पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दिवसभराच्या चौकशीनंतर ईडी कडून संजय राऊत यांना अटक

दिवसभराच्या चौकशीनंतर ईडी कडून संजय राऊत  यांना अटक मुंबई लोकमानस प्रतिनिधी  रविवारी सकाळपासून दिवसभरात केलेल्या चौकशीनंतर अखेर रात्री उशिरा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली. रविवारी सकाळी राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी ईडीने छापा मारला व रोख रक्कम जप्त केली. त्यानंतर सायंकाळी त्यांना ईडीच्या नेण्यात आले  व   कार्यालयात सुमारे आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. पत्राचाळ प्रकरणी १०३४ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी करुन ही कारवाई करण्यात आली आहे.  शिवसेनेचा व संजय राऊत यांचा आवाज दाबण्यासाठी ही अटकेची कारवाई करण्यात आली. खोटे पुरावे दाखवून ही अटक करण्यात आली मात्र आम्ही शेवटपर्यंत लढत राहु व शेवटी सत्याचाच विजय होईल अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी व्यक्त केली.  सोमवारी सकाळी राऊत यांना रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले जाईल व त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाईल. 

वी-ट्रान्स (इंडिया) लिमिटेडच्या ग्रुपच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी महेंद्र शाह यांची पदोन्नती

इमेज
  वी-ट्रान्स (इंडिया) लिमिटेडच्या   ग्रुपच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी  महेंद्र शाह यांची  पदोन्नती  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई:  देशातील एक अग्रगण्य सिंगल विंडो लॉजिस्टिक सोल्युशन प्रदाता असलेल्या वी-ट्रान्स (इंडिया) लिमिटेड ने महेंद्र शाह यांना वी-ट्रान्स (इंडिया) लिमिटेड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नती दिली आहे. अगोदर ते व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत होते.    त्यांना लॉजिस्टिक व्यवसायात ४७ वर्षांहून अधिक अनुभव आहे, आणि संस्था आता जिथे आहे तिथे नेण्यात आणि मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. गेली २५ वर्षे ते या सर्व गोष्टींची जबाबदारी सांभाळत आहेत आणि या पदोन्नतीनंतर त्यांचा उत्साह आणि आवेश अनेक पटींनी वाढणार आहे.   हा वारसा पुढे चालू ठेवत, ते दीर्घकालीन नियोजन, व्यवसाय आणि विस्तार योजना तसेच धोरण-निर्धारणाचे नेतृत्व करतील. मंडळाला मार्गदर्शन करतील, दीर्घकालीन उद्दिष्टे आणि प्राधान्यक्रमांची पूर्तता सुनिश्चित करतील.    अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून आपल्या पदोन्नतीबद्दल बोलताना, महेंद्र शाह म्हणाले,  “व्

मेट्रोच्या कामामुळे १० ऑगस्टपर्यंत ठाणेकडील घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल

  मेट्रोच्या कामामुळे  १० ऑगस्टपर्यंत ठाणेकडील घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल लोकमानस प्रतिनिधी  ठाणे  :-  ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीत मुंबई मेट्रो लाईन-४ चे काम चालू आहे. या मेट्रो ४ च्या पिलरवर ओवळा सिग्नल ते सी.एन.जी. पंप पर्यंत घोडबंदर रोड या ठिकाणी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. हे गर्डर टाकतांना ठाणेकडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने, या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित होण्याकरीता ठाणे शहर वाहतूक विभागाने दि. 10 ऑगस्ट 2022 पर्यंत या परिसरातील वाहतुकीत बदल केले असल्याचे पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविले आहे. वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे - प्रवेश बंद -  मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे "प्रवेश बंद" करण्यात येत आहे पर्यायी मार्ग -  मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाबाबतचा सुधारित प्रस्ताव प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत सादर करावा – मुख्यमंत्री

इमेज
  रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाबाबतचा सुधारित प्रस्ताव प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत सादर करावा – मुख्यमंत्री  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई :  रत्नागिरी येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार असून यासाठीचा सुधारित प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील आढावा बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार उदय सामंत, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यामध

समाजवादी पक्षाच्या महिला अध्यक्षपदी नूर अहमदी चौधरी यांची निवड

इमेज
  समाजवादी पक्षाच्या महिला अध्यक्षपदी नूर अहमदी चौधरी   यांची निवड लोकमानस प्रतिनिधी मुंब्रा समाजवादी पक्षाच्या मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाच्या महिला अध्यक्षपदी नूर अहमदी चौधरी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. नूर यापूर्वी प्रभाग क्रमांक ३० च्या पक्षाच्या महिला अध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या. समाजवादी पक्षाचे मुंब्रा कळवा अध्यक्ष आदिल खान आझमी, कार्याध्यक्ष कलिम जामई व पदाधिकारी राशिद खान यांच्या उपस्थितीत चौधरी यांना नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांच्या निर्देशानुसार चौधरी यांना महिला अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नूर चौधरी म्हणाल्या, पक्ष नेतृत्वाने आपल्यावर दिलेल्या या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी पूर्ण क्षमतेने सांभाळण्यात येईल. मुंब्रा कळवा विभागातील नागरिकांच्या व विशेषतः महिलांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आपण कार्यरत राहू, असे त्या म्हणाल्या.

अतिवृष्टी सुरू झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ ही सरकारसाठी शरमेची बाब - अजित पवारसरकार काय ताम्रपट घेऊन आले आहे का?

इमेज
अतिवृष्टी सुरू झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ ही सरकारसाठी शरमेची बाब  - अजित पवार सरकार काय ताम्रपट घेऊन आले आहे का? लोकमानस प्रतिनिधी मुंबई - राज्यात दोन जणांचे मंत्रीमंडळ अस्तित्वात आलेले असताना मंत्रीमंडळ विस्तार केला जात नाही राज्यातील तेरा कोटी जनतेचा अपमान आहे. तुम्हाला बहुमत आहे तर मंत्रीमंडळ अस्तित्वात आणा. आज शेतकरी त्रासून गेला आहे. अतिवृष्टी सुरू झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत ही या सरकारच्यादृष्टीने शरमेची बाब आहे, अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.  एकंदरीतच मंत्रीमंडळाचा विस्तार का होत नाही हे शिंदे व फडणवीस यांना माहीतच असेल. त्या दोघांना आपलं चांगलं चाललंय असे वाटत आहे,असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.  सरकार  ताम्रपट घेऊन आले आहे का? शिंदेनी तर आमच्या सरकारमध्ये काम केले तेच आज आमच्या सरकारमधील कामांना स्थगिती देत आहेत. सरकारे येत असतात जात असतात, हे सरकार काय ताम्रपट घेऊन आले आहे का? विकासकामे आहेत. ती का थांबवत आहात, आमच्या घरातील कामे आ

मतदार ओळखपत्रांशी आधार कार्ड संलग्न करा, - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन 1 ऑगस्टपासून राज्यभर विशेष मोहीम

मतदार ओळखपत्रांशी आधार कार्ड संलग्न करा,  - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन  1 ऑगस्टपासून राज्यभर विशेष मोहीम लोकमानस प्रतिनिधी   मुंबई :मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम राज्यभर 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.   नवीन मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने उपाययोजना केली असून यापूर्वी वर्षातून एकदा मतदार नोंदणी केली जायची. तथापि आता भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी ही वर्षातून 4 वेळा म्हणजेच 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.    आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी संलग्न करण्यासाठी मतदारांना अर्ज क्र. 6ब हा फार्म भरायचा आहे. हा अर्ज सर्व मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये, भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ (https://eci.gov.in/) आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ (https://ceo.maharasht

२०१४ मध्ये चणा डाळ, उडद डाळ व तूर डाळीसाठी भरलेली थकबाकी रक्कम त्वरित परत द्या, मुंबई रेशन दुकानदार संघटनेच्या नवीन मारु यांची मागणी

इमेज
  २०१४ मध्ये चणा डाळ, उडद डाळ व तूर डाळीसाठी भरलेली थकबाकी रक्कम त्वरित परत द्या,   मुंबई रेशन दुकानदार संघटनेच्या नवीन मारु यांची मागणी लोकमानस प्रतिनिधी मुंबई – २०१४ मध्ये   रेशन दुकानदारांनी चणा डाळ, उडद डाळ व तूर डाळी साठी भरलेली व आतापर्यंत थकबाकी असलेली रक्कम त्वरित देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी मुंबई रेशन दुकानदार संघटनेने केली आहे. २०१४ मध्ये शिधावाटप दुकानदारांनी शिधावाटप अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार     महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनमध्ये पैसे आरटीजीएस द्वारे पाठवले होते. मात्र त्यावेळी पैशांच्या प्रमाणात डाळ उपलब्ध झाली नसल्याने भरलेले पैसे दुकानदारांना परत करण्याची गरज आहे. मात्र २०१४ पासून अद्यापपर्यंत हे पैसे परत मिळालेले नसल्याने हे पैसे त्वरित परत देण्याची प्रक्रिया सुरु करण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष नवीन मारु यांनी सरकारकडे केली आहे. ही रक्कम सुमारे सव्वा चार कोटी रुपये असल्याची माहिती मारु यांनी दिली. याबाबत, संघटनेच्या पत्रानंतर व पाठपुराव्यानंतर अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सहाय्यक संचालकांनी याबाबत सर्व शिधावाटप   उ

विदर्भ,मराठवाड्यासह अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची अजित पवार यांची मागणी विधीमंडळाचे अधिवेशन तात्काळ बोलवण्याची मागणी

विदर्भ,मराठवाड्यासह अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी   विधीमंडळाचे अधिवेशन तात्काळ बोलवण्याची मागणी लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अतिवृष्टी व पूरामुळे झालेले शेतजमीन आणि पिकांचे नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलावण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही पत्र लिहिले असून राज्यात झालेल्या नुकसानीची गंभीरता राज्यशासनाच्या लक्षात आणून दिली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात जून महिन्याच्या जवळपास २०  तारखेपासून ते आज दि. २५  जुलै २०२२ पर्यंत सातत्याने पाऊस पडत आहे. राज्यातील काही भागांमध्ये मी स्वत: पाहणी केली असून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याशी सातत्याने दूरध्वनीद्वारे

द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ

इमेज
  द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ लोकमानस प्रतिनिधी मुंबई – देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी शपथ घेतली. आदिवासी समाजातून येणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनण्याचा मान त्यांना मिळाला आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी त्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. नवनिर्वाचित राष्ट्रपतींनी हिंदी मध्ये शपथ घेतली. मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. यापूर्वी १५ वर्षांपूर्वी देशाच्या पहिला महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांनी विजय मिळवला होता. सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची नोंद झाली आहे. शपथविधीवेळी त्यांचे   वय ६४ वर्षे १ महिना ८ दिवस आहे तर यापूर्वी सर्वात कमी वयाचे राष्ट्रपती म्हणून नीलम संजीव रेड्डी यांची नोंद होती राष्ट्रपती पदाची शपथ घेताना त्यांचे वय ६४ वर्षे   २ महिने ६ दिवस होते. स्वतंत्र भारतात जन्मलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. राष्ट्रपतींच्या सुरक्षेची जबाबदारी प्रेसिडंटस बॉडी गार्डस (पीजीबी) कडे असते. राष्ट्रपती या तीन्ही सेन

ऑगस्ट पासून ठाणेकरांना मिळणार 50 एमएलडी अतिरिक्त पाण्याचा लाभ

ऑगस्ट पासून ठाणेकरांना मिळणार 50 एमएलडी अतिरिक्त पाण्याचा लाभ जलसंपदा विभागाने ठाणे शहराला अतिरिक्त पाणी देण्याला दिली मंजुरी लोकमानस प्रतिनिधी  मुंबई  - 1 ऑगस्ट पासून ठाणे शहरातील नागरिकांना 50 एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याला राज्याच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे विस्तारित ठाणे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत त्यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाला ठाणे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे  निर्देश दिले होते. यानुसार राज्याच्या जलसंपदा विभागाने अतिरिक्त 50 एमएलडी पाणी देण्याला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे ठाणे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. खर तर ठाणे शहराचा वेगाने विस्तार झाल्यामुळे विस्तारित ठाणे शहराला पाणी पुरवठा करताना ठाणे महानगरपालिकेला मोठी कसरत करावी लागत होती. मात्र आता हे पाणी मिळाल्यामुळे त्यांना दिलासा देणे पालिकेला देखील शक्य होणार आहे.  ठाणे शहराला दररोज 485 दशलक्ष मिलिलिटर एवढा पाणीपुरवठा करण्यात येतो मा

द्रौपदी मुर्मू देशाच्या नवीन राष्ट्रपती, यशवंत सिन्हा यांचा पराभव

इमेज
द्रौपदी मुर्मू देशाच्या नवीन राष्ट्रपती, यशवंत सिन्हा यांचा पराभव लोकमानस प्रतिनिधी मुंबई – देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू  विजयाच्या मार्गावर आहेत.   विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा पराभवाच्या छायेत आहेत. आदिवासी समाजातातून येणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती बनण्याचा मान त्यांना मिळाला आहे. १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी देशभरात मतदान झाले होते. मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीत द्रौपदी मुर्मू यांना एकूण वैध मतांच्या पन्नास टक्के पेक्षा जास्त मते मिळाली आहेत.  मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. यापूर्वी १५ वर्षांपूर्वी देशाच्या पहिला महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांनी विजय मिळवला होता. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी समाप्त होत आहे. त्यानंतर २५ जुलै रोजी द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारतील. संसद भवनात या निवडणुकीची मतमोजणी करण्यात आली.     

सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद मिळविणाऱ्या एनसीसी कॅडेट्सनार राज्यपालांची कौतुकाची थाप

सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद मिळविणाऱ्या एनसीसी कॅडेट्सना राज्यपालांची कौतुकाची थाप  लोकमानस प्रतिनिधी              मुंबई : एनसीसी आंतरराज्यीय नेमबाजी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकासह विजेतेपद मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र एनसीसी कॅडेट्सना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे बोलावून कौतुकाची थाप दिली. महाराष्ट्र एनसीसी चमूने आता विजयाची हॅटट्रिक करण्याचे ध्येय समोर ठेवावे तसेच पुढील वर्षी अधिकाधिक सुवर्ण पदके जिंकावी अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.              राज्यपालांच्या हस्ते यावेळी सर्व कॅडेट्सना छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा व डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे पुस्तक भेट देण्यात आले. चंदिगढ येथे झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी  चमूने ६ सुवर्ण ,   ५ रौप्य व १ कांस्य पदक प्राप्त केले.               यावेळी एनसीसी महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महानिदेशक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी ,  कमांडोर  सतपाल सिंह ,  ब्रिगेडिअर सी मधवाल ,  नेमबाजी चमूचे प्रभारी अधिकारी कर्नल सतीश शिंदे तसेच नेमबाजी स्पर्

मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात आरपारची लढाई- नाना पटोलेमुंबई आणि नागपूरच्या ईडी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा

इमेज
मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात आरपारची लढाई-  नाना पटोले मुंबई आणि नागपूरच्या ईडी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा  मुंबई - कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून केली जात असलेली चौकशी केंद्रातील मोदी सरकारच्या इशाऱ्यावरून केली जात आहे. २०१५ साली मोदी सरकारनेच नॅशनल हेराल्ड प्रकरण काही तथ्य नसल्याने बंद केले होते परंतु महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस पक्ष, सोनियाजी, राहुलजी हे सातत्याने केंद्र सरकारला धारेवर धरत असल्याने ईडीच्या माध्यमातून गांधी कुटुंबाला त्रास दिला जात आहे. काँग्रेस पक्ष अशा हुकूमशाहीसमोर झुकत नाही तर त्याविरोधात आरपारची लढाई लढेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. केंस सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ईडी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री डॉ. नितीन राऊत,  वर्षा गायकवाड, अस्लम शेख, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोर

कुलाबा येथील इमारतींच्या पुनर्विकास कामाला गती द्या – राहुल नार्वेकर यांचे निर्देश

  कुलाबा येथील इमारतींच्या पुनर्विकास कामाला गती द्या – राहुल   नार्वेकर  यांचे निर्देश लोकमानस प्रतिनिधी   मुंबई :   कुलाबा येथील म्हाडा अंतर्गत असलेल्या इमारतींच्या पुनर्विकासामुळे सर्वसामान्य नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध होणार आहेत. पुनर्विकासाचे काम मार्गी लागण्यासाठी संरक्षण विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र महत्वाचे आहे. त्यामुळे म्हाडा ,  नगरविकास विभाग ,  मुंबई महानगरपालिका यांनी संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी ,  पुनर्विकासासाठी आवश्यक परवानगी ,  नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी संबंधित विभागांनी एकत्रितपणे ,  प्रयत्न करावेत ,  कुलाबा येथील इमारतींच्या पुनर्विकास कामाला गती द्यावी ,  तसेच संरक्षण विभागाने देखील यापुढे ना हरकत प्रमाणपत्र नाकारताना कारणमीमांसेसह नाकारावे जेणेकरुन अर्जदारांना योग्य त्या दुरुस्त्या करुन पुन्हा प्रस्ताव सादर करता येतील ,  असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिले. यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल येत्या तीन आठवड्यात सादर करण्याचे देखील त्यांनी निर्

११७ कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एकास अटक

  ११७ कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एकास   अटक लोकमानस प्रतिनिधी मुंबई :   खोटी खरेदीची देयके प्राप्त करून शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाऱ्या    करदाता मे पाकीजा स्टिल एलएलपी चे भागीदार आणि मे मायल स्टिल प्रा.लि. चे संचालक सय्यद तैकीर हसन रिजवी यांनी या प्रकरणामध्ये वस्तूंच्या वा सेवांच्या पुरवठ्याशिवाय ९९.२७ कोटी रुपयांची बनावट देयके प्राप्त करुन १७.८७ कोटी रुपयांची बनावट वजावट मिळविल्याप्रकरणी सय्यद तैकीर हसन रिजवी या व्यक्तीस महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरी प्रकरणी अटक केली आहे. सय्यद तैकीर हसन रिजवी यांनी मे. पाकीजा स्टिल एलएलपी आणि मे मायल स्टिल प्रा. लि. या दोन बोगस कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे ९९.२७ कोटी रुपयांची खोटी खरेदीची देयके प्राप्त केली आहेत. त्यातून या व्यक्तीने शासनाची सुमारे १७.८७ कोटी रुपयांची महसूल हानी केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. या प्रकरणामध्ये वस्तू व सेवांचा पुरवठा न करता महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम ,  २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन केले गेले आहे

ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील,राज्यातील निवडणुका ओबीसी आरक्षणानुसार होणार दोन आठवड्यात घेण्याचे निर्देश

ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील निवडणुका ओबीसी आरक्षणानुसार होणार दोन आठवड्यात घेण्याचे निर्देश मुंबई- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणानुसार घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नेमलेल्या बांठिया आयोगाने दिलेला ओबीसींचा इंपीरिकल डाटाबाबतचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने तो अहवाल स्वीकारला असून त्याप्रमाणे ओबीसी आरक्षण लागू करुन निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.  राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रलंबित असून  दोन आठवड्यात या निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाला दिलासा मिळाला आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्य सचिव जयंत बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला होता.

सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी १ ऑगस्टला

  सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी १ ऑगस्टला लोकमानस प्रतिनिधी मुंबई – सर्वोच्च न्यायालयातील राज्य सरकारचे भवितव्य ठरवणाऱ्या याचिकेवर पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे. दोन्ही बाजूंना मुद्दे मांडण्यासाठी व प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी न्यायालयाने हा आदेश दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे भवितव्य ठरवणाऱ्या या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर पडल्याने राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण , न्यायमूर्ती कृष्ण मुरारी व न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या त्रिसदस्यीय पीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर पुढील बुधवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

राहुल शेवाळे लोकसभेतील नवे गटनेते, उध्दव ठाकरेंना धक्का

राहुल शेवाळे लोकसभेतील नवे गटनेते, उध्दव ठाकरेंना धक्का   लोकमानस प्रतिनिधी  मुंबई शिवसेनेच्या बारा लोकसभा खासदारांनी स्वतंत्र गट तयार करुन लोकसभा अध्यक्षांकडे नोंदणीसाठी अर्ज केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांचा अर्ज स्वीकारुन लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे व चीफ व्हीप म्हणून भावना गवळी  यांच्या नावाला मान्यता दिली आहे.   त्यामुळे शिवसेनेला विधानसभेपाठोपाठ लोकसभेत देखील मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी दुपारी या बारा खासदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती. 

माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडी कडून अटक

माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडी कडून अटक   लोकमानस प्रतिनिधी मुंबई- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त तथा राज्याचे माजी प्रभारी पोलिस महासंचालक संजय पांडे यांना आज ईडी ने अटक केली. एनएसई घोटाळ्याप्रकरणी पांडे यांची यापूर्वी ईडी कडून चौकशी झाली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांना दिल्लीत विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. मनी लॉन्ड्रिंग कायद्यान्वये त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. एनएसईची माजी सीईओ चित्रा रामकृष्णन या प्रकरणी आधीच तुरुंगात आहे. पांडे यांच्या कंपनीला 2010 ते 2015 या कालावधीत एनएसईच्या ऑडिटचे काम मिळाले होते त्यावेळी को-लोकेशन घोटाळा झाला होता. पांडे 1986 च्या बँचचे आयपीएस अधिकारी आहेत.  त्यांच्या कंपनीला एनएसई कडून कोट्यवधी रुपये मिळाले व त्याबदल्यात एनएसई कर्मचाऱ्यांचे फोन टँपिंग केले गेले असा ईडी ला संशय आहे. 

राष्ट्रीय स्तरावर भारतीय मुस्लिम नागरी हक्कांची स्थापना करणे ही काळाची गरज : सलमान खुर्शीद

इमेज
 राष्ट्रीय स्तरावर भारतीय मुस्लिम नागरी हक्कांची स्थापना करणे ही काळाची गरज : सलमान खुर्शीद मुंबई : देशातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि कायदेशीर क्षेत्रात काम करणाऱ्या काही मुस्लिम विचारवंतांनी एकत्र येऊन देशात एक चळवळ चालवली आहे, लोकांमध्ये जागृती आणली आहे आणि देशाची घटना आणि धर्मनिरपेक्षता वाचवली आहे. या संदर्भात इस्लाम जिमखान्याचे अध्यक्ष अँड युसूफ अब्राहनी, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष नसीम सिद्दीकी आणि सामाजिक कार्यकर्ते सलीम अलवारे यांनी इस्लाम जिमखान्यात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. य बैठकीला माजी केंद्रीय मंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सलमान खुर्शीद, माजी खासदार मोहम्मद अदीब, माजी खासदार ज्येष्ठ वकिल मजीद मेमन, फाजील अयुबी, अबरार अहमद, मसूद रिझवी, डॉ. सलीम खान, शाकीर शेख, अब्दुल हसीब भाटकर आणि मुहम्मद आझम बेग उपस्थित होते.  यावेळी सलमान खुर्शीद म्हणाले की, देशाच्या सध्याच्या परिस्थितीत जिथे अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत, विशेषत: मुस्लिमांना त्यांच्याकडून केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा दिली जात आहे. या परिस्थितीत नागरी हक्क खोडून काढले

केंद्रीय वक्फ कॉन्सिलच्या वसीम खान यांचा विक्रोळीत सत्कार

    केंद्रीय वक्फ कॉन्सिलच्या वसीम खान यांचा विक्रोळीत सत्कार लोकमानस प्रतिनिधी मुंबई – केंद्रीय वक्फ कॉन्सिलचे सदस्य तथा भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे मुंबई अध्यक्ष वसीम खान यांचा नुकताच विक्रोळी मध्ये सत्कार करण्यात आला. शहरातील अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रलंबित समस्या, विक्रोळी परिसराला भेडसावणारा मुस्लिम कब्रस्तानचा प्रश्न, शैक्षणिक संस्थांची वाढती गरज अशा विविध बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. विक्रोळी टागोर नगर येथील सामाजिक कार्यकर्ते आसिफ कुरैशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ऑल इंडिया यूनियन चे अध्यक्ष विनायक कामत उपस्थित होते. चर्चेदरम्यान मांडण्यात आलेल्या समस्या पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे मांडून त्यावर मार्ग काढण्यात येईल,अशी वसीम खान यांनी ग्वाही दिली.    

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतली शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतली  शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट लोकमानस प्रतिनिधी मुंबई – नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट घेतली व त्यांच्यासोबत चर्चा केली.सायंकाळी मु ख्यमंत्री या खासदारांसह भाजप श्रेष्ठींची भेट घेतील अशी शक्यता आहे. सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन संवाद साधणार आहेत त्यावेळी या खासदारांच्या राजकीय वाटचालीबाबत ते माहिती देतील अशी शक्यता आहे. शिंदेंच्या भेटीस १२ खासदार उपस्थित असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना धक्का बसला आहे. शिंदे गटासोबत असलेल्या शिवसेना खासदारांमध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, सदाशिव लोखंडे, धैर्यशील माने, हेमंत पाटील, संजय मंडलिक, भावना गवळी, हेमंत गोडसे, कृपाल तुमाणे, श्रीरंग बारणे, राजेंद्र गावित, प्रताप जाधव यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे लोकसभेमध्ये विनायक राऊत गटनेते आहेत तर राजन विचारे प्रतोद आहेत. शिंदे गटातर्फे भावना गवळी यांना प्रतोद तर राहुल शेवाळेंना गटनेतेपदी नियुक्त केले जाणार आहे, त्याबाबतचे पत्र लो

राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी२८३ सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क

राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी २८३ सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क   लोकमामस प्रतिनिधी            मुंबई : राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी आज २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात मतदानासाठी व्यवस्था करण्यात आली होती.           राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी आज सकाळी दहा वाजता मतदान सुरू झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत असलेल्या वेळेत २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती विधिमंडळाचे प्रधान सचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांनी दिली.            केंद्रीय निवडणूक निरीक्षक अमित अगरवाल, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधिमंडळाचे उपसचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी  शुभा बोरकर यांनी कामकाज पाहिले.

इंदूरहून अमळनेरला जाणारी एसटी नदीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू

  इंदूरहून अमळनेरला जाणारी एसटी नदीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू लोकमानस प्रतिनिधी मुंबई – इंदूरहून अंमळनेरला जाणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या बसमधील १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही प्रवासी बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरु आहे. मध्यप्रदेशात हा अपघात झाला. बसचा सांगाडा नदी पात्राबाहेर काढण्यात आला आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.     एसटी बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखाचे आर्थिक सहाय्य   मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही करावी , असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत.              आज सकाळी इदूंर र होऊन अमळनेरकडे निघालेली एसटी महामंडळाची बस मध्यप्रदेशमधील खलघाट आणि ठिकरी यामधील नदीच्या पुलावरून नर्मदा नदीत कोसळली.              बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जख