मेट्रोच्या कामामुळे १० ऑगस्टपर्यंत ठाणेकडील घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल

 

मेट्रोच्या कामामुळे  १० ऑगस्टपर्यंत ठाणेकडील घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल


लोकमानस प्रतिनिधी 

ठाणे :- ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीत मुंबई मेट्रो लाईन-४ चे काम चालू आहे. या मेट्रो ४ च्या पिलरवर ओवळा सिग्नल ते सी.एन.जी. पंप पर्यंत घोडबंदर रोड या ठिकाणी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. हे गर्डर टाकतांना ठाणेकडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने, या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित होण्याकरीता ठाणे शहर वाहतूक विभागाने दि. 10 ऑगस्ट 2022 पर्यंत या परिसरातील वाहतुकीत बदल केले असल्याचे पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविले आहे.

वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे -

प्रवेश बंद - मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे "प्रवेश बंद" करण्यात येत आहे

पर्यायी मार्ग - मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने कापूरबावडी  जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद -  मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग -  मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद - नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग- नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

जड अवजड वाहने सोडून इतर वाहने ही पिलर क्रमांक 24 ते 26 चे गर्डर टाकण्याच्या वेळी ओवळा सिग्नल कट येथून डावीकडे वळण घेवुन सेवा रस्त्याने पुढे विहंग हिल सोसायटी कट जवळ उजवे बाजुस वळण घेवुन मुख्य रस्त्यास मिळून इच्छित स्थळी जातील.

पिलर क्रमांक 44 ते 45 चे गर्डर टाकण्याच्या वेळी विहंग हिल सोसायटी कट येथून डावीकडे वळण घेवुन सेवा रस्त्याने पुढे नागला बंदर सिग्नल कट जवळ उजवे बाजुस वळण घेवुन मुख्य रस्त्यास मिळून इच्छित स्थळी जातील.            पिलर क्रमांक 69 ते 70 व पिलर क्र. 100 ते 101 चे गर्डर टाकण्याच्या वेळी नागला बंदर सिग्नल कट येथून डावीकडे वळण घेवुन सेवा रस्त्याने पुढे सी.एन.जी. पंप कट जवळ उजवे बाजुस वळण घेवुन मुख्य रस्त्यास मिळून इच्छित स्थळी जातील.

खालील दिनांक व वेळेत मेट्रोचे गर्डर टाकण्याचे काम सुरू राहणार आहे.

            (१ः दि. २६/०७/२०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा ते दि. २७/०७/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत.

            (२) दि. २८/०७/२०२२ रोजी रात्री २३.५५ वा. ते दि. २९/०७/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत

            (३) दि. ३०/०७/२०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. ३१/०७/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत

            (४) दि. ०१/०८/२०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. ०२/०८/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत

             दि. ०३/०८/२०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. ०४/०८/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत

            (६) दि. ०५/०८/२०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. ०६/०८/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत

            (७) दि. ०७/०८/२०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. ०८/०८/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत

            (८) दि. ०९/०८/२०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. १०/०८/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत

वाहतुकीतील बदल या कालावधीत दरम्यान गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होई पर्यंत अंमलात राहणार आहे, असे वाहतूक शाखेने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही