रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची २ एप्रिल रोजी चेन्नईमध्ये बैठक - रामदास आठवले

 रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची २ एप्रिल रोजी चेन्नईमध्ये बैठक  - रामदास आठवले

 लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई दि. – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक  २ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता चेन्नई येथील लुंगापक्कम थिरुमूर्ती नगर येथील हॉटेल  पामग्रेव्ह येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीचे सदस्य, पदाधिकारी, सर्व राज्यांचे अध्यक्ष, प्रभारी आदि प्रमुख पदाधिका-यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. या बैठकीस रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

देशात सुरु असलेल्या राजकीय  घडामोडी तसेच रिपब्लिकन पक्षाच्या देशभरातील विस्ताराबाबत या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्षाचा जनाधार वाढत आहे. त्या दृष्टीने रिपब्लिकन पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या यशस्वीतेबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्षाला चांगले यश मिळाले असून रिपब्लिकन पक्षाची विजयी घोडदौड उत्तर भारत आणि दक्षिण भारतातही यशस्वी होण्यासाठी  रामदास आठवले या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब