विलेपार्ले विभागातील वाढत्या प्रदूषणाबाबत मनसेने घेतली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सचिवांची भेट

विलेपार्ले विभागातील वाढत्या प्रदूषणाबाबत मनसेने घेतली 
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सचिवांची भेट
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - 
 विलेपार्ले विधानसभा क्षेत्रात होणारे वाढते बांधकाम व वायू प्रदूषण याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव 
सुधाकर तांबोळी यांनी शिष्टमंडळासहित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव
डॉ.अविनाश ढाकणे यांची भेट घेतली. 
प्रदूषण ही मोठी समस्या आहे आणि हे प्रदूषण दिवसागणिक आपल्या जीवनाला नष्ट करीत आहे. प्रदूषण हे नैसर्गिक वातावरणाला दुषित करत आहे, या महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेने यावेळी सदस्य सचिवांसोबत चर्चा केली.  

 विलेपार्ले विधानसभा क्षेत्रातील वाढते वायुप्रदूषण, वाढती बांधकामे, शहरातील वाढती वाहने, ट्रॅफिक जॅम व त्यामुळे  वायुप्रदूषण झपाट्याने वाढले आहे,याचा परिणाम विभागातील जनतेच्या आरोग्यावर दिसू लागला आहे,सर्दी,खोकला व श्वसनाचे आजार वाढले आहेत याकरिता सुधाकर तांबोळी यांनी
पर्यावरणाचा समतोल कसा राखता येईल यावर सविस्तर चर्चा व प्रदूषण रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.
 सदस्य सचिव ढाकणे यांनी याबाबत तत्काळ निर्णय घेण्याची ग्वाही दिली. 

यावेळी शीव कोळीवाडा विभागाचे विभाग अध्यक्ष अनंत कांबळे, विलेपार्ले उपविभाग अध्यक्ष  राजु चव्हाण,  शाखाध्यक्ष  वल्लभ मोरे   रवींद्र जाधव व मिलिंद पांचाळ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब