पँन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याला मुदतवाढ

पँन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याला मुदतवाढ
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई - पँन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची 31 मार्च पर्यंतची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. 31 मार्चची अंतिम मुदत तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे.  त्यामुळे आता 30 जून पर्यंत पँन व आधार एकमेकांशी लिंक करता येणे शक्य होणार आहे. 
यापूर्वी अनेकदा ही मुदत वाढवण्यात आली आहे. 
जुलै 2022 पासून पँन व आधार लिंक करण्यासाठी नागरिकांना एक हजार रुपयांचा दंड भरावा लागत आहे.  गेल्या काही दिवसांपासून पँन व आधार लिंक करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याने  या वेबसाईटवर पडत असल्याने वेबसाईट चालत नव्हती. त्यामुळे पँन व आधार लिंक करु इच्छिणाऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. दंडाच्या रक्कमेत वाढ होण्याची भीती वर्तवली जात होती. मात्र आता ही मुदत वाढवल्याने नागरिकांना दिलासा मिळू शकेल. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही