खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना फाशी झाली असती, तर मणिपूर मध्ये महिलांची नग्न धिंड निघाली नसती - राजाराम खरात

खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना फाशी झाली असती, तर मणिपूर मध्ये महिलांची नग्न धिंड निघाली नसती - राजाराम खरात
लोकमामस प्रतिनिधी 
मुंबई - 
खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना फाशी झाली असती, तर हाथरस,उंनाव व यदाकदाचित मणिपूर मध्ये सुद्धा महिलांची नग्न धिंड काढण्याची कुणाची हिम्मत झाली नसती, मात्र शासन, प्रशासन ,नेहमी प्रमाणेच आरोपींना पाठीशी घालण्याचे काम चोखपणे बजावत आहेच, आणि न्यायालयाकडून न्याय  मिळण्याची शक्यता नसते असा अनुभव आहे,  हे अतिशय चिंताजनक, व गंभीर आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.के.)चे पक्षाध्यक्ष राजाराम खरात यांनी केले, 

बदलापूर येथील रमेश वाडी येथे खैरलांजी ते मणिपूर या विषयावर जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अशोक गजरमल होते, संभाजी राजेंना ज्या क्रूर पध्दतीने ठार मारले,ती मानसिकता असणाऱ्या जाती , धर्मांधतेने पछाडलेल्या क्रूर लोकांनी खैरलांजी मध्ये 29 सप्टेंबर 2006  रोजी चौघा मायलेकरांचे 
अत्यंत अमानुषपणे हत्याकांड घडवले , अजूनही हा वर्ग माणूस म्हणून वावरताना दिसत नाही, अशी खंत ही राजाराम खरात यांनी व्यक्त केली, 

कवी, साहित्यिक  अनिल भालेराव यांनी खैरलांजी ते मणिपूर व विविध ठिकाणी झालेले अत्याचारांची मालिका ही खंडीत व्हायला पाहिजे व तसे प्रयत्न करणे गरजेचे आहे असे आपल्या भाषणात सांगितले. 
साहित्यिक विनायक अढंगळे यांनी आदिवासींच्या जमिनीवर कब्जा करण्याचा डाव असून उद्योगपतीच्या घशात सदर जमीनी घालण्यासाठी जाणीवपूर्वक समाजा समाजात तेढ निर्माण करण्यात आली,सरकारची ही बेपर्वा वृत्तीने शेकडो  लोकांना आपले प्राण गमवावे लागले, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, असे सांगितले. 

सोमकुवर यांनी धावता आढावा घेऊन माणसाने माणूस म्हणून जगले पाहिजे असे आपले मत व्यक्त केले, 
पांडुरंग वाव्हळ , सुभाष रणपिसे, सुनील दुपटे, अशोक दंडवते, वामन पठारे,एकनाथ जगताप, संपत कांबळे, सुहास कांबळे, ज्योतीबा माघाडे,प्रकाश गरुड ,संपत भोसले, मोतीराम कांबळे उपस्थित होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही