द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ

 

द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई – देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी शपथ घेतली.

आदिवासी समाजातून येणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनण्याचा मान त्यांना मिळाला आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी त्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. नवनिर्वाचित राष्ट्रपतींनी हिंदी मध्ये शपथ घेतली.


मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. यापूर्वी १५ वर्षांपूर्वी देशाच्या पहिला महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांनी विजय मिळवला होता. सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची नोंद झाली आहे. शपथविधीवेळी त्यांचे  वय ६४ वर्षे १ महिना ८ दिवस आहे तर यापूर्वी सर्वात कमी वयाचे राष्ट्रपती म्हणून नीलम संजीव रेड्डी यांची नोंद होती राष्ट्रपती पदाची शपथ घेताना त्यांचे वय ६४ वर्षे  २ महिने ६ दिवस होते. स्वतंत्र भारतात जन्मलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.

राष्ट्रपतींच्या सुरक्षेची जबाबदारी प्रेसिडंटस बॉडी गार्डस (पीजीबी) कडे असते. राष्ट्रपती या तीन्ही सेना दलाच्या सर्वोच्च कमांडर असल्याने राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था केलेली असते. १७० जवान व दीड डझन अधिकारी या सुरक्षे व्यवस्थेत तैनात असतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही