माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडी कडून अटक

माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडी कडून अटक 
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त तथा राज्याचे माजी प्रभारी पोलिस महासंचालक संजय पांडे यांना आज ईडी ने अटक केली. एनएसई घोटाळ्याप्रकरणी पांडे यांची यापूर्वी ईडी कडून चौकशी झाली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांना दिल्लीत विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. मनी लॉन्ड्रिंग कायद्यान्वये त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
एनएसईची माजी सीईओ चित्रा रामकृष्णन या प्रकरणी आधीच तुरुंगात आहे. पांडे यांच्या कंपनीला 2010 ते 2015 या कालावधीत एनएसईच्या ऑडिटचे काम मिळाले होते त्यावेळी को-लोकेशन घोटाळा झाला होता. पांडे 1986 च्या बँचचे आयपीएस अधिकारी आहेत. 
त्यांच्या कंपनीला एनएसई कडून कोट्यवधी रुपये मिळाले व त्याबदल्यात एनएसई कर्मचाऱ्यांचे फोन टँपिंग केले गेले असा ईडी ला संशय आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही