 
मराठी ग्रंथ संग्रहालय,ठाणे ही संस्था  गेली ५ वर्षे  श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार‘चे आयोजन करीत आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीमध्ये २०२२ च्या स्पर्धेचे पुरस्कार घोषित करण्यात आले.  

पुरस्कार पुढील प्रमाणे 
अभिजित वामन पंडित पुरस्कृत चरित्र-आत्मचरित्र – ‘काजवा ‘, लेखक –पोपट श्रीराम, स्नेहलता दिगंबर कुलकर्णी पुरस्कृत  कादंबरी – ‘वेदनेचा क्रूस’, लेखक- लक्ष्मीकांत देशमुख , मेधा दामोदर सोमण पुरस्कृत कथा – ‘अर्ध्या माणसाची अर्धी गोष्ट ‘लेखक -सागर कुलकर्णी , मनीष वाघ व कविता वालावलकर पुरस्कृत कविता -  ‘शतकोत्तरी ओरखडा ‘ लेखक - राजीव लक्ष्मण जोशी, डॉ. हरिकांत शामराव भानुशाली स्मरणार्थ अनुवाद-  ‘कथायात्रा (निवडक हिंदी कथा )’ लेखक – चंद्रकांत भोंजाळ, वीणा पाटील (वीणा वर्ल्ड ) पुरस्कृत प्रवास – ‘ झोरीचा आणि सर्बिया ‘लेखक – राज वसंत शिंगे, राजेश मढवी पुरस्कृत इतिहास- ‘द बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’, लेखक - सुहास बहुलकर, दामोदर कृष्णाजी सोमण पुरस्कृत विज्ञान – तंत्रज्ञान ‘ पाण्या तुझा रंग कसा?’ लेखक विद्यानंद रानडे , विनायक कृष्णाजी गोगटे पुरस्कृत :समीक्षा संशोधन –‘जवळिकीची सरोवरे’ लेखक :नितीन वैद्य, सॉलिसिटर मकरंद रेगे पुरस्कृत विनोद – ‘तिरकस चौकस’ लेखक सॅबी परेरा, मराठी ग्रंथ संग्रहालय पुरस्कृत बालविभाग – ‘पयोधरीचा निसर्गप्रेमी अभ्र ‘ लेखक – सुयश यशवंत देशपांडे मराठी ग्रंथ संग्रहालय पुरस्कृत  पर्यावरण – ‘ पृथ्वीचं आख्यान ‘लेखक – अतुल देऊळगावकर, संजीव फडके पुरुस्कृत नाटक – ‘एल्गार ‘लेखक - जयेश शत्रुघ्न मिस्त्री, महेश राजदेरकर पुरुस्कृत निबंध/ संकीर्ण – ‘जिण शोषितांचं ‘ लेखिका - वृषाली मगदूम .  

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून ५३३ स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता  त्यात स्वत: लेखक व प्रकाशक यांनी आपली पुस्तके पाठवली होती.
राज्यातून आलेल्या या पुस्तकांची छाननी करून एकूण १४ विभागाचे  अंतिम निकाल जाहीर केले. त्यासाठी पुढील परिक्षकांनी विभागावर प्रथम क्रमांकाची निवड केली.  उषा रामवाणी,रा. म. शेजवलकर, निर्मोही फडके ,चांगदेव काळे,  सीमा दामले, प्रतिक्षा बोर्डे वृषाली विनायक, योगेश श्येट्ये, मकरंद जोशी, वृंदा दाभोलकर ,सदाशिव टेटविलकर, सुभाष शिंदे , दा.कृ. सोमण, चांगदेव काळे वृषाली राजे,मधुरा ओक , मानसी जोशी ,विजया पंडितराव  पदमा हुशिंग,प्रज्ञा पंडीत.
प्रथम पारितोषिक मिळविणाऱ्या स्पर्धकांना रोख पाच हजार रुपये, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

 पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५.००वाजता  मराठी ग्रंथ संग्रहालय, सरस्वती मंदिर,  वा. अ.रेगे सभागृह, पहिला मजला, जिल्हा परिषद कार्यालयासमोर,स्टेशन रोड, ठाणे (पश्चिम) येथे होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध  लेखक  रंगनाथ पठारे असून त्यांच्या हस्ते वरील पुरस्कारांचे वितरण होईल. अशी माहिती संस्थेचे कार्यावाह दुर्गेश आकेरकर यांनी दिली.
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही