दिवा भाजपचे माजी अध्यक्ष रोहिदास मुंडेंचा उबाठा शिवसेनेत प्रवेश

दिवा भाजपचे माजी अध्यक्ष रोहिदास मुंडेंचा उबाठा शिवसेनेत प्रवेश,  
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश
लोकमानस प्रतिनिधी 
दिवा:- दिवा भाजपचे माजी अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी  उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. 
यावेळी शिवसेना नेते संजय राऊत,अरविंद सावंत,लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत,जिल्हाप्रमुख सदानंद थरवल यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. रोहिदास मुंडे त्यांच्यासह सौ.राजश्री मुंडे,कल्पिता मुंडे,विकास इंगळे,नागेश पवार,प्रशांत आंबोणकर,मूर्ती मुंडे,शनिदास पाटील,संजय जाधव,बैद्यनाथ पाडी,अक्षय वनगुळे,सागर पवार,सुधीर घाडीगांवकर, उत्तम सिंग,सचिन विश्वकर्मा, यांच्यासह दिव्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.

रोहिदास मुंडे हे दिव्याच्या प्रश्नावर कायमच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राहिले आहेत. भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी दिव्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना चांगलेच अडचणीत आणण्याचे काम केले होते.आता मुंडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने दिव्यात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही