आव्हाड धमकी प्रकरणी सीआयडी चौकशी - देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

आव्हाड धमकी प्रकरणी सीआयडी चौकशी - 
देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा 
मुंबई - प्रतिनिधी 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकी  प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. 
लोकप्रतिनिधी व कुटुंबियांना धमकी देण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही,  कुटुंबियांना कोणताही धोका होणार नाही याची काळजी घेतली जाईल व सुरक्षिततेबाबत तडजोड केली जाणार नाही, असे फडणवीस म्हणाले. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याचे फडणवीस म्हणाले.  


गेल्या महिन्यात एक ऑडिओ क्लीप  व्हायरल झाली होती. त्या ऑडिओ क्लीपमध्ये 
जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकावल्याचा आरोप झाला होता. ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तावर याबाबत आरोप झाले होते. 
या प्रकरणी आव्हाड यांनी विधानसभेत मुद्दा मांडला होता. 
 उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या 
कुटुंबियांच्या सुरक्षिततेबाबत जी ग्वाही दिली त्याबाबत आव्हाड यांनी त्यांचे आभार व्यक्त केले मात्र त्या अधिकाऱ्याचे शिक्षण,  केबिन मध्ये पैसे स्वीकारत असल्याचे व्हिडिओ व दररोज 40 लाख रुपये कमावण्याच्या आरोपांबाबत कारवाईची मागणी केली.

त्यावर फडणवीस यांनी उत्तर देताना सदर अधिकाऱ्याबाबत आव्हाड यांनी उपस्थित केलेल्या शिक्षण व इतर बाबींची चौकशी करण्यात येईल व पडताळणी करुन आवश्यकता असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तपास करेल,  असे स्पष्ट केले. 

पत्रकारांशी बोलताना आव्हाड यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.  सीआयडी चौकशी म्हणजे केवळ वेळकाढूपणा आहे.  सरकार आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप त्यांनी केला.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही