ठाणे महापालिका क्षेत्रात वर्षातून दोन वेळा नाले सफाई अनिवार्य करा- शानू पठाण यांची मागणी

 

ठाणे महापालिका क्षेत्रात वर्षातून दोन वेळा नाले सफाई अनिवार्य करा-  शानू पठाण यांची मागणी

प्रतिनिधी

मुंब्रा -  अवकाळी पावसाचा मुंब्रा परिसराला फटका बसला. जोरदार पावसामुळे तुंबलेल्या नाल्यातील कचऱ्यामुळे पाणी वाहून न गेल्याने ठिकठिकाणी पाणी साचले. नियमित नालेसफाईला वेळ असल्याने अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. त्यामुळे ठाणे महानगरपालिका हद्दीत वर्षातून किमान दोन वेळा नाले सफाई केली जावी, अशी मागणी ठाणे महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानु पठाण यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

 

 

शानू पठाण यांनी  मुंब्रा कौसा मधील मोठे, छोटे सर्व नाले व गटार सफाई वर्षातून दोन वेळा करण्याची मागणी केली आहे. आज अचानक आलेल्या पावसामुळे फारच मोठी गंभीर समस्या उद्भवली. सर्व लहान मोठया नाल्यातील कचरा विविध ठिकाणी रस्त्यावर आला. त्यावेळी  स्वतः अशरफ शानु पठाण यांनी जातीने हजर राहून पालिका कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सोनाजी नगर, अमृत नगर, कैलास नगर, शिवाजी नगर, रईस बाग रोड तसेच अमृत नगर दरगाह कब्रस्तान या विविध भागात रस्ते साफसफाई मोहीम हाती घेतली.

 

प्रशासनाने ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील नाले सफाईच्या सध्याच्या निविदेत वर्षातून दोन वेळा नाले गटार सफाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी केली. भविष्यात असा अचानक पाऊस आल्यास आज सारखी गंभीर समस्या संपूर्ण ठाणे पालिका क्षेत्रात  उद्भवणार नाही, असे ते म्हणाले. सध्या नागरिक विविध आजारांनी त्रस्त आहेत त्यात ह्या गटार नाले मधील कचऱ्या मुळे विविध आजार पसरू शकतात तेव्हा आपण या प्रश्नावर गांभीर्याने विचार करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी शानू पठाण यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही