अविनाश जाधव यांच्या मुंब्रा प्रवेशावर पोलिसांची बंदी

 

अविनाश जाधव यांच्या मुंब्रा प्रवेशावर पोलिसांची बंदी

लोकमानस प्रतिनिधी

मुंब्रा पोलिस स्थानकाच्या हद्दीत प्रवेश करण्यास महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेच्या

अविनाश जाधव यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ चे कलम १४४ अन्वये हा मनाई आदेश देण्यात आला आहे.

२३ मार्च पासून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु झाला आहे. अविनाश जाधवविरोधात ठाणे पोलिस आयुक्तालयात राजकीय गुन्हे दाखल आहेत. मुंब्रा बायपास लगत असलेल्या अनधिकृत दर्गा, मजार, मशीद याविरोधात १५ दिवसांत कारवाई करावी अन्यथा त्या शेजारी अनधिकृत हनुमान मंदिर बांधण्यात येईल, असा इशारा जाधव यांनी सोशल मीडियाद्वारे दिला होता. एप्रिलच्या २२ किंवा २३ तारखेला रमजान ईद साजरी केली जाईल. मात्र जाधव यांच्या वक्तव्यामुळे गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडून शांतता भंग होण्याची शक्यता आहे व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे

,मनसे नेते अविनाश जाधव यांना मुंब्रामध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रवेश करण्यास अविनाश जाधव यांना बंदी घालण्यात आली आहे. अविनाश जाधव यांनी मुंब्र्यातल्या अवैध मशीद आणि मजारवर कारवाई करण्याचा अल्टिमेटम दिला होता. अविनाश जाधव यांच्या या कृतीमुळे मुंब्रामधील कायदा सुव्यवस्था बिघण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे, त्यामुळे अविनाश जाधव यांना प्रवेशबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.

कळवा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी विलास शिंदे यांनी याबाबत अविनाश जाधव यांना नोटिस दिली आहे. २७ मार्च ते ९ एप्रिल पर्यंत मुंब्रा पोलिस स्थानकाच्या हद्दीत प्रवेश न करण्याचे आदेश याद्वारे अविनाश जाधव यांना देण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही