टोरंट पॉवर विरोधात उपोषणाला मुंब्रावासियांचा वाढता पाठिंबा


टोरंट पॉवर विरोधात उपोषणाला मुब्रावासियांचा वाढता पाठिंबा

मुंब्रा - प्रतिनिधी

टोरंट पॉवर विरोधात एमआयएम पक्षातर्फे सुरु असलेल्या बेमुदत उपोषणाला शनिवारी सहा दिवस पूर्ण झाले. या उपोषणाला मुंब्रावासीयांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र सहा दिवस उलटल्यानंतरही प्रशासनाकडून अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपोषणाची दखल घ्यावी व मुंब्रावासीयांना न्याय द्यावा, अशी मागणी एमआयएमचे मुंब्रा कळवा अध्यक्ष सैफ पठाण यांनी केली आहे.
सैफ पठाण यांच्यासहित लिसान अन्सारी, शोएब डोंगरे, मुशीर शेख, नासीर शेख हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजन किणे, माजी नगरसेवक मोरेश्वर किणे, रमेश पाटील, सुधीर भगत, राजू अन्सारी तसेच  मुस्लिम लिग, समाजवादी पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष बादशाह सय्यद यांनी देखील या बेमुदत उपोषणाला पाठिबा दिला आहे. विविध सामाजिक संघटनांनी देखील या उपोषणाला पाठिबा दिला आहे. 

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची अपेक्षा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील असल्याने त्यांनी या उपोषणाची व आमच्या मागण्यांची दखल घेऊन मुब्रावासीयांना न्याय दयावा, अशी मागणी पठाण यांनी चित्रफितीद्वारे केली आहे.

मुंबा कळवा शिळ या भागाची टोरंट पॉवर कंपनीला दिलेली फ्रेंचायसी रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी टोस्ट पॉवर विरोधात एमजायएम पक्षातर्फे सोमवार 13 मार्चपासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. जोपर्यंत टोरंट कंपनी या उपोषणाची दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार पठाण यांनी व्यक्त केला आहे.

कायमस्वरुपी रद्द (पी.डी.) चे थकित बिल दाखवून ग्राहकांकडून जबरदस्तीने पैसे वसूल केले जात असल्याचा प्रकार त्वरित बंद करावा, म.रा.वि.म. व महावितरणच्या काळात ज्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना त्याची जोडणी कायमस्वरुपी रद्द करुन दिली होती त्या अधिकाऱ्याविरोधात कारवाई करावी, ग्राहकांच्या परवानगी शिवाय मीटर बदलू नये, ज्या ग्राहकांजवळ वीज मीटर नाहीत त्यांना त्वरित वीज मीटर यावेत, ज्या ग्राहकांकडून पी. डी. बाबत रक्कम वसूल करण्यात आली आहे त्यांना पैसे परत करावेत, ज्या ग्राहकांचे वीज मीटर बदलण्यात आले आहेत त्याना लॅब टेस्टिंग रिपोर्ट दयावेत अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही