पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अविनाश जाधव विरोधात गुन्हा नोंदवा- सय्यद अली अश्रफ यांची मागणी

शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अविनाश जाधव विरोधात गुन्हा नोंदवा- सय्यद अली अश्रफ यांची मागणी  लोकमानस प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव आपल्या राजकीय लाभासाठी वादग्रस्त वक्तव्ये करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाधव यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून कारवाई करावी,  अशी मागणी राज्य अल्पसंख्यक आयोगाचे माजी सदस्य तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सय्यद अली अश्रफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाण्याचे पोलीस आयुक्त व मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.  मुंब्रा मध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, बौद्ध आदी विविध धर्मांचे नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. धार्मिक मुद्द्यावरुन येथे कधीही तणाव झालेला नाही. गुढी पाडव्याच्या मिरवणुकीत मुस्लिम समाज सहभागी होतो तर ईद मिलादच्या मिरवणुकीत हिंदू व इतर धर्मीय बांधव सहभागी होतात. हे मुंब्राचे वैशिष्ट्य आहे.  मात्र अविनाश जाधव सारख्या प्रवृत्तीमुळे या सहकार्याला धोका निर्माण होण्

खासदार गिरीश बापट यांचे निधन

खासदार गिरीश बापट यांचे निधन  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट  यांचे बुधवारी निधन झाले.  त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरु होते. ते 72 वर्षांचे होते.  राज्य मंत्रिमंडळात त्यांनी कँबिनेट मंत्री पदी काम केले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बापट यांच्या कार्याचे कौतुक केले.  मंत्री, आमदार असताना व खासदार असताना बापट यांनी नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली असे  ट्वीट मोदी यांनी केले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.  बापट आजारी असताना त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व इतर राजकीय नेत्यांनी बापट यांची भेट घेतली होती.   जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले खा. गिरीश बापट यांना देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने जमिनीशी नाळ असलेले आणि राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपल्यातून न

दीड कोटी पशुधनाचे मोफत लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य– राधाकृष्ण विखे पाटील

दीड कोटी पशुधनाचे मोफत लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य – पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील “पशुधन हिताय, बहुजन सुखाय” ब्रीद जपत शेतकरी, पशुपालकांसाठी काम करणाऱ्या राज्य शासनाने यावेळी सादर केलेल्या पंचामृत अर्थसंकल्पात शाश्वत शेतीला प्राधान्य देण्यात आले आहे. पशुधन हा शेतीला पूरक असा व्यवसाय असल्याने पशुधन वाढले पाहिजे, जोपासले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. दूग्ध व कुक्कुटपालन व्यवसायाला नवीन दिशा मिळावी, शेळी-मेढी पालनाला चालना देण्यासाठी मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या महामंडळाचे राज्याचे मुख्यालय अहमदनगर असणार आहे. यासाठी वार्षिक दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे‌. हा व्यवसाय करणाऱ्या तरूणांना 1 लाख 75 हजार रूपयांचे बिन व्याजी कर्ज दिले जाणार आहे‌. पशुसंवर्धनाच्या व्यवसायात ग्रामीण अर्थचक्राला गतिमान करण्याची क्षमता असल्याने या व्यवसायाला गती देण्यात येणार आहे. दीड कोटी पशुधनाचे मोफत लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य राज्यात लम्पी चर्म रोगाची साथ प्रथम जळगाव जिल्ह्यात

पँन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याला मुदतवाढ

पँन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याला मुदतवाढ लोकमानस प्रतिनिधी मुंबई - पँन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची 31 मार्च पर्यंतची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. 31 मार्चची अंतिम मुदत तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे.  त्यामुळे आता 30 जून पर्यंत पँन व आधार एकमेकांशी लिंक करता येणे शक्य होणार आहे.  यापूर्वी अनेकदा ही मुदत वाढवण्यात आली आहे.  जुलै 2022 पासून पँन व आधार लिंक करण्यासाठी नागरिकांना एक हजार रुपयांचा दंड भरावा लागत आहे.  गेल्या काही दिवसांपासून पँन व आधार लिंक करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याने  या वेबसाईटवर पडत असल्याने वेबसाईट चालत नव्हती. त्यामुळे पँन व आधार लिंक करु इच्छिणाऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. दंडाच्या रक्कमेत वाढ होण्याची भीती वर्तवली जात होती. मात्र आता ही मुदत वाढवल्याने नागरिकांना दिलासा मिळू शकेल. 

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची २ एप्रिल रोजी चेन्नईमध्ये बैठक - रामदास आठवले

  रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची २ एप्रिल रोजी चेन्नईमध्ये बैठक  - रामदास आठवले  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई दि. – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक  २ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता चेन्नई येथील लुंगापक्कम थिरुमूर्ती नगर येथील हॉटेल  पामग्रेव्ह येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीचे सदस्य, पदाधिकारी, सर्व राज्यांचे अध्यक्ष, प्रभारी आदि प्रमुख पदाधिका-यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. या बैठकीस रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. देशात सुरु असलेल्या राजकीय  घडामोडी तसेच रिपब्लिकन पक्षाच्या देशभरातील विस्ताराबाबत या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्षाचा जनाधार वाढत आहे. त्या दृष्टीने रिपब्लिकन पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या यशस्वीतेबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्षाला चांगले यश मिळाले असून रिपब्लिकन पक्षाची विजयी घोडदौड

कँगच्या अहवालात उघड झालेल्या भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करा - आशिष शेलार यांची मागणी

इमेज
कँगच्या अहवालात उघड झालेल्या भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करा - आशिष शेलार यांची मागणी  लोकमानस प्रतिनिधी मुंबई -  मुंबई महापालिकेच्या कामांची कॅगने केलेल्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून ८,४८५  कोटींचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. त्यामुळे  या मागचा सुत्रधार कोण हे उघड होणे आवश्यक आहे. त्यासाठी या सर्व कामांची फौजदारी कलमांतर्गत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या अहवालातून मुंबई महापालिकेतील कट, कमिशन आणि कसाई असा कारभार समोर आला आहे, अशी टीका शेलार यांनी केली आहे. मुंबई भाजपा कार्यालयात आज आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन कॅगच्या अहवालातून समोर आलेली निरिक्षणे मांडून या प्रकरणी चौकशीची मागणी केली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र ही लिहिले आहे.  शेलार पुढे म्हणाले की, पुर्वी एक सिनेमा आला होता "पाप की कमाई", पण आता मुंबई महापालिकेतील ९ विभागातील ७६ कामांमधील १२ हजार कोटींच्या घोटाळयावर सीएजीने जे विश्लेषण केले आहे त्यावरुन स्पष्ट दिसते

अविनाश जाधव यांच्या मुंब्रा प्रवेशावर पोलिसांची बंदी

  अविनाश जाधव यांच्या मुंब्रा प्रवेशावर पोलिसांची बंदी लोकमानस प्रतिनिधी मुंब्रा पोलिस स्थानकाच्या हद्दीत प्रवेश करण्यास महाराष्ट्र   नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ चे कलम १४४ अन्वये हा मनाई आदेश देण्यात आला आहे. २३ मार्च पासून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु झाला आहे. अविनाश जाधवविरोधात ठाणे पोलिस आयुक्तालयात राजकीय गुन्हे दाखल आहेत. मुंब्रा बायपास लगत असलेल्या अनधिकृत दर्गा, मजार, मशीद याविरोधात १५ दिवसांत कारवाई करावी अन्यथा त्या शेजारी अनधिकृत हनुमान मंदिर बांधण्यात येईल, असा इशारा जाधव यांनी सोशल मीडियाद्वारे दिला होता. एप्रिलच्या २२ किंवा २३ तारखेला रमजान ईद साजरी केली जाईल. मात्र जाधव यांच्या वक्तव्यामुळे गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडून शांतता भंग होण्याची शक्यता आहे व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे ,मनसे नेते अविनाश जाधव यांना मुंब्रामध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रवेश करण्यास अविनाश जाधव यांना बंदी घालण्यात आली आहे. अविनाश

महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण

महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात 2021 रोजीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार पद्मविभूषण आशा भोसले यांना प्रदान करण्यात येणार आहे. आतापर्यंत 19 जणांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.  तर मग जाणून घेऊया कोण आहेत महाराष्ट्राचे  ‘ महाराष्ट्र भूषण ’.. वर्षा फडके -  आंधळे, विभागीय संपर्क अधिकारी  ( सांस्कृतिक कार्य ) महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची ओळख आहे. महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्यास असलेल्या आणि आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा सर्वोच्च बहुमान दिला जातो. आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या  क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अशा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येते.  10 लाख रुपये रोख, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचे स्वरुप होते. आता या पुरस्काराची रक्कम वाढविण्यात आली असून पुरस्कार रक्कम 25 लाख रुपये करण्यात आली आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

  कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द प्रतिनिधी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने आज याबाबत परिपत्रक काढून माहिती दिली आहे. गांधी यांनी मोदी आडनावाबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात सुरत न्यायालयाने गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. या निर्णयानंतर कॉंग्रेस पक्ष आक्रमक झाला असून देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. सत्ताधाऱ्यांनी लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ८ (३) अनुसार जेव्हा एखाद्या संसद सदस्याला दोषी ठरवले जाते व त्याला किमान दोन वर्षांची शिक्षा सुनावली जाते तेव्हा त्याची सदस्यता तत्काळ प्रभावाने रद्द होते. सर्वोच्च न्यायालयाने लिली थॉमस वि. भारत सरकार या खटल्यात निर्णय सुनावताना स्पष्ट केले होते की, जेव्हा कोणीही संसद सदस्य किंवा विधिमंडळ सदस्य दोषी न्यायालयाद्वारे दोषी ठरवला जातो व त्याला किमान दोन वर्षांची शिक्षा सुनावली जाते तेव्हा त्या सदस्याची संसदेची किंवा विधिमंडळाची सदस्यता तत्काळ प्रभावाने रद्द होते. राहुल गांधींची खासदारकी रद्द कर

ठाणे महापालिका क्षेत्रात वर्षातून दोन वेळा नाले सफाई अनिवार्य करा- शानू पठाण यांची मागणी

  ठाणे महापालिका क्षेत्रात वर्षातून दोन वेळा नाले सफाई अनिवार्य करा -   शानू पठाण यांची मागणी प्रतिनिधी मुंब्रा -   अवकाळी पावसाचा मुंब्रा परिसराला फटका बसला. जोरदार पावसामुळे तुंबलेल्या नाल्यातील कचऱ्यामुळे पाणी वाहून न गेल्याने ठिकठिकाणी पाणी साचले. नियमित नालेसफाईला वेळ असल्याने अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. त्यामुळे ठाणे महानगरपालिका हद्दीत वर्षातून किमान दोन वेळा नाले सफाई केली जावी, अशी मागणी ठाणे महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानु पठाण यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.     शानू पठाण यांनी   मुंब्रा कौसा मधील मोठे, छोटे सर्व नाले व गटार सफाई वर्षातून दोन वेळा करण्याची मागणी केली आहे. आज अचानक आलेल्या पावसामुळे फारच मोठी गंभीर समस्या उद्भवली. सर्व लहान मोठया नाल्यातील कचरा विविध ठिकाणी रस्त्यावर आला. त्यावेळी   स्वतः अशरफ शानु पठाण यांनी जातीने हजर राहून पालिका कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सोनाजी नगर , अमृत नगर , कैलास नगर , शिवाजी नगर , रईस बाग रोड तसेच अमृत नगर दरगाह कब्रस्तान या विविध भागात रस्ते साफसफाई मोहीम हाती घेतली.   प्र

शांतता आणि धार्मिक सलोख्यासाठी सांप्रदायिक शक्ती विरुद्ध प्रबोधन मोहीम राबवणार - हुसेन दलवाई

इमेज
शांतता आणि धार्मिक सलोख्यासाठी सांप्रदायिक शक्ती विरुद्ध प्रबोधन मोहीम राबवणार -   हुसेन दलवाई लोकमानस प्रतिनिधी   मुंबई-     धर्मांध , सांप्रदायिक शक्ती हिंदुत्वाच्या नावावर हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करुन राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवीत आहेत. या देश विरोधी कृत्यात सरकारी यंत्रणा छुप्या पद्धतीने त्यांच्या पाठीमागे असून सामान्य अल्पसंख्यांक , मागासवर्गीय समाजामध्ये भीतीची आणि असुरक्षितेचे वातावरण निर्माण झालेले आहे. अल्पसंख्यांकाच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवणे , गो-रक्षा , लव्ह जिहाद , लॅन्ड जिहाद अशी प्रकरणे जाणिवपूर्वक निर्माण करून जातीय व्देष निर्माण करत आहेत. व्देषमुलक वक्तव्य करणाऱ्या धर्मांध व्यक्तींच्या विरोधात प्रशासन व शासन बघ्याची भूमिका घेत आहेत. पुरोगामी महाराष्ट्राच्या गुण्या-गोविंदाने राहणाऱ्या समाजामध्ये दंगली घडवण्याचा मनसुबा असल्याचे दिसते. विशेषत: युवकांमध्ये चुकीची धारणा , चुकीचा इतिहास सामाजिक माध्यमातून प्रसारित केला जात आहे. या सर्वांच्या विरोधात आपण शांतता प्रिय आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधनात्मक

टोरंट पॉवर विरोधात उपोषणाला मुंब्रावासियांचा वाढता पाठिंबा

इमेज
टोरंट पॉवर विरोधात उपोषणाला मुब्रावासियांचा वाढता पाठिंबा मुंब्रा - प्रतिनिधी टोरंट पॉवर विरोधात एमआयएम पक्षातर्फे सुरु असलेल्या बेमुदत उपोषणाला शनिवारी सहा दिवस पूर्ण झाले. या उपोषणाला मुंब्रावासीयांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र सहा दिवस उलटल्यानंतरही प्रशासनाकडून अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपोषणाची दखल घ्यावी व मुंब्रावासीयांना न्याय द्यावा, अशी मागणी एमआयएमचे मुंब्रा कळवा अध्यक्ष सैफ पठाण यांनी केली आहे. सैफ पठाण यांच्यासहित लिसान अन्सारी, शोएब डोंगरे, मुशीर शेख, नासीर शेख हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजन किणे, माजी नगरसेवक मोरेश्वर किणे, रमेश पाटील, सुधीर भगत, राजू अन्सारी तसेच  मुस्लिम लिग, समाजवादी पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष बादशाह सय्यद यांनी देखील या बेमुदत उपोषणाला पाठिबा दिला आहे. विविध सामाजिक संघटनांनी देखील या उपोषणाला पाठिबा दिला आहे.  मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील असल्याने त

स्त्री दर्पण तर्फे नालासोपारा येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस कार्यक्रम संपन्न

इमेज
स्त्री दर्पण तर्फे नालासोपारा येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस कार्यक्रम संपन्न तहेसीन चिंचोलकर: वसई    नालासोपारा येथील स्त्री दर्पण मासिकातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिवस कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून 100 वूमन ऑफ वर्ल्ड मध्ये सन्मानित करण्यात आलेल्या नायगाव येथील कर्मवीर स्नेहा जावळे, डॉ. रचना ताडे, नीता शिरसाट (व.वि.श मनपा), महिला उद्योजिका साक्षी सतीश  बोर्डे (आर.बी.डेव्हलपर्स), पत्रकार राजेश जाधव हजर होते.  कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती सावित्री बाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर दीप प्रज्वलन करून सुरुवात झाली. प्रज्योत मोरे पत्रकार यांच्या पत्नी यांना दोन मिनिटाचे मौन धरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आपले मत व्यक्त करताना स्त्री दर्पणच्या संपादिका तेहसीन चिंचोलकर म्हणाल्या,  नारी शक्ती ही एक निर्भीड अस्तित्व आहे व ती स्वतः ची ओळख देण्यासाठी तिला कोणाची गरज नाही असे मला वाटते येणाऱ्या काळात महिलांनी सदृढ व्हावे अशी अशा व्यक्त करुन महिला दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या.  तसेच शिवसेना पक्षाचे सोनल श्याम ठाकूर, उपसंपादक पूर्

मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार – मुख्यमंत्री

मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार – मुख्यमंत्री अधिवेशनानंतर दिल्लीत टास्क फोर्सची बैठक लोकमानस प्रतिनिधी मुंबई : - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी पुरेपूर आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील. पुर्णपणे ताकदीने हा न्यायालयीन लढा लढला जाईल. त्यासाठी आवश्यक तिथे केंद्र सरकारची मदत घेतली जाईल. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर दिल्ली येथे जाऊन वकिलांची टास्क फोर्स आणि संबंधित सर्वांना एकत्र घेऊन बैठक घेतली जाईल. त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहीन, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत दिली. मराठा समाज आरक्षणाशी संदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.  मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाज आरक्षणातील २०१८ पासून ते ५ मे २०२१ पर्यंतचे टप्पे विस्ताराने मांडले. आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाची समीक्षा करण्यासाठी न्या. दिलीप भोसले यांची समिती नियुक्त केली होती. या समितीने शिफारस केल्याप्रमाणे पुढची पावले टाकली जात आहेत. यात पुनर्विचार याचिका दाखल करणे, निष्कर्षा

कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून रोजगार वाढीसाठी प्रयत्न - मंगलप्रभात लोढा

इमेज
कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून रोजगार वाढीसाठी प्रयत्न - मंगलप्रभात लोढा लोकमानस प्रतिनिधी मुंबई : राज्यात कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य अभिजित वंजारी यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. मंत्री लोढा म्हणाले की, बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाने कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्याला प्राधान्य दिले आहे. यासाठी १२०० कोटी रूपये खर्च करून ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर कोणते अभ्यासक्रम महत्त्वाचे आहेत याबाबत स्थानिकांचे मत विचारात घेऊन एक, दोन, तीन महिन्यांचे विविध अभ्यासक्रम तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  कमी लोकसंख्येच्या गावात ५०० कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत आहेत. नोंदणीकृत बेरोजगारांपेक्षा नोंदणी न केलेल्यांची संख्या अधिक असून कौशल्य विकास केंद्रांचा त्यांना लाभ होईल, असे मंत्री श्री.लोढा

आव्हाड धमकी प्रकरणी सीआयडी चौकशी - देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

आव्हाड धमकी प्रकरणी सीआयडी चौकशी -  देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा   मुंबई - प्रतिनिधी  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकी  प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.  लोकप्रतिनिधी व कुटुंबियांना धमकी देण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही,  कुटुंबियांना कोणताही धोका होणार नाही याची काळजी घेतली जाईल व सुरक्षिततेबाबत तडजोड केली जाणार नाही, असे फडणवीस म्हणाले. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याचे फडणवीस म्हणाले.   गेल्या महिन्यात एक ऑडिओ क्लीप  व्हायरल झाली होती. त्या ऑडिओ क्लीपमध्ये  जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकावल्याचा आरोप झाला होता. ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तावर याबाबत आरोप झाले होते.  या प्रकरणी आव्हाड यांनी विधानसभेत मुद्दा मांडला होता.   उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या  कुटुंबियांच्या सुरक्षिततेबाबत जी ग्वाही दिली त्याबाबत आव्हाड यांनी त्यांचे आभार व्यक्त केले मात्र त्या अधिकाऱ्याचे शिक्षण,  केबिन मध्ये पैसे स्वीकारत असल

सभागृहातल्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवारांचा रुद्रावतार, जमत नसेल तर मंत्र्यांनी पदे सोडा

सभागृहातल्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवारांचा रुद्रावतार,  जमत नसेल तर मंत्र्यांनी पदे सोडा लोकमानस प्रतिनिधी  मुंबई : सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदस्य विविध आयुधांचा वापर करुन सभागृहात आपले प्रश्न मांडत असतात. मात्र सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे आज पुन्हा सहा पैकी केवळ एका लक्षवेधीवर सभागृहात चर्चा झाली, इतर लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली. मंत्र्यांच्या अनुपस्थितीचे प्रकार वारंवार होत असल्यामुळे संतापलेल्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा रुद्रावतार सभागृहाने अनुभवला. मंत्री व्हायला पुढे-पुढे करता मग सभागृहात का उपस्थित रहात नाही असा सवाल करुन मंत्र्यांना विधीमंडळाच्या कामकाजात कोणताच रस नाही, विधीमंडळाची गरीमा राखण्यात सत्ताधारी अपयशी ठरत असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. तसेच संसदीय कार्यमंत्री सुध्दा सभागृहात कायमच अनुपस्थित असतात, त्यांना जमत नसेल तर त्यांनी पद सोडावे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेत्यांनी केला. विरेोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राज्यासाठी हे अधिवेश अत्यंत महत्वाच