मोंड-चिंचवाडी शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन, सत्यनारायणाची महापूजा संपन्न


मोंड-चिंचवाडी शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
   सत्यनारायणाची महापूजा संपन्न
लोकमानस प्रतिनिधी
मोंड चिंचवाडी मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
 त्या निमित्त सरस्वतीपूजन व 'श्री सत्यनारायणाची महापूजा '  शनिवारी  सकाळी आयोजित करण्यात होती. समितीचे उपाध्यक्ष  हिराकांत  जोशी यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली.
      शालेय विद्यार्थ्यांनी पाटी पूजन करून सरस्वती पूजन केले व त्यानंतर आरती करण्यात आली. ग्रामस्थ व पाहुणे मंडळींना दुपारी महाप्रसाद देण्यात आला
मोंड चिंचवाडी मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना ०१/०८/१९४९ साली झाली. यंदा शाळेचे ७५ वे  वर्ष चालू आहे. ०१/०८/२०२३ ते ०१/०८/२०२४ पर्यंत अमृत महोत्सवी वर्ष साजरा केला जात आहे.
   
  बापर्डे केंद्रशाळेच्या माने मॅडम, मोंड शाळेच्या कालिंदी माणगावकर  माजी शिक्षक विजय बापट, यूनियन बँकचे देवेन्द्र गुरव, राजाराम राणे (माजी सभापती),बाळा कोयंडे, मोंड ग्रामपंचायत सदस्य प्रसाद कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.  
       शाळेचे  आजी माजी विद्यार्थी/विद्यार्थिनीं यांचा यावेळी सत्कार  करण्यात आला. वसंत सीताराम जोशी, महादेव ढोके,पांडुरंग ढोके,नरेश सारंग,देवु सारंग, रमाकांत जोशी यांनी आपल्या आठवणी सर्वा समोर व्यक्त केल्यात. सत्यवान मोंडकर यांनी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांना शाळेची बॅग दिल्या.  वाडीतील समस्त महिलानी सुंदर जेवणाची व्यवस्था केली. महिलांनी हळदीकुंकू, गरबा रास करून वातावरण आनंदी व नवरात्रि उत्सव प्रमाणे तयार केले. बुवा  संदीप पुजारी व बुवा  अखिलेश फाळके यांच्या मध्ये सुस्वर भजनांची डबलबारी भजने झाली. 

 चिंचवाडी ग्रामस्थ मंडळचे अध्यक्ष विनायक जोशी, उपाध्यक्ष प्रकाश पडेलकर, सचिव हरिश्चंद्र मोंडकर,कार्याध्यक्ष जयवंत पोसम,व्यवस्थापक विलास मोंडकर ,सह सचिव गोविंद ढोके, रमेश प्रभू, प्रकाश सारंग,महेंद्र पोसम,नरेश जोशी व इतर कार्यकारिणी सुंदर आयोजन केले.
      ग्रामपंचायत सदस्या गौरी गुरुनाथ मोंडकर, गुरुनाथ मोंडकर, उदय मोंडकर, द्वारकानाथ जोशी (बंडू),विश्वास जोशी,नरेंद्र जोशी,रमेश पोसम,पुरुषोत्तम पोसम,संतोष पोसम,नथूराम सारंग, सतिश ढोके, यांनी कार्यक्रमासाठी भरपूर मेहनत घेतली.
      शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष
 प्रकाश गावकर,उपाध्यक्ष हिराकांत प जोशी, शिक्षक ज्ञानेश्वर भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही